Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 3 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Baramati Politics: उजनीच्या पाण्यावर गदा आणणारा सव्वा लाख कोटींचा प्रकल्प नको!; धैर्यशील मोहिते-पाटील आक्रमक

Baramati Politics: राज्यामध्ये कोणतेही प्रकल्प येताना पारदर्शक पद्धतीने ते प्रकल्प आले पाहिजेत, यामध्ये राज्याचा विकास झाला पाहिजे, ही आमची भूमिका आहे. मात्र उजनी धरणावर चार प्रकल्प येत आहेत.

  • By anuradha sagar
Updated On: Oct 03, 2026 | 05:09 PM
Dhairyasheel Mohite Patil, Ujani Dam, Sharad Pawar,

Dhairyasheel Mohite Patil, Ujani Dam, Sharad Pawar,

Follow Us
Follow Us:
  • उजनी धरणावर सव्वा लाख कोटी रुपयांचे चार प्रकल्प गोपनीय पद्धतीने प्रस्तावित असल्याचा आरोप
  • AI डेटा सेंटर, फ्लोटिंग सोलर व ग्रीन हायड्रोजन प्रकल्पांमुळे शेती व पिण्याचे पाणी धोक्यात येण्याची भीती
  • धैर्यशील मोहिते-पाटील यांनी गोविंद बागेत शरद पवारांशी भेट घेऊन सविस्तर चर्चा
Baramati Politics: उजनी धरणावर प्रस्तावित संवाद लाख कोटींच्या प्रस्तावित चार प्रकल्पाचे नियोजन गोपनीय पद्धतीने सुरू असल्याची माहिती मिळत आहे, यामध्ये एआय डेटा सेंटर चा देखील समावेश आहे, वास्तविक पाहता या डेटा सेंटरला मोठ्या प्रमाणावर पाणी लागणार असल्याने त्याचा परिणाम उजनी धरणाच्या कार्यक्षेत्रातील शेतीसह पिण्याच्या पाण्यावर होणार असल्याने या प्रकल्पांना आपला विरोध राहणार असल्याची माहिती खासदार धैर्यशील मोहिते- पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

येथील गोविंद बाग या निवासस्थानी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची मोहिते पाटील यांनी भेट घेऊन या विषयासंदर्भात चर्चा केली. यानंतर माध्यमांशी ते बोलत होते.

Janatar Mantar Protest Breaking: ज्ञानेश कुमारांविरोधात राजकारण तापलं! जंतरमंतरवर आज पुन्हा मोठा राडा

यावेळी खा. धैर्यशील मोहिते -पाटील म्हणाले, राज्यामध्ये कोणतेही प्रकल्प येताना पारदर्शक पद्धतीने ते प्रकल्प आले पाहिजेत, यामध्ये राज्याचा विकास झाला पाहिजे, ही आमची भूमिका आहे. मात्र उजनी धरणावर चार प्रकल्प येत आहेत. यामध्ये सोलर प्रकल्प, ग्रीन हायड्रोजन तसेच एआय डेटा सेंटर या प्रकल्पांचा समावेश आहे.

AI डेटा सेंटर, फ्लोटिंग सोलर, ग्रीन हायड्रोजन

या प्रकल्पाचे काम अत्यंत गोपनीय पद्धतीने सुरू झाले आहे. उजनी मध्ये एकूण नऊ प्रकल्पाची कामे सुरू आहेत, यामध्ये उजनी उजवा व डावा कालव्याचे काम पूर्ण आहे, उर्वरित चार प्रकल्प अर्धवट अवस्थेत आहेत. यामध्ये काहींचे काम ८० टक्के पूर्ण झालेले आहे. अशा स्थितीत डेटा सेंटरला मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवश्यकता असते, हे जगमान्य आहे. गेल्या वर्षी सोलापूर जिल्ह्यात ६९० मिलिमीटर पाऊस झाला होता, यामध्ये उजनी ओव्हर फ्लो झाले होते, या भागातील नद्या नाले दुथडी भरून वाहत होते, तरी देखील मार्चमध्ये उजनी मधील पाणीसाठा मायनस मध्ये गेला.

Infertility: वंध्यत्व उपचारांसाठी मोठी सुविधा! प्रगत प्रजनन उपचारांची उपलब्धता होणार अधिक सक्षम

उजनीवर डेटा सेंटर उभारल्यास त्यासाठी मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवश्यकता भासणार आहे. वॉटर सप्लाय च्या पाण्यावर जलशुद्धीकरण यंत्रणा बसवल्यानंतर ६० पाण्याचा अपव्य होतो, तर ४० टक्के पाणी वापरता येते. मात्र उजनीचे पाणी मोठ्या प्रमाणावर प्रदूषित असल्याने या प्रकल्पामध्ये मोठ्या प्रमाणावर पाण्याचा अपव्यय होणार आहे. बाष्पीभवनाच्या माध्यमातून डेटा सेंटरसाठी पाण्याचा उपयोग केला जाणार असल्याची माहिती आपणास ऐकीव आहे.

उजनी धरण कार्यक्षेत्रातील शेतीचे सिंचन आणि पिण्याचे पाणी

या प्रकल्पामुळे पाण्याचा अपवे मठ्या प्रमाणावर होणार असल्याने उजनी धरणावरील शेतीच्या पाण्याचा प्रश्न भविष्यात गंभीर होण्याची शक्यता आहे. या संदर्भात आपण राज्याच्या मुख्य सचिवासह संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांकडे लेखी माहिती मागितली आहे, ती अद्याप मिळाली नसून , त्यांच्याकडून लेखी माहिती पंधरा दिवसात मिळणार आहे, त्यानंतर आपण सविस्तर याबाबत बोलणार असल्याचे खासदार धैर्यशील मोहिते -पाटील यांनी यावेळी सांगितले.

आज जेष्ठ नेते शरद पवार यांच्याशी इंदापूर तालुक्यातील सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसोबत चर्चा केली. या शेतकऱ्यांना प्रस्तावित प्रकल्पाबाबत नोटिसा आलेल्या आहेत. शेतकऱ्यांसह मच्छीमार व्यवसाय का नही या प्रकल्पाचा फटका बसणार आहे, डेटा सेंटर मधून निघणारे सांडपाण्याची व्यवस्था कशी केली जाणार आहे, याची माहिती देखील दिली पाहिजे.

पश्चिम महाराष्ट्रातील जिल्हा बँकांच्या निवडणुकीमध्ये भाजपने लक्ष घातल्याच्या प्रश्नावर खासदार मोहिते पाटील म्हणाले, सहकारामध्ये राजकारण आणले नाही पाहिजे, मात्र ते जाणीवपूर्वक आणले जात आहे.

 

Web Title: Dhairyasheel mohite patil opposes ujani dam data center project meets sharad pawar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 03, 2026 | 05:09 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.