Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

“…हे त्यांना माहिती होते की नव्हते?” मनसुख हिरेन प्रकरणावरून फडणवीसांचे देशमुखांना थेट आव्हान

अनिल देशमुख यांनी असे आरोप करायला आत्ताच का सुरुवात केली? उद्धव ठाकरेंची शिवसेना, शरद पवारांची राष्ट्रवादी कॉँग्रेस आणि कॉँग्रेस पक्षाने केवळ देवेंद्र फडणवीस या व्यक्तीला लक्ष्य करण्यासाठी रणनीती तयार केली आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Oct 30, 2024 | 03:05 PM
"...हे त्यांना माहिती होते की नव्हते?" मनसुख हिरेन प्रकरणावरून फडणवीसांचे देशमुखांना थेट आव्हान

"...हे त्यांना माहिती होते की नव्हते?" मनसुख हिरेन प्रकरणावरून फडणवीसांचे देशमुखांना थेट आव्हान

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई: राज्यात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. दरम्यान राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना मनसुख हीरेन मृत्यू प्रकरण चांगलेच गाजले होते. तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हा मुद्दा विधानसभेत चांगलाच उचलून धरला होता. त्यानंतर जे काही घडले ते राज्यातील सर्व जनतेला माहिती आहेच. तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर देखील अनेक आरोप करण्यात आले होते. दरम्यान यावर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनिल देशमुख यांना थेट आव्हानच दिले आहे. एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस बोलत होते.

मनसुख हीरेन याची हत्या होणार आहे हे अनिल देशमुख यांना माहिती होते की नाही असा सवाल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना विचारले आहे. या प्रश्नाचे उत्तर त्यांनी दिले पाहिजे असे थेट आव्हानच फडणवीस यांनी देशमुखांना दिले आहे. या प्रश्नाचे उत्तर ते देणार नाहीत हे मला माहिती नाही, मात्र माझी तशी अपेक्षाही नाही असे फडणवीस म्हणाले आहेत.

मनसुख हीरेन हत्येच्या प्रकरणामध्ये विधानसभेत मी शंका उपस्थित केली होती. त्यावेळेस मनसुख हीरेन यांना गायब करण्यात आले तसेच त्यांची हत्या होऊ शकते अशी मी भीती सदनामध्ये व्यक्त केली होती. त्यामुळे माझे असे मत आहे की, अनिल देशमुख यांनी यावर उत्तर दिले पाहिजे. ते यावर भाष्य करणार नाहीत. मात्र याचे उत्तर कधी नया कधी बाहेर येईलच, असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.

हेही वाचा: Maharashtra Election 2024 : महायुतीचेच उमेदवार या मतदारसंघांमध्ये असणार आमने सामने; प्रमुख नेते कुणाचा करणार प्रचार?

खोटे बोलण्यासाठी विचार करावा लागतो. मात्र खरे बोलण्यासाठी विचार करावा लागत नाही. सत्य कधी न कधी बाहेत येतच असते. त्यामुळे अनिल देशमुख यांच्या प्रश्नाला उत्तर देण्याची गरज नाही. अनिल देशमुख यांनी ट्वीट करत मला जेलमध्ये त्रास झाल्याचे सांगितले होते. नोव्हेंबर २०२२ मध्ये देशमुख तुरुंगात गेले. त्यानंतर ते जवळपास ११ महीने ते तुरुंगात होते. त्यातील आठ महीने महाविकास आघाडीचे सरकार राज्यात होते. मग जेलमध्ये त्यांच्याच सरकारने त्यांन त्रास दिला का ?असा माझा प्रश्न आहे.

अनिल देशमुख यांनी असे आरोप करायला आत्ताच का सुरुवात केली? उद्धव ठाकरेंची शिवसेना, शरद पवारांची राष्ट्रवादी कॉँग्रेस आणि कॉँग्रेस पक्षाने केवळ देवेंद्र फडणवीस या व्यक्तीला लक्ष्य करण्यासाठी रणनीती तयार केली आहे. भाजपला रोखायचे असेल तर केवळ फडणवीस यांना टार्गेट केले पाहिजे असे त्यांना वाटत असेल. त्याचाच एक भाग म्हणून देशमुख यांनी आरोप करण्यास सुरुवात केली आहे.

Web Title: Dcm devendra fadanvis criticizes to anil deshmukh about mansukh hiren case

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 30, 2024 | 03:05 PM

Topics:  

  • anil deshmukh
  • devendra fadanvis

संबंधित बातम्या

Nepal Protest: नेपाळमध्ये महाराष्ट्राच्या 150 पर्यटकांची सुटका कधी होणार? अखेर देवेंद्र फडणवीसांनी दिली प्रतिक्रिया
1

Nepal Protest: नेपाळमध्ये महाराष्ट्राच्या 150 पर्यटकांची सुटका कधी होणार? अखेर देवेंद्र फडणवीसांनी दिली प्रतिक्रिया

Maharashtra Cabinet : मुंबई-ठाणे नवीन मेट्रो, पुणे-लोणावळा चौपदरीकरण मंजूर; कॅबिनेट बैठकीत १५ महत्त्वाचे निर्णय
2

Maharashtra Cabinet : मुंबई-ठाणे नवीन मेट्रो, पुणे-लोणावळा चौपदरीकरण मंजूर; कॅबिनेट बैठकीत १५ महत्त्वाचे निर्णय

Mumbai News : बीडीडी चाळीतील रहिवाशांना हक्काचं घर; काय म्हणाले देवेंद्र फडणवीस, पाहा व्हिडीओ
3

Mumbai News : बीडीडी चाळीतील रहिवाशांना हक्काचं घर; काय म्हणाले देवेंद्र फडणवीस, पाहा व्हिडीओ

नारायण राणेंनी वयाचं आणि केसावरील टोपाचं भान ठेवलं पाहिजे – Sanjay Raut
4

नारायण राणेंनी वयाचं आणि केसावरील टोपाचं भान ठेवलं पाहिजे – Sanjay Raut

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.