जिल्ह्यातील राधानगरी, दूधगंगा आणि वारणा धरणातून होत असलेला विसर्ग आणि धरण क्षेत्रात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत झपाट्यानं वाढ होत आहे. पंचगंगा नदीने इशारा पातळी ओलांडली आहे.
राधानगरी तालुक्यतील राजर्षी शाहू सागर जलाशय काळमवाडी या तलावात 22 टीएमसी पाणीसाठा असून, अतिरिक्त पाणी विजगृहातून दुधगंगा नदीपात्रात विसर्ग सुरू ठेवला आहे.
गेल्या दोन दिवसात पडलेल्या मुसळधार पावसाने कोल्हापूर सह पश्चिम करवीर भागात पावसाने दणका दिला असून पुराचा वेढा पडला आहे. गेल्या दोन दिवसात पावसाने परत एकदा जोरदार सुरुवात केली आहे.
कोल्हापूर सांगली जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या चांदोली ता. शिराळा येथील वसंत सागर हे धरण ८५ टक्के भरले आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात दि. १ जून पासून आज अखेर १९४९ मिली मीटर पाऊस…
सध्या धरणक्षेत्रातही पाऊस सुरू असून, दूधगंगा धरण ५० टक्के भरले आहे. राधानगरी धरण ६५ तर वारणा ७० टक्के भरले आहे. शाहूवाडी, पन्हाळा, राधानगरी, आजरा, गगनबावडा तालुक्यांत तुलनेत अधिक पाऊस आहे.
जिल्ह्यात सर्वत्र पावसाचा जोर कायम असल्याने अनेक नद्या आणि ओढे दुथडी भरून वाहत आहेत. याचा थेट परिणाम जिल्ह्यातील वाहतुकीवर झाला असून, तब्बल ५६ बंधारे पाण्याखाली गेले असल्याने अनेक ग्रामीण भागांचा…
गेले अनेक दिवस राज्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. पुणे, सातारा, कोल्हापूर, कोकण किनारपट्टी भागात मुसळधार पाऊस सुरू आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक तालुक्यात खूप पाऊस सुरू आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील गगनबावडा, राधानगरी, भुदरगड तर राधानगरी धरण क्षेत्रात अतिवृष्टी झाल्याने सर्वत्र पाणी पाणी झाले आहे. या पावसामुळे ओढा, नाले दुथडी भरून वाहू लागले आहेत.
पावसाळ्यातही इतका मोठा पाऊस झाला नाही. पण अवघ्या काही तासात पाणी पाणी झाले. दुपारी तीन वाजल्यापासून पावसाला सुरुवात झाली. त्यानंतर अवघ्या दहा मिनिटांत मुसळधार पावसाला सुरुवात झाली. तासभर ढगफुटीसदृश पाऊस…
या मुसळधार पावसामुळे भुईबावडा घाटातील दरड कोसळली. तसेच करूळ घाटातील नवीन सुरू असलेला रस्ता या रस्त्यातील मोहरीमध्ये काही ठिकाणी पाण्यातून माती व झाड येऊन तटल्यामुळे अनेक ठिकाणी मोहरीतील नळे चॉकअप…
रिसरातील शेतकऱ्यांनी अमोघ, राजा, आर १, रत्ना ५ आदी बियाणांची पेरणी केली आहे. वारणा, काणसा आदी नद्यांना आलेल्या पुरामुळे या परिसरातील नदीकाठच्या भात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मात्र,…
शेतातील केळी काढण्यासाठी अकिवाट येथे पुराच्या पाण्यातून ट्रॅक्टर घेऊन जात असताना पाण्याचा अंदाज न आल्याने तसेच ट्रॅक्टर चालकाचा ट्रॅक्टरवरील ताबा सुटल्याने ट्रॅक्टर थेट नदीत कोसळून सात जण बेपत्ता झाले आहेत.
आजरा तालुक्यातील सर्वच प्रकल्प तुडुंब झाल्याने जराशा पावसातही हिरण्यकेशीमधील पाण्याचा विसर्ग वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे पावसाचा जोर वाढला तर नागरी वस्त्यांमध्ये पाणी शिरण्याची शक्यता आहे. नागरिकांनी सावधगिरी बाळगावी, असे आवाहन…
गगनबावडा, बोरबेट, वेसरफ, कोदे व बावेली इत्यादी ठिकाणी जोराचा पाऊस झाला. दिवसभर अतिशय जोरात वारे वाहत होते. बुधवारी दिवसभर किरवे ते लोंघे दरम्यानच्या रस्त्यावर पुराचे पाणी होते. त्यामुळे सलग चौथ्या…
सामाजिक कार्यकर्त्यांनी, ग्रामपंचायत पणोरे व शाळा व्यवस्थापन समिती तसेच सर्व तरुण मंडळाचे कार्यकर्ते व ग्रामस्थांकडून वेळोवेळी निवेदने आंदोलने करून देखील प्रशासनाच्या झालेल्या दुर्लक्षामुळे शाळेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शाळेत इयत्ता…
नृसिंहवाडी येथील कृष्णा व पंचगंगा नदीच्या पात्रात गेल्या २४ तासांत साधारण पाच फुटांनी वाढ झाली आहे. त्यामुळे दत्त मंदिर नव्वद टक्के पूर्णपणे पाण्याखाली गेलं आहे. नदीकाठच्या शेतात देखील सर्वत्र पाणी…
पंचगंगा 32.09 फुटांवरून वाहत असून, यंदा पहिल्यांदाच पाणी पात्राबाहेर पडले आहे. कोल्हापूर शहरात सगळीकडे पाणीच पाणी साचले. गगनबावडा, राधानगरी, शाहूवाडी, पन्हाळा, चंदगड, भुदरगड तालुक्यात पावसाचा जोर अधिक आहे. चंदगड तालुक्यात…