
नववर्षाची सुरुवात करा रामाच्या दर्शनाने...IRCTC घेऊन आला बजेट फ्रेंडली पॅकेज
2026 मध्ये कधी कधी आहेत लाँग वीकेंड? हॉलिडे लिस्ट पहा आणि ट्रॅव्हल प्लॅन बनवा
अयोध्या टूर पॅकेजची वैशिष्ट्ये
भगवान श्रीरामांचे जन्मस्थान असलेली अयोध्या ही भाविकांसाठी अत्यंत महत्त्वाची तीर्थनगरी आहे. रामलला मंदिराच्या भव्य उभारणीनंतर अयोध्येचे धार्मिक पर्यटन अधिकच वाढले आहे. भाविकांची वाढती संख्या लक्षात घेऊन IRCTC ने “राम लला दर्शन अयोध्या” हे खास टूर पॅकेज सुरू केले आहे. या पॅकेजचा कोड NDR012 असा आहे.
या यात्रेचा कालावधी १ रात्र आणि २ दिवसांचा असून, प्रवासासाठी रेल्वेचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये ये-जा, राहण्याची सोय तसेच भोजनाची संपूर्ण व्यवस्था IRCTC कडून केली जाते.
पॅकेजचा खर्च किती?
कोणकोणती ठिकाणे पाहता येणार?
या पॅकेजअंतर्गत अयोध्येतील प्रमुख धार्मिक स्थळांचे दर्शन घडवले जाईल. यामध्ये पवित्र सरयू नदी घाट, राम मंदिर,
हनुमानगढी, आणि कनक भवन यांचा समावेश आहे. हा आध्यात्मिक प्रवास ९ जानेवारी रोजी दिल्ली येथून सुरू होणार असून, प्रवाशांना रेल्वेने अयोध्येला नेण्यात येईल. नववर्षाची सुरुवात श्रद्धा, शांतता आणि भक्तीने करायची असेल, तर IRCTC चे हे अयोध्या टूर पॅकेज निश्चितच एक उत्तम पर्याय ठरू शकते.