Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 20 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jawhar PWD Fake FDR : पुरावे नष्ट करण्याचा कट? जव्हार बांधकाम विभागात लाखो-कोट्यवधींचा FDR घोटाळा; बिंग फुटण्याआधीच कागदपत्रे गायब

Jawhar PWD Fake FDR : पालघर जिल्ह्यातील जव्हार सार्वजनिक बांधकाम विभागात निविदा प्रक्रियेत जोडण्यात आलेल्या राष्ट्रीयीकृत बँकांच्या बनावट मुदत ठेव पावत्यांचा मोठा घोटाळा उघडकीस आला आहे. या घोटाळ्याची बँक पडताळणी सुरू होताच संबंधित मूळ कागदपत्रांची फाईलच शासकीय कार्यालयातून रहस्यमयरित्या चोरीला गेल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Oct 20, 2026 | 11:38 AM
बांधकाम विभागात बोगस एफडीआर ? ( सौजन्य - सोशल मीडिया )

बांधकाम विभागात बोगस एफडीआर ? ( सौजन्य - सोशल मीडिया )

Follow Us
Follow Us:
  • बांधकाम विभागात बोगस एफडीआर ?
  • बँकेकडे पडताळणी सुरू होती
  • मात्र वरिष्ठ लिपिकाच्या टेबलावरून फाईल झाली गायब
Jawhar PWD Fake FDR : कोट्यवधी रुपयांच्या विकास निधीवरून आधीच वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या जव्हार सार्वजनिक बांधकाम विभागात आता ‘बोगस मुदत ठेव पावती’ (एफडीआर) घोटाळा उजेडात आला आहे. टेंडर प्रक्रियेत जोडण्यात आलेले राष्ट्रीयीकृत बँकेचे एफडीआर बनावट असल्याचा संशय बळावला असतानाच या प्रकरणाची सत्यता उघड करणारी मूळ कागदपत्रे शासकीय कार्यालयातून चोरीला गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. चौकशीची सूत्रे फिरू लागताच फाईल गायब झाल्याने भ्रष्टाचाराचे पुरावे नष्ट करण्याचा हा पूर्वनियोजित कट तर नाही ना, असा गंभीर संशय व्यक्त केला जात आहे. ( Jawhar PWD Fake FDR ) 

Bhayander Crime : थेट पोलिसांच्याच अंगावर घातली सुसाट कार! मद्यपी चालकाचा हादरवणारा प्रताप; थरारक पाठलागानंतर पोलिसांकडून जेरबंद

नेमकं काय घडलं?

सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत निघणाऱ्या निविदा प्रक्रियेत कंत्राटदारांना कामाच्या एकूण मूल्याच्या १ ते २ टक्के सुरक्षा अनामत रक्कम राष्ट्रीयीकृत बँकेच्या एफडीआरच्या स्वरूपात जमा करावी लागते. नियमानुसार ही रक्कम प्रत्यक्ष बँकेत भरल्याशिवाय एफडीआर जारी होत नाही. मात्र, जव्हार बांधकाम विभागात मजर्जीतील कंत्राटदारांनी लाखो-कोट्यवधी रुपयांच्या कामांसाठी बनावट एफडीआर जोडून शासकीय नियमांची उघड पायमल्ली केल्याचा आरोप शिवक्रांती संघटनेचे शरद पाटील यांनी केला आहे. या संशयावरून त्यांनी टेंडर क्रमांक व एफडीआर क्रमांकांची यादी देत सखोल माहिती मागवली होती.

CCTV फुटेजमध्ये अज्ञात व्यक्ती झाली जेरबंद

या तक्रारीची दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभागाने संबंधित स्टेट बैंक ऑफ इंडियाच्या शाखेकडे या एफडीआरच्या अधिकृततेबाबत पडताळणी सुरू केली. मात्र, बँकेचा अहवाल येऊन बिंग फुटण्याआधीच कार्यालयात मोठा नाट्यमय घडामोडी घडल्या. विभागातील वरिष्ठ लिपिक गायकवाड यांच्या टेबलावरून मूळ कागदपत्रांची फाईल रहस्यमयरित्या गायब झाली. कार्यालयातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता एक अज्ञात व्यक्ती कागदपत्रे घेऊन जात असल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी गायकवाड यांनी जव्हार पोलिसांत रीतसर तक्रार नोंदवली आहे.

66 टेबलावरून कागदपत्रे गहाळ झाल्याची बाब गंभीर असून याप्रकरणी आम्ही तात्काळ जव्हार पोलिसांत अधिकृत तक्रार दाखल केली आहे. पोलिस या प्रकरणाचा सखोल तपास करत असून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल.
– संजय डोंगरे, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बाधकाम विभाग, जव्हार

अंतर्गत संगनमतातून प्रकार घडल्याचा संशय

कार्यालयातील अंतर्गत संगनमताशिवाय शासकीय टेबलावरून इतकी संवेदनशील कागदपत्रे चोरीला जाणे अशक्य असल्याचे बोलले जात आहे. खोटी बिले आणि चनावट कागदपत्रांच्या जुन्या प्रकरणांनंतर आता बोगस एफडीआरचे नवे प्रकरण समोर आल्याने संपूर्ण जव्हार सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यभारावर प्रश्नचिन्ह उभे राहिले असून, या प्रकरणाची सीआयडी किवा उच्चस्तरीय समितीमार्फत निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी शरद पाटील यांनी केली आहे.

Palghar News: दुर्वेस नाका येथे काळाचा घाला! जिन्यावर चक्कर येऊन पडताना कात्री छातीत घुसली; ३० वर्षीय तरुणाचा मृत्यू

💡

Frequently Asked Questions

  • Que: जव्हार सार्वजनिक बांधकाम विभागात नक्की कोणता घोटाळा समोर आला आहे?

    Ans: निविदा प्रक्रियेत कंत्राटदारांना सादर करावी लागणारी सुरक्षा अनामत रक्कम भरण्यासाठी राष्ट्रीयीकृत बँकांच्या बनावट/बोगस मुदत ठेव पावत्या जोडल्याचा आरोप आणि संशय समोर आला आहे.

  • Que: एफडीआर पडताळणीदरम्यान कार्यालयात काय घडले?

    Ans: बँकेकडून एफडीआरच्या अधिकृततेचा अहवाल येण्यापूर्वीच वरिष्ठ लिपिकाच्या टेबलावरून या घोटाळ्याशी संबंधित मूळ कागदपत्रांची फाईल गायब झाली, ज्याची नोंद सीसीटीव्हीत झाली आहे.

  • Que: याप्रकरणी प्रशासनाकडून काय कारवाई करण्यात आली आहे?

    Ans: कार्यकारी अभियंता संजय डोंगरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, कार्यालयातून कागदपत्रे चोरीला गेल्याप्रकरणी जव्हार पोलिसांत रीतसर तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Web Title: Jawhar pwd fake fdr scam documents stolen from office marathi ak

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 20, 2026 | 11:38 AM

Topics:  

  • palghar

संबंधित बातम्या

Palghar News: दुर्वेस नाका येथे काळाचा घाला! जिन्यावर चक्कर येऊन पडताना कात्री छातीत घुसली; ३० वर्षीय तरुणाचा मृत्यू
1

Palghar News: दुर्वेस नाका येथे काळाचा घाला! जिन्यावर चक्कर येऊन पडताना कात्री छातीत घुसली; ३० वर्षीय तरुणाचा मृत्यू

Palghar Leopard Alert : पालघरमध्ये बिबट्याचा वावर! नागरिकांना सतर्कतेचा इशारा, वनविभागाकडून जनजागृती मोहिम
2

Palghar Leopard Alert : पालघरमध्ये बिबट्याचा वावर! नागरिकांना सतर्कतेचा इशारा, वनविभागाकडून जनजागृती मोहिम

Massive fire in Palghar’s : पालघरच्या दिनकर पाड्यात जिनिअस पेंट्स कंपनीला भीषण आग; परिसरात भीतीचे वातावरण
3

Massive fire in Palghar’s : पालघरच्या दिनकर पाड्यात जिनिअस पेंट्स कंपनीला भीषण आग; परिसरात भीतीचे वातावरण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.