शिवेसेनेच्या आमदारचं बंड आता आरोप प्रत्यारोपांच्या फेरीत अडकलं आहे. कधी संजय राऊत बंडखोर आमदारांवर टिका करताना दिसत आहे तर कधी बंडखोर नेते एकनाथ शिंदे त्यांना प्रत्युत्तर देताना दिसत आहे. अशातच आत बंडखोर आमदार दीपक केसरकर यांनी संजय राऊतांवर जोरदार टिका केली आहे. चुकीच्या सल्लागारांमुळे शिवसेना अडचणीत आली आहे, असं म्हणटलं आहे.
[read_also content=”‘शिवसेना वाचवताना आम्हाला मरण आलं तरी बेहत्तर…’एकनाथ शिंदेचं नव ट्विट चर्चेत! https://www.navarashtra.com/maharashtra/eknath-shinde-says-in-tweet-its-better-if-we-die-while-https://www.navarashtra.com/maharashtra/eknath-shinde-says-in-tweet-its-better-if-we-die-while-saving-shivsena-nrps-297472/saving-shivsena-nrps-297472.html”]
महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर आता राजकीय घडामोडी घडत आहे. एकनाथ शिंदे विरुद्ध शिवसेना गट हा वाद आता पेटला आहे. त्यात भर म्हणजे, शिवसेनेचे बंडखोर आमदारही टिका टिपण्णी करताना दिसत आहे. आता यामध्ये आमदार दिपक केसरकर यांनी सहभाग घेतल्याचं दिसत आहे. शिवसेनेला सध्या चांगल्या सल्लागाराची आवश्यकता असल्याचे केसरकर यांनी म्हटले आहे. पक्षात शांत लोक देखील आहेत, मात्र त्यांचं कितपत ऐकले जाते ही मी सांगू शकत नसल्याचे केसरकर म्हणाले. तसेच शरद पवार यांना भेटण्यापूर्वी उद्धव ठाकरे हे बंडखोरांशी तडजोड करण्यास तयार होते असेही दिपक केसरकर यांनी म्हटले आहे.
[read_also content=”फडणवीसाच्या सागर बंगल्यावर नेत्यांची खलबतं https://www.navarashtra.com/maharashtra/leader-at-sagar-bungalow-fadnavis-297455.html”]