10 - 12 persons attempted armed attack on woman, vandalized two vehicles
चिखलदरा : गत दहा वर्षांपासून नैसर्गिक आपत्तीने होरपळून निघलेल्या डोंगर दर्यातील शेतकऱ्यांवर यंदा पुन्हा ओल्या दुष्काळाचे संकट कोसळले आहे. खरीप पिकांची यंदा ओल्या दुष्काळाने राखरांगोळी करून पुन्हा आर्थिक संकटात (financial crisis) टाकले आहे. सतत सुरू असलेल्या पावसामुळे मेळघाटातील (Melghat ) शेतीविषयक कामासाठी पोषक वातावरण निर्माण झाले नसल्याने आदिवासी शेतकरी संकटात सापडला आहे. त्यामुळे, मेळघाटात ओला दुष्काळ (wet drought )घोषित करीत नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
पारंपरिक पिकासाठी प्रसिद्ध पावलेल्या आदिवासी भागातील शेतकऱ्यांना पुन्हा यंदा सावकारी सावकारी पाशात अडकून शेतात खरिप पिकांची पेरणी केली होती. पण पुन्हा वरूण राजाने डोळे वटारल्याने शेतकऱ्यांच्या मनसुब्यावर पाणी फेरले गेले. दुष्काळाने अनेक भागातील पिके पाण्याखाली आले आहे. सोयाबीन, धान, कोदो, कुटकी, सावा, मूग, उडीद, मका, गडमल, तिळ, ज्वारी, बाजरी, बरबटी, मिरची, तूर पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
चिखलदरा तालुक्यातील (Chikhaldara taluka) बहुतांश भागात पहाड असल्यामुळे येथे मुरमाळ जमिनीचे क्षेत्र जास्त आहे. या मुरमाळ जमिनीत मिरचीचे उत्पादन घेतले जाते. वरील पिके अती पावसामुळे शेतातच सडली. अश्या स्थितीत शेतकऱ्यांसह जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर अवस्थेकडे वाटचाल करीत आहे. शेतकऱ्यांच्या शेतातील पिके सडत आहे. अति पावसामुळे सोयाबीन शेतातच पाण्याखाली दाबल्या गेले आहे.
यंदा मेळघाटातील शेतकऱ्यांनी मका पिकाची विक्रमी पेरणी केली होती. पण, सतत पडणाऱ्या पावसामुळे मका पिकावर नवीन पालवी फुटल्याने हे पिक संकटात सापडले आहे. ज्वारी, मक्का तूर संकटात सापडले आहे. धान तर पूर्णपणे पाण्याखाली आहे. धान पीक पाण्यातच अतिवृष्टीने झोपले. सतत पंधरा वर्षांपासून आदिवासी भागातील रब्बी आणि खरीप हंगामात निसर्गाची वक्रदृष्टी पडत असल्यानंतरही सरकारने या भागाला दुष्काळग्रस्त जाहीर केले नाही. त्यामुळे दुष्काळात शेतकऱ्यांना सरकारकडून मिळणाऱ्या नुकसान भरपाई पासून वंचित राहावे लागले आहे.
यंदा पावसाने पहाडात कहर केल्यामुळे शेतकऱ्यांच्या खरीप पिकांचे अतोनात नुकसान झाले. मेळघाटाला दुष्काळग्रस्त जाहीर करण्याची मागणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy Chief Minister Devendra Fadnavis) यांची भेट घेऊन करणार आहे. पुरामध्ये वाहून मृत्यू झालेल्या कुटुंबाला मदत करण्यात यावी, अशी मागणी केली जाणार आहे.
प्रभुदास भिलावेकर, माजी आमदार मेळघाट
सतत नापिकीने त्रस्त्र असलेल्या मेळघाटाला दुष्काळग्रस्त (Drought affected Melghat ) जाहीर करावे. सरकारने शेतकऱ्यांच्या पिकांचे सर्वेक्षण करावे. तातडीने नुकसान भरपाई द्यावी अथवा आंदोलनात्मक पवित्रा घेण्यात येईल.
गणेश बडले, शेतकरी काटकुंभ
सततच्या मुसळधार पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. तूर, मका नष्ट झाले आणि सोयाबीन, ज्वारी हे पिक सुद्धा नष्ट झाले आहे. कृषी विभागाने (Department of Agriculture )पंचनामे करण्यासाठी चुरणी परिसरात फेरफटका मारला नाही. कृषी विभागाचा निष्काळजीपणा शेतकऱ्यांच्या जीवावर बेतणार आहे. तरी सरकारने बळीराजाला मदत करावी.
नरेंद्र टाले, शेतकरी चुरणी