Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

२२ जानेवारी रामलल्ला प्राणप्रतिष्ठा दिन “मर्यादा पुरुषोत्तम दिन” घोषित करा – हिंदू महासभेची राज्यपालांकडे मागणी

संपुर्ण हिंदू जनतेच्या या धारणेस अनुसरुन, हिंदू जनभावनांचा आदर राखण्यासाठी आणि २२ जानेवारी हा दिवस " मर्यादा पुरुषोत्तम दिन " केंद्र शासनाने घोषित करावा, अशी मागणी अखिल भारत हिंदू महासभेच्यावतीने निवेदनात करण्यात आली आहे.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Jan 21, 2024 | 03:18 PM
२२ जानेवारी रामलल्ला प्राणप्रतिष्ठा दिन “मर्यादा पुरुषोत्तम दिन” घोषित करा – हिंदू महासभेची राज्यपालांकडे मागणी
Follow Us
Close
Follow Us:

कणकवली (भगवान लोके) : उद्या म्हणजे 2 जानेवारीला अयोध्येत राम मंदिराचं उद्घाटन होणार आहे. देशभरात सगळीकडे उत्साहाचं वातावरण आहे. या पार्श्वभुमीवर हिंदू महासभेच्यावतीने राज्यपाल भवनात एक निवेदन देण्यात आले. राष्ट्रपती महामहीम द्रौपदी मुर्मूंनी २२ जानेवारी हा दिवस हा ” मर्यादा पुरुषोत्तम दिन ” घोषित करण्याचे निर्देश केंद्र सरकारला द्यावेत, अशी विनंती या निवेदनद्वारे करण्यात आली.

[read_also content=”श्रीराम मूर्ती प्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त डोंबिवलीत युवा सेनेची भव्य रॅली; रामनामात अवघे शहर दुमदूमले https://www.navarashtra.com/thane/on-the-occasion-of-ayodhya-shri-ram-mandir-inauguration-shivsena-organized-grand-bike-rally-in-dombivli-nrpm-500208.html”]

हिंदू महासभेच्यावतीने, तत्कालीन फैजाबाद जिल्हाध्यक्ष स्व. ठाकुर गोपालसिंह विशारदजीनीं रामलल्लाच्या दर्शन, पुजेचा अधिकार मिळण्यासाठी दिवाणी न्यायालयात (३/१९५० ) वादपत्र प्रस्तुत करुन न्यायालयीन लढा सुरु केला होता. रामजन्मभूमीची विवादीत २:७७ अेकर जमीन हिंदू महासभा, निर्मोही आखाडा आणि वक्फ बोर्डला समान विभागून देण्याच्या अलाहाबाद अुच्च न्यायालयाच्या दिनांक ३० सप्टे. २०१० च्या निर्णया विरोधात हिंदू महासभेने न्यायालयात धाव घेतली होती. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या रामलल्ला विराजमानच्या बाजूने दिलेल्या निर्णयामुळे, हिंदू महासभेने लढलेल्या प्रदीर्घ लढ्याची अितिश्री झाली आहे. या निर्णयामुळे विवादीत रामजन्मभूमी अखंड हिंदूकडे आली आहे. श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठेक्षणी शतकांपासुनचा संघर्ष समाप्त होऊन, समस्त हिंदूना रामलल्लाच्या दर्शनाचा, पुजेचा मुक्त अधिकार प्राप्त होणार आहे.

हिंदू महासभेची धारणा आहे की, हा दिवस राष्ट्रीय दृष्टीने खुप महत्वाचा आणि विलक्षण आहे. रामलल्ला हे राष्ट्रीय अस्मितेचे प्रतिक आहेत. श्रीराम हिंदूचे अुच्च श्रद्धेयस्थान आहे, समस्त हिंदू त्यांना मर्यादा पुरुषोत्तम मानतात. संपुर्ण हिंदू जनतेच्या या धारणेस अनुसरुन, हिंदू जनभावनांचा आदर राखण्यासाठी आणि २२ जानेवारीचा राममंदिराच्या गर्भगृहातील, विलक्षण, अद्भुत, आनंदमयी, मंगलमय रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेचा सोहळा निरंतर अविस्मरणीय रहावा, यासाठी हा दिवस ” मर्यादा पुरुषोत्तम दिन ” केंद्र शासनाने घोषित करावा, अशी मागणी अखिल भारत हिंदू महासभेच्यावतीने निवेदनात करण्यात आली आहे.

Web Title: Declare 22 january ramlalla pranpratistha day as mariyada purushottam day hindu mahasabha demands governor

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 21, 2024 | 03:16 PM

Topics:  

  • Draupadi Murmu
  • ram mandir

संबंधित बातम्या

नववर्षाची सुरुवात करा रामाच्या दर्शनाने…IRCTC घेऊन आला बजेट फ्रेंडली पॅकेज
1

नववर्षाची सुरुवात करा रामाच्या दर्शनाने…IRCTC घेऊन आला बजेट फ्रेंडली पॅकेज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.