बीड : बीडमधील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. 9 डिसेंबर रोजी त्यांचे अपहरण करुन हत्या करण्यात आली. या प्रकरणामुळे राज्याभरातून रोष व्यक्त करण्यात आला होता. आता या प्रकरणाची न्यायालयीन प्रक्रिया सुरु आहे. सीआयडी आणि एसआयटीने देखील या प्रकरणाचे दोषारोप पत्र दाखल केले आहे. मीडिया रिपोर्टनुसार, संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांचा जबाब हाती आला आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये त्यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी न्यायासाठी मोठा लढा दिला आहे. धनंजय देशमुख यांनी आपल्या जबाबामध्ये अपहरणाच्या दिवशी घडलेल्या घटना क्रमवार पद्धतीने सांगितल्या आहेत. यामध्ये वाल्मिक कराडच्या नावाचा देखील उल्लेख असून अपहरणानंतर त्यांना अनेक फोन केल्याचे देखील धनंजय देशमुख यांनी आपल्या जबाबामध्ये सांगितले आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, धनंजय देशमुख यांनी आपल्या जबाबामध्ये अनेक धक्कादायक बाबी उघड केल्या आहेत. ते म्हणाले आहेत की, बंधू संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर त्यांनी आरोपी विष्णू चाटे आणि वाल्मिक कराडला अनेकदा विनंतीसाठी फोन केले होते. फोनवरून त्यांनी आपल्या भावाला सोडण्याची 20 हून अधिकवेळा विनंती केली होती. मात्र, विनवणी करूनही आरोपींनी ऐकले नाही, असे धनंजय देशमुख म्हणाले आहेत.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे ते म्हणाले की, “आरोपी विष्णू चाटे यांनी वारंवार सांगितले की, दहा मिनिटात सोडतो, वीस मिनिटात सोडतो.. अर्ध्या तासात सोडतो. पण त्यांनी संतोष देशमुख यांना सोडलं नाही. त्यांची क्रूर हत्या करण्यात आली आहे. संतोष देशमुख यांना खंडणीच्या आड येऊ नकोस, नाहीतर जीवे मारू, अशी धमकी विष्णू चाटे याने याआधीच दिली होती. धनंजय यांनी सांगितले की, त्यांनी या धमकीनंतरही केज पोलीस ठाण्यात अपहरणाची तक्रार नोंदवली होती. मात्र, त्यानंतर परिस्थिती आणखी बिघडत गेली. शेवटी भावाची निघृण हत्या करण्यात आली,” असे धनंजय देशमुख हे आपल्या जबाबामध्ये म्हणाले आहेत.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
धनंजय देशमुख यांना त्यांच्या मित्रांकडून माहिती मिळाली होती की, “अवादा एनर्जी प्रकल्पावर संतोष देशमुख यांना मारहाण करण्यात आली आहे. हीच माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तातडीने आरोपींना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, आरोपींनी संतोष देशमुख यांना वारंवार मारहाण करण्यात आली. ज्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. याचे हृद्यद्रावक असे फोटो देखील समोर आले होते. संतोष देशमुख यांना अतिशय अमानुषपणे मारहाण करण्यात आली. या प्रकरणामध्ये त्यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी जबाब नोंदवला आहे.
https://youtu.be/rrBVgz5ZOKk?si=rRHOxMWSfz4rQ3Er