Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

धरण क्षेत्रात पावसाची उघडीप तरीही पुराचा धोका कायम; कोल्हापूरची परिस्थिती नेमकी काय?

जिल्ह्यातील राधानगरी, दूधगंगा आणि वारणा धरणातून होत असलेला विसर्ग आणि धरण क्षेत्रात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत झपाट्यानं वाढ होत आहे. पंचगंगा नदीने इशारा पातळी ओलांडली आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Aug 21, 2025 | 01:51 PM
दिल्लीच्या अनेक भागात पूर परिस्थिती; यमुना नदीने ओलांडली धोक्याची पातळी, NDRF तैनात

दिल्लीच्या अनेक भागात पूर परिस्थिती; यमुना नदीने ओलांडली धोक्याची पातळी, NDRF तैनात

Follow Us
Follow Us:

कोल्हापूर : गेल्या काही दिवसांपासून राज्यात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पाणीच पाणी झाले आहे. जिल्ह्यात गेल्या पाच दिवसांपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे सर्वच नद्या दुथडी भरून वाहत आहेत. त्यामुळे पंचगंगा नदीचं उगमस्थान असलेल्या प्रयाग चिखलीचा परिसर जलमय झाला आहे. प्रयाग संगमाच्या ठिकाणी कुंभी, कासारी, तुळशी, धामणी आणि भोगावती या नद्यांचा संगम होत असल्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर पाणी जमा झाले आहे. आसपासची शेतीदेखील पाण्यामध्ये गेली आहे.

या संगमाच्या परिसरात असलेली काही मंदिरदेखील आता पाण्याखाली गेली आहेत. जिल्ह्यातील राधानगरी, दूधगंगा आणि वारणा धरणातून होत असलेला विसर्ग आणि धरण क्षेत्रात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत झपाट्यानं वाढ होत आहे. पंचगंगा नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. पाऊस असाच सुरू राहिला तर येत्या 24 तासांत पंचगंगा नदी धोका पातळी गाठू शकते. यामुळे कोल्हापूर महापालिका आणि जिल्हा प्रशासनाच्या वतीने पूरबाधित नागरिकांना स्थलांतराच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

सध्या भोगावती व पंचगंगा नदीत आलेला महापूर पाहता नदी गावा शेजारील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. मात्र, राधानगरी धरण पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाची जोर कमी झाल्याने राधानगरी धरणाचे फक्त दोन दरवाजे सुरू आहेत. त्यामुळे भोगावती नदीपात्रामध्ये येणारे पाण्याचा विसर्ग अत्यंत कमी असल्याने भोगावती नदीची व पंचगंगा नदीची पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता कमी झाली असली तरी पंचगंगा नदीने राजाराम बंधारे पातळी ४२.८ झाली असल्याने नदी धोका पातळी इशाराकडे जात आहे.

धरण पाणलोट क्षेत्रामध्ये कमी पाऊस व राधानगरी धरणाचे दोनच दरवाजे सुरू असल्याने भोगावती नदी काठच्या भागातील नागरिकांना थोडासा दिलासा मिळाला आहे. तरीही कोल्हापूरला जोडणारे अनेक रस्त्यावर पाणी आल्याने वाहतूक बंद आहे.

Web Title: Despite the rains in the dam area the risk of flooding remains in kolhapur

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 21, 2025 | 01:51 PM

Topics:  

  • Heavy Rain
  • Kolhapur Rain
  • Rain News

संबंधित बातम्या

देशभरात सप्टेंबरमध्ये 91 टक्क्यांपेक्षा कमी पावसाचा अंदाज; ऑगस्ट गेला कोरडाच, राज्यात तर…
1

देशभरात सप्टेंबरमध्ये 91 टक्क्यांपेक्षा कमी पावसाचा अंदाज; ऑगस्ट गेला कोरडाच, राज्यात तर…

Uttarakhand Landslide: नेपाळनंतर आता पावसाने उत्तराखंड हादरले; अल्मोड्यात भूस्खलनाचा कहर, घर मलब्याखाली दबले
2

Uttarakhand Landslide: नेपाळनंतर आता पावसाने उत्तराखंड हादरले; अल्मोड्यात भूस्खलनाचा कहर, घर मलब्याखाली दबले

राज्यातील पावसाबाबत महत्त्वाची अपडेट ! 18 जिल्हे ‘रेड झोन’मध्ये, 32 जिल्ह्यांत पावसाची तूट
3

राज्यातील पावसाबाबत महत्त्वाची अपडेट ! 18 जिल्हे ‘रेड झोन’मध्ये, 32 जिल्ह्यांत पावसाची तूट

Rain Update : देशातील 26 राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा; उत्तराखंड, हिमाचल प्रदेशात…
4

Rain Update : देशातील 26 राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा; उत्तराखंड, हिमाचल प्रदेशात…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.