महाविकास आघाडीच्या नेत्यांची देवेंद्र फडणवीस यांच्याकडे विरोधी पक्षनेते आणि उपसभापतीपदाची मागणी
राज्यातील महायुती सरकारने राज्यातील वीज कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने वीज कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. महावितरण आणि महापारेषण या कंपन्यांतील कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मूळ पगारात १९ टक्के इतकी वाढ केली जाणार आहे.
महावितरण आणि महापारेषण या कंपन्यांमधील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मूळ पगारात १९ टक्के वाढ करण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना आता पगारवाढ मिळालेली आहे. उपमुख्यमंत्री आणि ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा अत्यंत मोठा निर्णय घेतला आहे. त्यामुळे महाराष्ट्र हे इतर राज्यांच्या तुलनेत सर्वाधिक वेतन देणारे राज्य ठरले आहे.
राज्य सरकारने घेतलेल्या या पगारवाढीच्या निर्णयामुळे कर्मचारी, अभियंते, अधिकारी आणि सहाय्यक अभियंते यांना लाभ होणार आहे. ही पगारवाढ मार्च २०२४ पासून लागू होणार आहे. पहिली पगारवाढ देखील देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना देण्यात आली होती. आज वीज कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीबाबत एक बैठक पार पडली. या बैठकीला सुधीर मुनगंटीवार, चंद्रशेखर बावनकुळे, तर धनंजय मुंडे हे ऑनलाईन उपस्थित होते.
राज्य सरकारच्या ऊर्जा विभागाच्या अधिपत्याखाली असलेल्या महावितरण, महानिर्मिती आणि महापारेषण या वीज कंपन्यांतील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात आता १९ टक्के वाढ करण्यात आली आहे. सह्याद्री अतिथीगृह येथे आज राज्य सरकारची एक बैठक पार पडली. या बैठकीत देवेंद्र फडणवीसांनी हा निर्णय जाहीर केला आहे.
राज्यात लवकरच विधानसभा निवडणूक होणार आहे. यासाठी महायुती आणि महविकासआघाडी जोरदार तयारी करत आहे. जागावाटपावर चर्चा सुरू आहे. दरम्यान महायुती सरकारने गेल्या दोन वर्षांत निर्णयाचा धडाका लावला आहे. दोन वर्षात आम्ही ६०० निर्णय घेतल्याचे मुख्यमंत्र्यानी सांगितले. तर यंदाच्या अर्थसंकल्पना राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार दर महिन्यास महिलांच्या खात्यात १,५०० रूपये जमा केले जाणार आहेत. तर गणेशोत्सवाच्या तोंडावर एसटी कर्मचाऱ्यांनी संपाचे हत्यार उपसले होते. मात्र राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. आता त्यांना मूळ वेतनात ६,५०० रुपये वाढ मिळणार आहे. तसेच मुलींना मोफत शिक्षण, शेतकऱ्यांना दिवस वीज देण्याचा निर्णय असे अनेक निर्णय महायुती सरकारने घेतल्याचे पाहायला मिळत आहे.