Suresh Dhas : “लोकसभेला पंकजा मुंडेंचा पराभव धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्यामुळेच झाला”; भाजपच्या नेत्याचा गौप्यस्फोट
बीड : राज्यामध्ये लवकरच विधानसभा निवडणूका होणार आहेत. त्यामुळे यंदाचा दसरा जोरदार गाजणार आहे. दसराच्या निमित्ताने राज्यामध्ये चार राजकीय दसरा मेळावा होणार आहे. मुंबईमध्ये ठाकरे गट प्रमुख उद्धव ठाकरे व शिंदे गटाचे प्रमुख मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दसरा मेळावा होणार आहे. तर बीडमध्ये पंकजा मुंडे व मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांचा दसरा मेळावा होणार आहे. त्यामुळे तुफान राजकीय टोलेबाजी ऐकायला मिळणार आहे. सध्या पंकजा मुंडे यांच्या दसरा मेळाव्याची जोरदार चर्चा रंगली आहे. याचे कारण म्हणजे पहिल्यांदाच मंत्री धनंजय मुंडे आणि विधान परिषदेच्या आमदार पंकजा मुंडे हे एकत्रित येणार आहे. त्यामुळे मुंडे भावा-बहिणीच्या या दसरा मेळाव्याने लक्ष वेधले आहे.
दसराच्या दिवशी पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा पार पडत असतो. भगवानबाबा गडावर हा दसरा मेळावा गाजत असतो. राजकीय वर्तुळामध्ये या मेळाव्याची जोरदार चर्चा होत असते. यंदा या चर्चेचे कारण धनंजय मुंडे ठरले आहे. मंत्री धनंजय मुंडे आणि भाजपच्या विधान परिषदेच्या आमदार पंकजा मुंडे हे भावंड तब्बल 12 वर्षांनंतर भगवानगडावरील दसरा मेळाव्यात एकत्र येणार आहेत. धनंजय मुंडे यांनी दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्याविरोधात भूमिका घेतली. त्यामुळे मुंडे परिवारामध्ये फुट पडली होती. गोपीनाथ मुंडे यांचे 2014 साली निधन झाल्यानंतर पंकजा मुंडे दसरा मेळवा गाजवत होत्या. आता मात्र धनंजय मुंडे देखील त्यांच्यासोबत असणार आहेत. धनंजय मुंडे हे अनेक वर्षांनंतर भगवानबाबा गडावर दसर मेळाव्याला उपस्थित राहणार असल्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह दिसून येत आहे. बीडमध्ये सर्वत्र पोस्टरबाजी करण्यात आली असून मुंडे परिवाराच्या समर्थकांनी दोन्ही भावंडच्या या राजकीय भूमिकेने एकत्रित आल्याने समाधान व्यक्त केले आहे.
हे देखील वाचा : ‘मीच मुख्यमंत्री होणार..’; नाना पटोलेंच्या वक्तव्याने उडवली उद्धव ठाकरेंची झोप
2023 साली उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पक्षामध्ये वेगळी भूमिका घेतली आणि महायुतीमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला. यामुळे अजित पवार व भाजप यांची युती झाली. धनंजय मुंडे यांनी अजित पवार यांची साथ दिल्यामुळे ते देखील महायुतीमध्ये सामील होत मंत्री झाले. तेव्हापासून पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे पुन्हा एकत्रित आलेले पाहायला मिळाले आहेत. लोकसभा निवडणूकीमध्ये पंकजा मुंडे यांना संधी मिळाल्यानंतर धनंजय मुंडे यांनी जीव तोडून प्रचार केला. मात्र पंकजा मुंडे यांचा पराभव झाल्यामुळे धनंजय मुंडे यांनी खंत व्यक्त केली होती.
चलो भगवान भक्तीगड…!
आपला दसरा, आपली परंपरा…! ही परंपरा जोपासत आपल्याशी संवाद साधून विचारांचे सोने लुटायला या वर्षी प्रथमच मीही येतोय, भगवान भक्तीगडावर सावरगाव घाट येथे. या विजयादशमीला संत भगवानबाबांचे आशीर्वाद घ्यायला मी येतोय, तुम्हीही या…!@Pankajamunde#DasaraMelava… pic.twitter.com/1vsijDnh2Y
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) October 10, 2024
मंत्री धनंजय मुंडे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत दसरा मेळाव्याला येण्याचे आवाहन केले धनंजय मुंडे यांनी पोस्टमध्ये लिहिले आहे की, चलो भगवान भक्तीगड…! आपला दसरा, आपली परंपरा…! ही परंपरा जोपासत आपल्याशी संवाद साधून विचारांचे सोने लुटायला या वर्षी प्रथमच मीही येतोय, भगवान भक्तीगडावर सावरगाव घाट येथे. या विजयादशमीला संत भगवानबाबांचे आशीर्वाद घ्यायला मी येतोय, तुम्हीही या…! असे मंत्री धनंजय मुंडे यांनी लिहिले आहे.