Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या उपाध्यक्षपदी दीपक पवार बिनविरोध

नुकतेच नागपूर येथे झालेल्या कार्यकारणी व पदाधिकारी निवडीमध्ये महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या अध्यक्षपदी खासदार रामदास तडस (Ramdas Tadas) तर कुस्तीगीर परिषदेच्या सरचिटणीसपदी पैलवान काका पवार (Kaka Pawar) यांची तसेच संपूर्ण कार्यकारणीची बिनविरोध निवड झाली.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jul 27, 2022 | 04:06 PM
महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या उपाध्यक्षपदी दीपक पवार बिनविरोध
Follow Us
Follow Us:

मेढा : नुकतेच नागपूर येथे झालेल्या कार्यकारणी व पदाधिकारी निवडीमध्ये महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या अध्यक्षपदी खासदार रामदास तडस (Ramdas Tadas) तर कुस्तीगीर परिषदेच्या सरचिटणीसपदी पैलवान दीपक पवार (Kaka Pawar) यांची तसेच संपूर्ण कार्यकारणीची बिनविरोध निवड झाली.

यामध्ये तालीम संघ सातारा व जिल्हा तालीम संघाचे विश्वस्त दीपक साहेबराव पवार यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड घोषित करण्यात आली. नुकतीच सातारा येथे 64 वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडलेली त्याचबरोबर गेली 30 ते 35 वर्ष कुस्ती क्षेत्रासाठी व तालीम संघासाठी ते काम करीत आहेत. आपल्या शालेय जीवनापासून कुस्तीमध्ये राज्यस्तरीय व राष्ट्रीय स्तरीय स्पर्धेमध्ये यश संपादित केलेले आहे. त्याचबरोबर विद्यापीठ स्तरावरचे देखील त्यांनी कुस्तीमध्ये चमकदार कामगिरी केलेली आहे. आपल्या घराण्याची कुस्तीची परंपरा व कुस्ती क्षेत्रासाठी योगदान आणि क्रीडा प्रसारासाठी सातत्याने मदत करणे संस्था उभी राहण्यासाठी भरीव निधी आणणे हे दीपक पवारांचे श्रेय होय. महाराष्ट्र केसरी स्पर्धा जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धा असो अथवा तालीम संघाची उभारणी असो किंवा जिल्हा तालीम संघाच्या कामकाजामध्ये त्यांनी नेहमीच महत्त्वाचा वाटा उचललेला आहे.

वडील साहेबराव पवार (भाऊ) अध्यक्ष जिल्हा तालीम संघ सातारा हे गेली 70 वर्ष कुस्ती क्षेत्रासाठी आपले योगदान विनामूल्य देऊन आहेत. त्याचबरोबर गेली 60 वर्ष तालीम संघ सातारा व जिल्हा तालीम संघ सातारा, साहेबराव पवार (भाऊ) यांनी यशस्वीरित्या सुरळीत पार पाडत आहे. नुकतेच आपल्या तालीम संघाची साडेतीन एकराच्या क्षेत्रामध्ये उभी राहत असलेली आंतरराष्ट्रीय दर्जाची देशातील सर्वात मोठी तालीम उभी राहत आहे.

सुमारे 14 कोटी रुपयांचा असणारा हा प्रकल्प त्यातील 30 टक्के बांधकाम पूर्ण झालेले आहे. जिल्ह्यातील मुलांना तालीम संघामध्ये गेली 60 वर्षांमध्ये मोफत प्रशिक्षण व शालेय शिक्षण त्याचप्रमाणे प्रसंगी चांगल्या मल्लाला खुराक देखील पुरवला जात आहे. सुमारे दोनशे मल्लांचे निवासी व्यवस्था असलेली तालीम आता रूप घेत आहे. अशाप्रसंगी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेने साहेबराव पवार (भाऊ) यांच्या सलग 15 वर्ष उपाध्यक्ष पदानंतर पहिल्यांदाच दीपक पवार यांना ही संधी दिलेली आहे.

Web Title: Deepak pawar unopposed as vice president of maharashtra state wrestling council nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 27, 2022 | 04:06 PM

Topics:  

  • maharashtra
  • Medha

संबंधित बातम्या

Bhandara News: अन् ‘त्या’ शेतकऱ्याने आपला शब्द खरा केला- मृत्यूला कवटाळले! पालकमंत्र्यांसमोर व्यथा मांडूनही दिलासा नाही
1

Bhandara News: अन् ‘त्या’ शेतकऱ्याने आपला शब्द खरा केला- मृत्यूला कवटाळले! पालकमंत्र्यांसमोर व्यथा मांडूनही दिलासा नाही

SIR Process Protest: SIR प्रक्रियेला इंडिया आघाडीचा विरोध! शासन आणि निवडणूक आयोगाविरोधात आंदोलन; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
2

SIR Process Protest: SIR प्रक्रियेला इंडिया आघाडीचा विरोध! शासन आणि निवडणूक आयोगाविरोधात आंदोलन; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

Ahilyanagar Drought: अहिल्यानगरमध्ये दुष्काळाचे भीषण संकट; पिके जळाली, जनावरे विकण्याची शेतकऱ्यांवर वेळ
3

Ahilyanagar Drought: अहिल्यानगरमध्ये दुष्काळाचे भीषण संकट; पिके जळाली, जनावरे विकण्याची शेतकऱ्यांवर वेळ

Bhandara:शाळेच्या मैदानावर आढळल्या भानामतीच्या आकृत्या! पांढऱ्या रेषा, पूजासाहित्य, खिळे, लिंबू यांची सांगड; चर्चेला मोठे उधान
4

Bhandara:शाळेच्या मैदानावर आढळल्या भानामतीच्या आकृत्या! पांढऱ्या रेषा, पूजासाहित्य, खिळे, लिंबू यांची सांगड; चर्चेला मोठे उधान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.