Janatar Mantar Protest Breaking: ज्ञानेश कुमारांविरोधात राजकारण तापलं! जंतरमंतरवर आज पुन्हा मोठा राडा
AISA Protest Jantar Mantar Delhi Gyanesh Kumar Resignation : ऑल इंडिया स्टुडंट्स असोसिएशनचे (AISA) कार्यकर्ते शनिवारी नवी दिल्लीतील जंतर मंतर मैदानात पुन्हा जमल्याचे पाहायलामिळाले. कालच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जंतरमंतर परिसरा जमावबंदी लागू करण्यात आली होती. याशिवाय अतिरिक्त पोलीस बंदोबस्त, बॅरिकेड्स आणि कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. शुक्रवारी १,००० हून अधिक आंदोलकांना ताब्यात घेण्यात आले होते. हे आंदोलक मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या आणि मतदार यादीच्या एसआयआरच्या (SIR) विरोधात आंदोलन करत आहेत.
शुक्रवारी झालेल्या अटकेनंतर, AISA च्या राष्ट्रीय अध्यक्षा नेहा बोरा यांनी कार्यकर्त्यांना शनिवारी दुपारी १ वाजेपर्यंत जंतर मंतरवर परत येण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर आज पुन्हा देशभरातील विविध संघटनांचे कार्यकर्ते जंतरमंतर परिसरात दाखल झाल्याचे पाहायला मिळाले.
कार्यकर्ते जमल्याबरोबरच पोलिसांनी लोकांना ताब्यात घेण्यास सुरुवात केली. जंतर मंतरकडे (Jantar Mantar) जाणाऱ्या रस्त्यांवर बॅरिकेड्स उभारण्यात आले होते आणि अनेक ठिकाणी सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले होते.
शुक्रवारच्या आंदोलनात AISA, SFI, NSUI, AAP आणि इतर राजकीय व विद्यार्थी संघटनांचा समावेश होता. अटक करण्यात आलेल्यांमध्ये AAP चे नेते आणि कार्यकर्ते योगेंद्र यादव यांचाही समावेश होता. त्यानंतर आज पुन्हा जंतरमंतरवर मोठा गोंधळ झाला.
शुक्रवारी संध्याकाळी, नेहा बोरा यांनी एक व्हिडिओ संदेश जारी करत, आंदोलन सुरूच राहील आणि कार्यकर्त्यांनी जंतर मंतरवर परत यावे, असे आवाहन केले होते. तसेच, पोलिसांच्या अटकेला आंदोलक घाबरणार नाहीत आणि ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीच्या समर्थनार्थ जंतरमंतरवर संघटनेचे आंदोलन सुरूच ठेवणार असल्याची घोषणा केली होती. त्यानंतर आज दुपारी पुन्हा एकदा जंतरमंतरवर मोठ्या संख्येने आंदोलक जमा झाले होते.
Asian Games 2026: पराभवाच्या उंबरठ्यावरून थेट सुवर्णपदकावर झेप! कोरियाच्या हानवर Aman Sehrawat चा
दिल्ली पोलिसांनी शुक्रवारच्या आंदोलनाला परवानगी नाकारली. यानंतर दिल्लीत सुरक्षा वाढवण्यात आली. इतकेच नव्हे तर, जंतर मंतरच्या आसपासच्या रस्त्यांवर बॅरिकेड्स लावण्यात आले होते. शुक्रवारच्या आंदोलनादरम्यान परिसरातील अनेक मेट्रो स्थानके बंद ठेवण्यात आली होती.
दुसऱ्या दिवशीही जंतर मंतरच्या परिसरात पोलीस बंदोबस्त कायम आहे. आयसा (AISA) आणि इतर संघटना आपले आंदोलन पुढे नेण्याचा प्रयत्न करताना पाहायला मिळाल्या. पण पोलिस आणि आंदोलकांमध्ये बाचाबाची आणि धरपकड सुरू झाली. जंतरमंतर परिसरात बराच काळ मोठा तणावाचा होता.
मागील १० महिन्यांत निवडणूक आयुक्त सुखबीर सिंग संधू आणि विवेक जोशी यांनी एसआयआरशी संबंधित निर्णयांवर आणि आदेशांवर किमान १४ वेळा लेखी आक्षेप नोंदवल्याचे एका अहवालात उघड झाल्यानंतर काही दिवसांनी हे आंदोलन सुरू झाले आहे.






