Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मोखाडा-त्र्यंबकेश्वर घाटात तरसाचा मृत्यू; रस्ते रुंदीकरणावरून वन्यजीव सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

मोखाडा-त्र्यंबकेश्वर घाटात अज्ञात वाहनाच्या धडकेने तरसाचा मृत्यू झाल्याने वन्यजीव सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. रस्ते रुंदीकरणामुळे जैवविविधतेला धोका निर्माण होण्याची शक्यता वन विभागाने व्यक्त केली आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jul 23, 2025 | 08:11 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

दीपक गायकवाड, मोखाडा: मोखाडा-त्र्यंबकेश्वर घाटात सोमवारी मध्यरात्री एका अज्ञात वाहनाच्या धडकेने तरस या वन्य प्राण्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना मोखाडा फाटा आणि त्र्यंबकेश्वर दरम्यानच्या जंगलमय घाटमाथ्यावर घडली. या अपघातामुळे या भागातील वन्यजीवांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. तरस हा संपूर्ण महाराष्ट्रात दुर्मीळ होत चाललेला प्राणी असून, जव्हार आणि मोखाडा परिसरात याची संख्या तुलनेत अधिक आहे. याशिवाय, या भागात किमान सहा बिबटे आहेत, अशी नोंद वन विभागाकडे आहे. रात्रीच्या वेळी हे प्राणी अन्नाच्या शोधात रस्त्यांच्या परिसरात येत असतात. त्यामुळे वाहनधारकांनी सावधगिरी बाळगणे अत्यंत आवश्यक आहे.

SCDL च्या रौप्य महोत्सवी वर्षात करिअर ग्रोथ सेमिनारची पर्वणी! विविध मास्टरक्लास आणि चर्चासत्रे

सध्या मोखाडा-त्र्यंबकेश्वर आणि मोखाडा-खोडाळा या रस्त्यांचे रुंदीकरण करण्याचा प्रस्ताव शासनाकडे विचाराधीन आहे. परंतु, रस्त्यांच्या दोन्ही बाजूंनी जैवविविधतेने समृद्ध जंगल असल्याने, या कामामुळे मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड होऊन वन्यजीवांचे अधिवास नष्ट होण्याची शक्यता आहे. परिणामी, बिबटे, तरस आणि अन्य प्राणी मानवी वस्त्यांकडे वळण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, लवकरच संरक्षित वन परिसरांमध्ये एन्ट्री आणि एक्झिट पॉइंटवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जाणार आहेत. यामुळे वन्य प्राण्यांच्या हालचाली तसेच वाहनांच्या गतीवर नियंत्रण ठेवणे शक्य होणार आहे. त्याचबरोबर, विशिष्ट वेळेनंतर या मार्गांवर वाहनांची वाहतूक मर्यादित करण्याचा पर्याय देखील शासनाच्या विचाराधीन आहे.

नेव्ही अग्निवीर MR म्युझिशियन 2025 प्रवेशपत्र जाहीर; उमेदवारांनी लगेच डाऊनलोड करा

निसर्गप्रेमी आणि पर्यावरणतज्ज्ञांनी रस्ते रुंदीकरणासोबतच पर्यावरणपूरक उपाययोजनांची अंमलबजावणी करण्याची मागणी केली आहे. यात अंडरपास, ओव्हरपास, सौरदिवे आणि वन्यजीवांसाठी स्वतंत्र कॉरिडॉर तयार करण्याचा समावेश असावा, अशी सुचवणूक देण्यात आली आहे. वन विभागाने वाहनचालकांना विनंती केली आहे की, रात्रीच्या वेळेस गाडी सावकाश चालवावी, हॉर्नचा वापर मर्यादित करावा आणि अत्यावश्यक नसल्यास जंगल रस्त्यावरून प्रवास टाळावा. कारण या भागात आधीही बिबट्यांसह अन्य प्राण्यांच्या मृत्यूच्या घटना घडल्या आहेत. वाढती वाहतूक, अवैध प्रवास आणि मानवी दुर्लक्ष यामुळे या घटनांमध्ये वाढ होत आहे.

या घटनेने पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे की, विकास आणि पर्यावरण यामध्ये संतुलन राखणे अत्यावश्यक आहे. अन्यथा जैवविविधतेला धोका पोहोचून भविष्यात गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात.

Web Title: Death of a lynx in mokhada trimbakeshwar ghat

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 23, 2025 | 07:38 PM

Topics:  

  • palghar

संबंधित बातम्या

Palghar Accident News: पालघर अपघातात १३ जणांचा मृत्यू; वारसांना ५ लाखांची शासकीय मदत घोषित
1

Palghar Accident News: पालघर अपघातात १३ जणांचा मृत्यू; वारसांना ५ लाखांची शासकीय मदत घोषित

Palghar Accident News: पालघरमध्ये भीषण अपघात! वराडाच्या टेम्पोवर कंटेनर पलटला, १२ जणांचा मृत्यू
2

Palghar Accident News: पालघरमध्ये भीषण अपघात! वराडाच्या टेम्पोवर कंटेनर पलटला, १२ जणांचा मृत्यू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.