मुंबई दहशदवादी आरोपी तहव्वुर हुसैन राणा याला भारतात आणण्यापूर्वी अमित शाहांचा इशारा (फोटो - सोशल मीडिया)
मुंबई : आज देशभरामध्ये तहव्वुर हुसैन राणा याचे नाव चर्चेत आहे. मुंबईवरील 26/11 दहशतवादी हल्ल्यातीला हा मास्टरमाईंड आहे. आज त्याला अमेरिकतून भारतामध्ये आणण्यात येणार आहे. त्याचे भारतामध्ये आज (दि.10) प्रत्यर्पण होणार आहे. ते रद्द करण्यासाठी तहव्वुर हुसैन राणा याने याचिका दाखल केली होती. मात्र अमेरिकेच्या सुप्रीम कोर्टाने राणाची प्रत्यर्पण रद्द करण्याची याचिका फेटाळून लावल्यानंतर त्याला भारतात आणण्याची पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरु झाली. आरोपी तहव्वुर हुसैन राणा याला भारतामध्ये आणले जाणार आहे. यापूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे वक्तव्य महत्त्वपूर्ण ठरत आहे. केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी कठोर भूमिका घेत भारताच्या भूमी अन् लोकांवर हल्ला केला त्याला शासन झालेच पाहिजे, अशी आक्रमक भूमिका घेतली आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आरोपी तहव्वुर हुसैन राणा याला भारतात आणणे हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कुटनीतीचा विजय असल्याचे म्हटले आहे. अमित शाह म्हणाले की, तहव्वुर हुसैन राणाच प्रत्यपर्ण हा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कुटनितीचा मोठा विजय आहे. भारताचा सन्मान, भूमी आणि लोकांवर हल्ला करणाऱ्यांना शिक्षा व्हावी हा मोदी सरकारचा प्रयत्न आहे. तहव्वुर हुसैन राणाला इथे आणून त्याच्याविरोधात खटला चालवून त्याला शिक्षा होईल. मोदी सरकारच हे मोठं यश आहे, अशी भूमिका केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी घेतली आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे त्यांनी या मुंबई 26/11 दहशदवादी हल्ल्यामध्ये दुर्दैवी मृत्यू झालेल्यांची आठवण काढली तसेच तत्कालीन सरकारवर निशाणा साधला. ते म्हणाले की, “मुंबईवर 2008 साली दहशतवादी हल्ला झाला, त्यावेळी सत्तेत असणाऱ्यांनी राणाला भारतात आणून खटला चालवला नाही. तहव्वुर हुसैन राणा हा मुंबईवरील हल्ल्याच्या कटाचा मुख्य सूत्रधार डेविड कोलमॅन हेडली उर्फ दाऊद गिलानीचा जवळचा मित्र आहे. राणाने मुंबईत येऊन रेकी केली होती. म्हणजे जिथे हल्ला करायचा, त्या ठिकाणांची पाहणी केली होती. 26/11 चा हल्ला हा आजवरचा मुंबईवरचा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला आहे. पाकिस्तानातून आलेल्या 10 दहशतवाद्यांनी मुंबईच्या विविध भागात जाऊन बेछूट गोळीबार, बॉम्बस्फोट केले होते. त्यामुळे अनेक निष्पाप नागरिक आपल्या प्राणाला मुकले होते, अशी भूमिका अमित शाह यांनी व्यक्त केली आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
मुंबई हल्ल्याचा सूत्रधार तहव्वुर हुसैन राणा याच्यावर अनेक प्रकारचे खटले आहेत. यामध्ये गुन्हेगारी कट रचणे, भारत सरकारविरुद्ध युद्ध पुकारणे, खून, बनावटगिरी आणि बेकायदेशीर कारवाया (प्रतिबंध) कायदा यासह अनेक कलमांखाली आरोप ठेवण्यात आले. त्याला अमेरिकेतून भारतात आणत असल्यामुळे या परिस्थितीत राजधानी दिल्लीत सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. दिल्ली मेट्रोने जेएलएन स्टेडियम मेट्रो स्टेशनचा गेट क्रमांक २ बंद केला आहे. हे गेट एनआयए मुख्यालयाजवळ आहे. भारतात आल्यानंतर तहव्वुर राणा याची वैद्यकीय तपासणी केली जाईल आणि त्यानंतर एनआयए त्याला न्यायालयात हजर करेल. अमेरिकेतून भारतात आणल्यानंतर राणाला तिहार तुरुंगाच्या उच्च सुरक्षा वॉर्डमध्ये ठेवता येण्याची शक्यता आहे.