Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dhananjay Munde : धनंजय मुंडेंनी घेतली अजित पवारांची भेट; राजीनामा देण्याच्या मागणीदरम्यान पडद्यामागे दोन तास चर्चा

धनंजय मुंडे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली असून तब्बल दोन तास पडद्यामागे चर्चा झाली आहे. याबाबत धनंजय मुडे यांनी मात्र माध्यमांसमोर कोणतीही माहिती दिली नाही.

  • By संदीप गावडे
Updated On: Jan 06, 2025 | 05:35 PM
धनंजय मुंडेंनी घेतली अजित पवारांची भेट; राजीनामा देण्याच्या मागणीदरम्यान पडद्यामागे दोन तास चर्चा

धनंजय मुंडेंनी घेतली अजित पवारांची भेट; राजीनामा देण्याच्या मागणीदरम्यान पडद्यामागे दोन तास चर्चा

Follow Us
Close
Follow Us:

बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरू राज्याचं राजकीय वातावरण तापलं आहे. या प्रकरणावरून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. त्यातचं आज धनंजय मुंडे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली असून तब्बल दोन तास पडद्यामागे चर्चा झाली आहे. याबाबत धनंजय मुडे यांनी मात्र माध्यमांसमोर कोणतीही माहिती दिली नाही. नववर्षाच्या अजित पवारांनी शुभेच्छा दिल्याचं त्यांनी सांगितलं.

सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी राज्यातील वातावरण ढवळून निघालं आहे. या प्रकरणामुळे धनंजय मुंडे अडचणीत सापडले असून त्यांचे कथित साथीदार वाल्मिक कराड यांची सीआयडी चौकशी सुरू आहे. या प्रकरणी सातत्याने नवनवे खुलासे समोर येत आहेत. या प्रकरणातील आरोपींना आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. तर दुसरीकडे राज्यात मंत्रिमंडळ विस्तार होऊन तीन आठवडे उलटले तरी पालकमंत्री ठरलेले नाहीत. तिन्ही पक्षांतील अंतर्गत रस्सीखेचमुळे पालकंत्रीपदावर शिक्कामोर्तब होत नसल्याचं समजतं. या संपूर्ण पार्श्वभूमीवर आज धनंजय मुंडे यांनी अजित पवार यांची भेट घेतली आहे.

आमदार सुरेश यांच्याकडून वाल्मिक कराडची पोलखोल

बीडचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात भाजप आमदार सुरेश धस पहिल्या दिवसापासून मंत्री धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप करत आहेत. या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड, सुदर्शन घुले, सुधीर सांगळेला अटक कऱण्यात आली. यानंतर या प्रकरणाचा सीआयडी तपास अद्यापही सुरूच आहे. पण अटकेनंतही वाल्मिक कराडचे नवनवे प्रताप कारनामे समोर येतच आहेत. बीड आणि परभणीनंतर काल पुण्यात जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात आमदार सुरेश धस यांनी पुन्हा एकदा वाल्मिक कराडची पोलखोल केली आहे.

गेल्या वर्षी 14 जूनला अवादा कंपनीचे अधिकारी आणि वाल्मिक कराड, नितीन बिक्कड यांची बैठक झाली होती. ही बैठक थेट धनंजय मुंडे यांच्या परळीतील बंगल्यावर बैठक झाली. या बैठकीनंतर अवादा कंपनीच्या शुक्ला नावाचा अधिकारी धनंजय मुंडे यांची भेट घेण्यासाठी मुंडे यांचे स्वीय सहाय्यक प्रशांत जोशी यांच्याकडे प्रयत्न करत होते. पण धनंजय मुंडेची भेट घेण्यासाठी वाल्मिक कराडचा इगो दुखावला गेला. त्यामुळे त्याने प्रशांत जोशी यांना खडसावल्याचे सुरेश धस यांनी सांगितलं.

धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी

सरपंच संतोष देशमुख प्रकरणात धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी विरोधक आक्रमक झाले आहेत. सर्वपक्षीय शिष्टमंडळानं राज्यपालांची भेट घेत धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली. माजी खासदार संभाजीराजे, विधानसभेचे माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, खासदार बजरंग सोनावणे, आष्टीचे भाजपाचे आमदार (भाजप) सुरेश धस, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, आमदार संदीप क्षीरसागर आणि ज्योती मेटे यांनी राज्यपालांची भेट घेतली. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतील आरोपींवर कठोर कारवाई व्हावी, यासाठी आज सर्वपक्षीय शिष्टमंडळानं राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. बीडमध्ये खंडणी, अपहरण आणि इतर गुन्ह्यांचे प्रमाण वाढलं आहे. सरपंच संतोष देशमुख प्रकरण हे बीडमधील बिघडलेल्या कायदा आणि सुव्यवस्थेचे उदाहरण असल्याचे शिष्टमंडळानं राज्यपालांना सांगितलं. पोलिसांच्या कथित निष्काळजीपणा आणि पक्षपातीपणामुळे बीड जिल्ह्यात अशांतता पसरली आहे. राज्यभरातील सार्वजनिक सुरक्षेला गंभीर धोका निर्माण झाला आहे, असे शिष्टमंडळानं म्हटले आहे.

Web Title: Dhananjay munde meets dcm ajit pawar during demands resignation on santosh deshmukh case beed crime

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 06, 2025 | 05:17 PM

Topics:  

  • ajit pawar

संबंधित बातम्या

Ajit Pawar Plane Crash: अजित पवारांच्या विमान अपघातानंतर DGCA ची मोठी कारवाई; घेतला ‘हा’ मोठा निर्णय
1

Ajit Pawar Plane Crash: अजित पवारांच्या विमान अपघातानंतर DGCA ची मोठी कारवाई; घेतला ‘हा’ मोठा निर्णय

शोकसभेत फडणवीसांकडून अजितदादांच्या कार्याला भावपूर्ण श्रद्धांजली, कामाचं केलं भरभरून कौतुक
2

शोकसभेत फडणवीसांकडून अजितदादांच्या कार्याला भावपूर्ण श्रद्धांजली, कामाचं केलं भरभरून कौतुक

Hasan Mushrif : मुश्रीफांनी सांगितली दादांची आठवण
3

Hasan Mushrif : मुश्रीफांनी सांगितली दादांची आठवण

Ajit Pawar : सुमित कपूर हा सुसाईड बॉम्बर होता का? अमोल मिटकरी यांचा अजित पवारांच्या अपघाताबाबत खळबळजनक दावा
4

Ajit Pawar : सुमित कपूर हा सुसाईड बॉम्बर होता का? अमोल मिटकरी यांचा अजित पवारांच्या अपघाताबाबत खळबळजनक दावा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.