Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

म्हाडाच्या घरांसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ, ‘या’ तारखेपर्यंत करता येणार अर्ज

म्हाडा सोडतीला मुदतवाढ देण्याचा निर्णय मंगळवारी (३१ जानेवारी) घेण्यात आला होता. म्हाडाच्या पुणे मंडळाने शुक्रवारी घरांसाठी अर्ज करण्याला मुदतवाढ दिल्याचे जाहीर केले. म्हाडाच्या विविध योजनेतील २५९४ सदनिका, २० टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेंतर्गत २९९० सदनिका आणि प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत ३९६ सदनिका अशा एकूण ५९१५ सदनिकांसाठी सोडत होत आहे.

  • By Sunil Chavan
Updated On: Feb 04, 2023 | 01:04 PM
म्हाडाच्या घरांसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ, ‘या’ तारखेपर्यंत  करता येणार अर्ज
Follow Us
Close
Follow Us:

पुणे – महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) पुणे मंडळाने विविध उत्पन्न गटांतील नागरिकांसाठी पुणे, पिंपरी चिंचवड शहरातील ५९१५ घरांसाठी सोडत जाहीर केली आहे. त्यासाठी ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम मुदत शनिवारपर्यंत (४ फेब्रुवारी) होती. मात्र, यंदा अर्ज करतानाच सर्व कागदपत्रे सादर करणे बंधनकारक करण्यात आले होते. ही कागदपत्रे मिळण्यास नागरिकांबरोबरच लोकप्रतिनिधींना देखील अडचणी येत होत्या. या पार्श्वभूमीवर म्हाडाने घरांसाठी ऑनलाइन अर्ज करण्यास २५ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ दिली आहे, तर घरांची सोडत ७ मार्च रोजी जाहीर केली जाणार आहे.

म्हाडा सोडतीला मुदतवाढ देण्याचा निर्णय
म्हाडा सोडतीला मुदतवाढ देण्याचा निर्णय मंगळवारी (३१ जानेवारी) घेण्यात आला होता. म्हाडाच्या पुणे मंडळाने शुक्रवारी घरांसाठी अर्ज करण्याला मुदतवाढ दिल्याचे जाहीर केले. म्हाडाच्या विविध योजनेतील २५९४ सदनिका, २० टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेंतर्गत २९९० सदनिका आणि प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत ३९६ सदनिका अशा एकूण ५९१५ सदनिकांसाठी सोडत होत आहे. यामध्ये प्रथम येणाऱ्यास प्राधान्यअंतर्गत २९२५ घरे उपलब्ध आहेत.

अर्जांची छाननीदेखील ऑनलाइन

यंदा प्रथमच अर्जासोबत अधिवास प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, तसेच आरक्षण असणाऱ्या वर्गातून अर्ज करत असल्यास त्याचे प्रमाणपत्र असे पुरावे ऑनलाइन अर्जासोबत सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच या अर्जांची छाननीदेखील ऑनलाइन करण्यात येत आहे. त्यामुळे विविध प्रमाणपत्र जमा करण्यासाठी नागरिकांची धावपळ होत आहे. काहींना अर्ज करूनही अजून प्रमाणपत्र मिळाले नाही. त्यामुळे म्हाडाच्या घरांसाठी अर्ज करण्यापासून कोणीही वंचित राहू नये म्हणून ही मुदतवाढ देण्यात आली आहे, असे म्हाडा पुणे मंडळाचे मुख्य अधिकारी नितीन माने-पाटील यांनी दिली.

सोडतीचे सुधारित वेळापत्रक

  • ऑनलाइन अर्जासाठी नोंदणीची अंतिम मुदत २५ फेब्रुवारी
  • सोडतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम मुदत २६ फेब्रुवारी
  • अनामत रक्कम स्वीकृती अंतिम मुदत २७ फेब्रुवारी
  • सोडतीसाठी अंतिम अर्जांची प्रारूप यादी प्रसिद्ध ३ मार्च
  • सोडतीसाठी अर्जांची अंतिम यादी प्रसिद्ध ५ मार्च
  • सोडत जाहीर ७ मार्च

Web Title: Deadline to apply for mhada houses in pune extended till 25th february

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 04, 2023 | 01:04 PM

Topics:  

  • Marathi News
  • pune news

संबंधित बातम्या

यंदा गणेशोत्सवासाठी ३६६ विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय! श्रीकांत शिंदे आणि नरेश म्हस्के यांनी मानले रेल्वे मंत्र्यांचे आभार
1

यंदा गणेशोत्सवासाठी ३६६ विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय! श्रीकांत शिंदे आणि नरेश म्हस्के यांनी मानले रेल्वे मंत्र्यांचे आभार

आता तरी जागे व्हा! HSRP Number Plate बसवण्याची मुदत पुन्हा वाढली, ‘ही’ असेल अंतिम तारीख
2

आता तरी जागे व्हा! HSRP Number Plate बसवण्याची मुदत पुन्हा वाढली, ‘ही’ असेल अंतिम तारीख

Thane News : “भीक नको न्याय हवा !” राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे बेमुदत आंदोलनाचा चौथा दिवस
3

Thane News : “भीक नको न्याय हवा !” राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे बेमुदत आंदोलनाचा चौथा दिवस

Kalyan News :  कृषी उत्पन्न बाजार समिती वादाच्या भोवऱ्यात ; परिसरात अनधिकृत बांधकाम असल्याचा आरोप
4

Kalyan News : कृषी उत्पन्न बाजार समिती वादाच्या भोवऱ्यात ; परिसरात अनधिकृत बांधकाम असल्याचा आरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.