Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

“आमच्या पेनला लकवा मारलेला नाही, मी नॉनस्टॉप…”; कराडमधून देवेंद्र फडणवीसांची जनतेला ग्वाही

खासदार उदयनराजे भोसले म्हणाले, चव्हाण कुटुंबीयांनी ६० वर्षांत अनेक मंत्रिपदे भूषवताना कराड दक्षिण व सातारा जिल्ह्यासाठी कोणतेही ठोस काम आणले नाही. याच भूमिकांमुळे सातारा जिल्हा आता भाजपचा बालेकिल्ला झाला आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Nov 15, 2024 | 07:03 PM
"आमच्या पेनला लकवा मारलेला नाही, मी नॉनस्टॉप..."; कराडमधून देवेंद्र फडणवीसांची जनतेला ग्वाही

"आमच्या पेनला लकवा मारलेला नाही, मी नॉनस्टॉप..."; कराडमधून देवेंद्र फडणवीसांची जनतेला ग्वाही

Follow Us
Close
Follow Us:

कराड: स्वातंत्र्यानंतर देशात तब्बल ६० वर्ष सत्ता असताना काँग्रेसने नेमका काय विकास केला, हे सांगावे. कराड दक्षिणमध्येही याहून काही वेगळी परिस्थिती नाही. याठिकाणी आनंदराव चव्हाण, प्रेमिला चव्हाण आणि पृथ्वीराज चव्हाण या चव्हाण कुटुंबीयांकडे लोकप्रतिनिधित्व असताना त्यांनी कराड दक्षिणसाठी काय केले असा सवाल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.

कराड येथे महायुतीतर्फे भाजपचे उमेदवार डॉ. अतुल भोसले यांच्या प्रचारार्थ आयोजित प्रचार सभेत ते बोलत होते. यावेळी भगवंत खुबा, खासदार उदयनराजे भोसले, ज्येष्ठ नेते मदनराव मोहिते, कृष्णा कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले, माजी आमदार आनंदराव पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. भाजप-महायुती सरकारने केलेली कामे आम्हीच केली असल्याचे सांगण्याची वेळ पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर आली असल्याचा टोला लगावत उपुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, कराडला महामार्गावर होणारा उड्डाणपूल आम्हीच केला असल्याचे पृथ्वीराज चव्हाण सांगत आहेत.

परंतु, महामार्गावरील सर्वच पुल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिलेल्या पैशांतून होत आहेत. जो विकास झाला, तो आम्हीच केल्याचे सांगण्याची प्रवृत्ती बरी नव्हे. मुख्यमंत्री असताना शिवाजी स्टेडियमसाठी त्यांनी फुटकी कवडीही दिली नाही. तुम्ही केलेल्या कामांचेच श्रेय घ्या. केलेल्या कामांचे श्रेय जनताच देत असते. ते मागावे लागत नाही. खरंतर पुणे-कोल्हापूर महामार्गाच्या कामाचे खरे श्रेय खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांचे असून त्यांनी यासाठी मोठा पाठपुरावा केला होता.

उपुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, मी मुख्यमंत्री असताना झोपडपट्टी असलेली जागा संबंधितांच्या नावावर करून त्याठिकाणी त्यांचे पुनर्वसन करण्याचा निर्णय घेतला. परंतु, त्यात काही अडथळे आले. नंतर उपमुख्यमंत्री असताना जमीन खासगी मालकीची असली तरी त्याची मालकी संबंधितांना देऊन त्याठिकाणी घरे बांधून देण्याचा निर्णय घेतला. आता कराडच्या पाटण कॉलनी व मलकापुरातील झोपडपट्टी वासियांना आपण पक्की घरे बांधून देऊ. कराडच्या एमआयडीसीला आपण फाईव्ह स्टार दर्जा देणार असून या ठिकाणी मोठे उद्योग येतील, असा िवश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.

हेही वाचा: “संधी मिळाल्यास येथील झोपडपट्टीवासीयांचे…”; महायुतीचे उमेदवार डॉ. अतुल भोसले यांचे जनतेला आश्वासन

जिल्हा आता भाजपचा बालेकिल्ला
खासदार उदयनराजे भोसले म्हणाले, चव्हाण कुटुंबीयांनी ६० वर्षांत अनेक मंत्रिपदे भूषवताना कराड दक्षिण व सातारा जिल्ह्यासाठी कोणतेही ठोस काम आणले नाही. काँग्रेसच्या याच भूमिकांमुळे बालेकिल्ला राहिलेला सातारा जिल्हा आता भाजपचा बालेकिल्ला झाला आहे. आता कराड दक्षिणमध्येही परिवर्तन हाेणार असून मी ज्यावेळी लोकसभा निवडणूक जिंकलो. त्याचवेळी त्याची नांदी झाली, असे त्यांनी सांगितले.

🕜 1.15pm | 15-11-2024📍Karad, Satara | दु. १.१५ वा. | १५-११-२०२४📍कराड, सातारा. 🪷BJP Jahir Sabha for Karad South BJP candidate Atul Bhosale at Karad, Satara
🪷कराड दक्षिण भाजपा उमेदवार अतुल भोसले यांच्या प्रचारार्थ कराड, सातारा येथे भाजपा जाहीर सभा
🪷कराड दक्षिण भाजपा… pic.twitter.com/raGevLF7eG
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) November 15, 2024

आमच्या पेनला लकवा मारलेला नाही
फाईलवर सही करताना पृथ्वीराज चव्हाण यांच्या हाताला लकवा मारतो, या खासदार शरद पवार यांनी केलेल्या जुन्या वक्तव्याची आठवण करून देत फडणवीस यांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर निशाणा साधला. परंतु, आमच्या पेनला लकवा मारलेला नाही. मी मागणीपत्रांवर नॉनस्टॉप सह्या करेन, अशी ग्वाही उपुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.

हेही वाचा: “संधी मिळाल्यास येथील झोपडपट्टीवासीयांचे…”; महायुतीचे उमेदवार डॉ. अतुल भोसले यांचे जनतेला आश्वासन

पृथ्वीराज चव्हाण आंतरराष्ट्रीय मटेरियल
गेल्या दहा वर्षांत कराड दक्षिणमधील जनतेकडून चूक झाली आहे. पृथ्वीराज चव्हाण हे बुद्धिवान नेतृत्व आहेत. त्यामुळे मुळात ते विधानसभेचे मटेरियल नसून आंतरराष्ट्रीय मटेरियल आहेत, असे विधान देवेंद्र फडणवीस यांनी केले. कराड दक्षिणच्या जनतेने त्यांना दक्षिणेत अडकवून न ठेवू नये, अशी खोचक टिपण्णी करत यावेळी कराड दक्षिणच्या जनतेने आपली चूक सुधारावी, आवाहन उपुख्यमंत्री फडणवीस यांनी केले.

Web Title: Dcm devendra fadanvis criticizes mva at dr atul bhosale karad rally for maharashtra election 2024

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 15, 2024 | 06:59 PM

Topics:  

  • devendra fadanvis
  • Dr Atul Bhosale
  • Maharashtra Assembly election 2024

संबंधित बातम्या

Nepal Protest: नेपाळमध्ये महाराष्ट्राच्या 150 पर्यटकांची सुटका कधी होणार? अखेर देवेंद्र फडणवीसांनी दिली प्रतिक्रिया
1

Nepal Protest: नेपाळमध्ये महाराष्ट्राच्या 150 पर्यटकांची सुटका कधी होणार? अखेर देवेंद्र फडणवीसांनी दिली प्रतिक्रिया

Maharashtra Cabinet : मुंबई-ठाणे नवीन मेट्रो, पुणे-लोणावळा चौपदरीकरण मंजूर; कॅबिनेट बैठकीत १५ महत्त्वाचे निर्णय
2

Maharashtra Cabinet : मुंबई-ठाणे नवीन मेट्रो, पुणे-लोणावळा चौपदरीकरण मंजूर; कॅबिनेट बैठकीत १५ महत्त्वाचे निर्णय

भाजप आमदाराच्या पीएचीच दोन मतदारसंघात नोंदणी; काँग्रेसने केली पोलखोल
3

भाजप आमदाराच्या पीएचीच दोन मतदारसंघात नोंदणी; काँग्रेसने केली पोलखोल

Mumbai News : बीडीडी चाळीतील रहिवाशांना हक्काचं घर; काय म्हणाले देवेंद्र फडणवीस, पाहा व्हिडीओ
4

Mumbai News : बीडीडी चाळीतील रहिवाशांना हक्काचं घर; काय म्हणाले देवेंद्र फडणवीस, पाहा व्हिडीओ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.