Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dhananjay Munde- Karuna Munde: ‘मुलं तुमची म्हणता मग करुणा…’; कोर्टाच्या सवालाने धनंजय मुंडेंची कोंडी

वांद्रे कौटुंबिक न्यायालयाने हा निर्णय घेतला आहे. कोर्टाने धनंजय मुंडे यांना मोठा धक्का दिला असून यामुळे धनंजय मुंडेंच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Nov 27, 2025 | 05:13 PM
Dhananjay Munde- Karuna Munde: 'मुलं तुमची म्हणता मग करुणा...'; कोर्टाच्या सवालाने धनंजय मुंडेंची कोंडी

Dhananjay Munde- Karuna Munde: 'मुलं तुमची म्हणता मग करुणा...'; कोर्टाच्या सवालाने धनंजय मुंडेंची कोंडी

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई: राज्याचे माजी मंत्री आणि राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचे नेते धनंजय मुंडे यांच्या विरोधात करुणा मुंडे यांनी आवाज उठवला आहे. दरम्यान वांद्रे कोर्टात झालेल्या सुनावणीत कोर्टाने धनंजय मुंडे यांना करुणा मुंडे यांना दर महिना 2 लाखांची पोटगी देण्याचे निर्देश दिले होते. याविरोधात धनंजय मुंडे यांनी वरच्या कोर्टात आव्हान दिले होते. त्यावर आज सुनावणी पार पडली. दरम्यान या सुनावणीमध्ये नेमके काय घडले हे जाणून घेऊयात.

धनंजय मुंडे यांनी वांद्रे कोर्टाच्या निर्णयाला वरच्या कोर्टात आव्हान दिले होते. त्या याचिकेवर आज सुनावणी पार पडली. यावेळी करुणा शर्मा यांच्यासोबत अधिकृत लग्न झालेले नाही असा युक्तीवाद मुंडे यांच्या वकिलांनी कोर्टात केला. धनंजय मुंडे यांनी मुलांना स्वीकारले आहे, पण त्यांच्या आईशी लग्न केलेले नाही असा युक्तीवाद करण्यात आला. तसेच करुणा मुंडे यांचे वार्षिक उत्पन्न हे जवळपास 15 लाखांच्या आसपास आहे. त्या आर्थिकदृष्ट्या सक्षम आहेत. तरी देखील त्यांनी पोटगीसाठी अर्ज केला आहे, असा युक्तीवाद वकिलांनी केला. दरम्यान, मूल तुमची आहे म्हणता मग मग करुणा मुंडे तुमच्या पत्नी कशा नाहीत असा सवा कोर्टाने उपस्थित केला.

दरम्यान करुणा मुंडे यांच्या वकिलांनी देखील कोर्टात युक्तीवाद केला. यावेळी धनंजय मुंडे आणि करुणा शर्मा यांचे लग्न झाले आहे. त्यांचे एकत्रित फोटो देखील आहेत, असे वकिलांनी सांगितले. त्यावर करुणा शर्मा यांचे धनंजय मुंडे यांच्याशी लग्न झाले आहे याचा तुमच्याकडे काय पुरावा आहे असा सवाल कोर्टाने विचारला. त्यावर पुरावे सादर करण्यासाठी आम्हाला वेळ हवा आहे असे करुणा मुंडे यांच्या वकिलांनी सांगितले. आता या प्रकरणाची पुढील सुनावणी 5 एप्रिलला होण्याची शक्यता आहे.

करुणा मुंडेना दरमहा एवढी पोटगी

करुणा मुंडे यांनी दरमहा 15  लाख रुपये पोटगी देण्याची मागणी केली होती. मात्र कोर्टाने दिलासा दिल्यानंतर करुणा मुंडे यांना दरमहा 2 लाख रुपये पोटगी देण्याचे आदेश कोर्टाने मंत्री धनंजय मुंडे यांना दिले आहे. वांद्रे कौटुंबिक न्यायालयाने हा निर्णय घेतला आहे. कोर्टाने धनंजय मुंडे यांना मोठा धक्का दिला असून यामुळे धनंजय मुंडेंच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे.

धनंजय मुंडे यांच्या पूर्व पत्नी करुणा मुंडे यांनी गंभीर आरोप केले होते. घरगुती हिंसाचाराचे आरोप करुणा मुंडे यांनी गंभीर आरोप केले होते. करुणा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांच्याविरोधात कौटुंबिक न्यायालयामध्ये हिंसाचाराची केस दाखल केली होती. यामध्ये कोर्टाने धनंजय मुंडे यांना धक्का दिला आहे. वांद्रे कौटुंबिक न्यायालयाने धनंजय मुंडेंना दोषी ठरवले आहे. करुणा मुंडे यांचे आरोप कोर्टाने स्वीकारले आहेत.

Karuna Dhananjay Munde : मंत्री धनंजय मुंडे घरगुती हिंसाचारामध्ये दोषी; करुणा मुंडेना दरमहा एवढी पोटगी

धनंजय मुंडे यांच्या पूर्व पत्नी करुणा मुंडे यांनी एका वाहिनीशी संवाद साधला. यावेळी त्यांनी कौटुंबिक न्यायालयाचे आभार मानले आहेत. करुणा मुंडे म्हणाल्या की, “न्यायालयाचे मी खूप आभार मानते. आज सत्याचा विजय झाला आहे. लोकांना असं वाटतं की कोर्टामध्ये न्याय मिळत नाही, पण मला न्याय मिळाला आहे. औरंगाबाद कोर्टामध्ये देखील माझा विजय झाला होता. आता वांद्रे कौटुंबिक न्यायालयामध्ये देखील माझा विजय झाला आहे. त्यामुळे न्यायालयाचे आणि न्यायाधीश यांचे आभार मानते,” असे मत करुणा मुंडे यांनी व्यक्त केली आहे.

Web Title: Dhananjay munde karuna sharma munde never officially married lawyer argue at court 5 april next hearing marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 29, 2025 | 02:56 PM

Topics:  

  • dhananjay munde
  • karuna munde
  • karuna Sharma

संबंधित बातम्या

Maharashtra Politics: राजकारण तापले! सुनेत्रा पवारांविरोधात करुणा मुंडेंकडून उमेदवारी अर्ज दाखल
1

Maharashtra Politics: राजकारण तापले! सुनेत्रा पवारांविरोधात करुणा मुंडेंकडून उमेदवारी अर्ज दाखल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.