Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 15 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Metro ची सुसाट घोडदौड! आठ दिवसांत तब्बल ‘इतक्या’ लाख प्रवाशांचा प्रवास; वाहतूक कोंडीवर…

Pune Metro: पुणे मेट्रोसोबतच महामेट्रोच्या पुणे मेट्रो मार्गिकांनाही दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये प्रवाशांचा जोरदार प्रतिसाद मिळाला. ५ ते ११ नोव्हेंबर या सात दिवसांच्या कालावधीत पुणे मेट्रोतून एकूण १२ लाख १३ हजार ८६८ प्रवाशांनी प्रवास केला आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Nov 15, 2026 | 02:35 AM
shivajinagar to hinjewadi metro line

shivajinagar to hinjewadi metro line

Follow Us
Follow Us:
  • पुणेरी मेट्रो’ची सुसाट घोडदौड
  • अवघ्या आठ दिवसांत पावणेतीन लाख प्रवाशांचा विक्रमी प्रवास
  • दिवाळीच्या खरेदीसाठी आयटीयन्ससह पुणेकरांची पहिली पसंती
Pune Metro: पुण्याच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत ऐतिहासिक मैलाचा दगड ठरलेल्या माण-हिंजवडी ते शिवाजीनगर या ‘पुणेरी मेट्रो’ला (मेट्रो लाईन-३) पुणेकरांचा अभूतपूर्व प्रतिसाद लाभत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ३ नोव्हेंबर रोजी लोकार्पण झाल्यानंतर, ४ ते ११ नोव्हेंबर या अवघ्या आठ दिवसांच्या कालावधीत तब्बल २ लाख ६६ हजार ५५८ प्रवाशांनी पुणेरी मेट्रोतून प्रवास करत नवीन विक्रम नोंदवला आहे. ऐन दिवाळीच्या सणातही प्रवाशांचा हा उत्साह कायम राहिला असून, वाढत्या वाहतूक कोंडीवर पुणेरी मेट्रो हा सर्वात प्रभावी पर्याय ठरल्याचे या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.

एकेकाळी विद्येचे आणि संस्कृतीचे माहेरघर असलेले पुणे आज देशाचे प्रमुख आयटी आणि औद्योगिक केंद्र बनले आहे. मात्र, वाढत्या वाहनसंख्येमुळे हिंजवडी आयटी पार्क आणि मध्यवर्ती भाग यांदरम्यान होणारी वाहतूक कोंडी हा नागरिकांसाठी रोजचाच मनस्ताप ठरला होता. माण-हिंजवडी ते शिवाजीनगर मार्गिका सुरू झाल्यानंतर हजारो आयटी कर्मचारी, विद्यार्थी आणि व्यावसायिकांचा प्रवास आता अधिक वेगवान आणि सुकर झाला आहे.

दिवाळी खरेदी आणि पार्किंगच्या चिंतेतून मुक्ती

दिवाळीनिमित्त पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील बाजारपेठांमध्ये कपडे, मिठाई आणि भेटवस्तूंच्या खरेदीसाठी मोठी लगबग होती. सणासुदीच्या काळात खासगी वाहने घेऊन बाजारपेठ गाठताना वाहतूक कोंडी आणि पार्किंगचा मोठा प्रश्न निर्माण होतो. मात्र, यंदा दिवाळीच्या तोंडावरच ‘पुणेरी मेट्रो’ सुरू झाल्याने हिंजवडी, माण परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला. कार्यालयीन प्रवासाबरोबरच दिवाळी खरेदी, नातेवाइकांच्या भेटीगाठी आणि कुटुंबासह फेरफटक्यासाठी नागरिकांनी खाजगी वाहनांऐवजी मेट्रोला पसंती दिली.

Pune Metro Line 3: पुणेकरांनो लक्ष द्या! दिवाळीनिमित्त हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो लाईन ३ च्या वेळांमध्ये मोठा बदल

महिला सक्षमीकरण आणि ‘पिंक मेट्रो’ची ओळख

या प्रकल्पाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे यातील महिलांचा लक्षणीय सहभाग. या मार्गिकेवर सुमारे ९० महिला ट्रेन पायलट मेट्रोचे सारथ्य करत असून, प्रकल्पातील एकूण मनुष्यबळापैकी ५० टक्के कर्मचारी महिला आहेत. यामुळे या मार्गिकेला ‘पिंक मेट्रो’ म्हणूनही नवी ओळख मिळाली आहे. महिला प्रवाशांमध्ये सुरक्षित, आरामदायी आणि आत्मनिर्भर प्रवासाबाबत मोठा उत्साह पाहायला मिळत आहे.

अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि हरित ऊर्जेचा संगम
केवळ वेगवान प्रवासच नव्हे, तर पर्यावरणपूरक आणि अत्याधुनिक सुविधा हे पुणेरी मेट्रोचे बलस्थान ठरले आहे:
हरित ऊर्जा: प्रकल्पातील एक-तृतीयांश वीजपुरवठा सौर ऊर्जेच्या माध्यमातून केला जात आहे.

एकात्मिक सुविधा: स्थानकांवर ईव्ही चार्जिंग सुविधा, रेनवॉटर हार्वेस्टिंग आणि अत्याधुनिक सीबीटीसी (CBTC) सिग्नलिंग प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे.
प्रवासीभिमुख रचना: आयटी कर्मचाऱ्यांच्या सोयीसाठी इन्फोसिस कंपनीशी जोडणारा थेट फूट ओव्हर ब्रिज आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातील दुपदरी उड्डाणपूल यांमुळे वाहतूक अधिक गतिमान झाली आहे.
पुणेरी मेट्रोचा ८ दिवसांचा प्रवासी आलेख (पीएमआरडीए आकडेवारीनुसार)

Narendra Modi : 2014 मध्ये 5 शहरांमध्ये मेट्रो; आता 26 शहरांपर्यंत विस्तार, पंतप्रधान मोदींची माहिती

दिनांक                                  प्रवासी संख्या
०४ नोव्हेंबर                               ४८,६७९
०५ नोव्हेंबर                               ४०,३२९
०६ नोव्हेंबर                               ३४,६४७
०७ नोव्हेंबर                               ३४,२४३
०८ नोव्हेंबर                               १८,९०८
०९ नोव्हेंबर.                              ३२,९७९
१० नोव्हेंबर                               ३०,६९९
११ नोव्हेंबर                               २६,०७४
एकूण प्रवासी संख्या                  २,६६,५५८

ठळक चौकट : दिवाळी सुट्ट्यांमध्ये पुणे मेट्रोलाही मोठी पसंती
पुणे मेट्रोसोबतच महामेट्रोच्या पुणे मेट्रो मार्गिकांनाही दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये प्रवाशांचा जोरदार प्रतिसाद मिळाला. ५ ते ११ नोव्हेंबर या सात दिवसांच्या कालावधीत पुणे मेट्रोतून एकूण १२ लाख १३ हजार ८६८ प्रवाशांनी प्रवास केला असून, या माध्यमातून प्रशासनाला १ कोटी ८६ लाख ३० हजार ९५१ रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: माण-हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोतून 8 दिवसांत किती प्रवाशांनी प्रवास केला?

    Ans: ४ ते ११ नोव्हेंबर या आठ दिवसांत तब्बल २ लाख ६६ हजार ५५८ प्रवाशांनी प्रवास केला.

  • Que: माण-हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रो लाईनचे लोकार्पण कधी झाले?

    Ans: ३ नोव्हेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मेट्रो लाइनचे लोकार्पण झाले.

Web Title: Two lakhs 66 thousand passengers travel with man hinjewadi shivajinagar pune metro in only 8 days tb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 15, 2026 | 02:35 AM

Topics:  

  • Pune Metro
  • pune metro news
  • pune news

संबंधित बातम्या

Amit Shah in Pune: अजितदादांच्या अर्धपुतळ्याचे अमित शाह यांच्या हस्ते अनावरण | Navarashtra
1

Amit Shah in Pune: अजितदादांच्या अर्धपुतळ्याचे अमित शाह यांच्या हस्ते अनावरण | Navarashtra

टाळ-मृदंगाच्या गजरात पुणे-अक्कलकोट पालखी मार्गस्थ; 750 तरुणांनी केला व्यसनमुक्तीचा संकल्प
2

टाळ-मृदंगाच्या गजरात पुणे-अक्कलकोट पालखी मार्गस्थ; 750 तरुणांनी केला व्यसनमुक्तीचा संकल्प

Vaishali And Rupali Hotel: शी! पुरुषांच्या टॉयलेटजवळ डोसा, उत्तप्पाचा तवा अन्…; FDA कडून लायसन्स रद्द
3

Vaishali And Rupali Hotel: शी! पुरुषांच्या टॉयलेटजवळ डोसा, उत्तप्पाचा तवा अन्…; FDA कडून लायसन्स रद्द

सोसायटीत पोलिसांची गाडी येईल, तुम्हाला हातकड्या घालून तुरुंगात नेले जाईल; महिलेला सायबर चोरट्यांनी घातला गंडा
4

सोसायटीत पोलिसांची गाडी येईल, तुम्हाला हातकड्या घालून तुरुंगात नेले जाईल; महिलेला सायबर चोरट्यांनी घातला गंडा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.