Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 5 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

रेल्वे रुळालगत आढळून आला मृतदेह, टिळकनगर पोलिसांकडून छायाचित्रे प्रसारित

मृताने लाल ठिपके असलेला राखाडी रंगाचा शर्ट आणि स्काय ब्लू रंगाची जीन्स पँट परिधान केली आहे. कमरेला लोखंडी हूक असलेला चामडी पट्टा आहे.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Nov 25, 2023 | 04:58 PM
रेल्वे रुळालगत आढळून आला मृतदेह, टिळकनगर पोलिसांकडून छायाचित्रे प्रसारित
Follow Us
Follow Us:

कल्याण : कल्याणच्या पत्रीपूल परिसरात रेल्वे लाईनलगत अर्धवट जळालेल्या अवस्थेत एका पुरुषाचा मृतदेह गुरूवारी १६ नोव्हेंबर रोजी रात्री आठच्या सुमारास आढळून आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली होती. जाळून हत्या करण्यात आल्याचा संशय व्यक्त करत स्थानिक टिळकनगर पोलिसांनी या इसमाची छायाचित्रे सर्वत्र प्रसारित केली आहेत. पोलिसांचे विविध पथके या प्रकरणाचा तपास करत आहेत. मात्र आठवडा उलटूनही मृताची ओळख अद्याप पटलेली नाही.

कल्याण पूर्वेकडे पत्रीपूलाच्या जवळ असलेल्या पारिजात बिल्डिंगच्या पाठीमागील बाजूस असलेल्या रेल्वे ट्रॅक लगत झुडपांत एक मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेत आढळून आला. लोहमार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार टिळकनगर पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केल्यानंतर हा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मुंबईतील सर जे. जे. हॉस्पिटलला पाठवून दिला. उत्तरीय तपासणी अहवाल प्राप्त झाल्यानंतर या इसमाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, हे स्पष्ट होणार आहे. बहुदा पूर्ववैमनस्यातून वा अनैतिक संबंधातून या इसमाची हत्या करून त्याला जाळून पुरावा नष्ट करण्याचा मारेकऱ्यांनी प्रयत्न केला असावा, असा पोलिसांचा संशय आहे. ३५ ते ४० वर्षाच्या इसमाचा मृतदेह असून त्याची ओळख अद्याप पटली नसल्याने त्याची छायाचित्रे प्रसारित करण्यात आली आहेत.

मृताने लाल ठिपके असलेला राखाडी रंगाचा शर्ट आणि स्काय ब्लू रंगाची जीन्स पँट परिधान केली आहे. कमरेला लोखंडी हूक असलेला चामडी पट्टा आहे. तर वरच्या दातांना सिरॅमिक किंवा मेटलची क्लिप लावलेली दिसून येते. ओळख पटू नये, तसेच विल्हेवाट लावण्यासाठी अज्ञातांनी सदर इसमाचा मृतदेह जाळून टाकण्याचा प्रयत्न केला आहे. कमरेपासून वरचा भाग जळून विद्रूप झाला आहे. पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात मारेकऱ्यांच्या विरोधात भादंवि कलम ३०२, २०१ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. डीसीपी सचिन गुंजाळ, एसीपी सुनील कुराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांची विविध पथके या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Web Title: Dead body found near railway tracks tilaknagar police released pictures kalyan crime case maharashtra police maharashtra crime case

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 25, 2023 | 04:58 PM

Topics:  

  • kalyan crime case
  • kalyan railway
  • Maharashtra Government

संबंधित बातम्या

Kalyan Railway Station : कल्याण रेल्वे महिला कर्मचाऱ्यासोबत गैरवर्तन, मनसे पदाधिकाऱ्यांकडून स्टेशन मास्तरला चोप
1

Kalyan Railway Station : कल्याण रेल्वे महिला कर्मचाऱ्यासोबत गैरवर्तन, मनसे पदाधिकाऱ्यांकडून स्टेशन मास्तरला चोप

Dhule News : धुळ्यातील 3,258 शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा मोठा दिलासा; 33 कोटी 1 लाखांचा लाभ खात्यावर जमा
2

Dhule News : धुळ्यातील 3,258 शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा मोठा दिलासा; 33 कोटी 1 लाखांचा लाभ खात्यावर जमा

१७६ कोटींचा आरोप, प्रकल्पाचे काम बंद अन् फ्लॅटचा ताबाही नाही; टायकुन गोल्ड एव्हेन्यू प्रकरणात नेमकं काय घडलं?
3

१७६ कोटींचा आरोप, प्रकल्पाचे काम बंद अन् फ्लॅटचा ताबाही नाही; टायकुन गोल्ड एव्हेन्यू प्रकरणात नेमकं काय घडलं?

Agniveer in Maharashtra Police : अग्निवीरांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा! 25% पोलीस दलात, परीक्षा-ट्रेनिंगची अट नाही!
4

Agniveer in Maharashtra Police : अग्निवीरांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा! 25% पोलीस दलात, परीक्षा-ट्रेनिंगची अट नाही!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.