धनंजय मुंडेंच्या आई शेतात राहायला का गेल्या? सुरेश धसांच्या टीकेनंतर मुंडेंचीच पोस्ट
मुंबई: सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात आणि खंडणी प्रकरणात बीड कारागृहात असलेल्या आरोपी वाल्मिक कराडवर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी गंभीर आरोप केले होते. वाल्मिक कराड आणि मंत्री धनंजय मुंडे यांचे संबंधही संपूर्ण बीडमध्ये प्रसिद्ध आहेत. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून धनंजय मुंडे यांच्याही राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली होती. अशातच अंजली दमानिया यांनी काल उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेत धनंजय मुंडे व त्यांच्या कुटुंबीयांचे वाल्मिक कराडशी असलेले व्यक्तिगत आणि आर्थिक संबंध याबाबतचे पुरावे अजित पवारांना सादर केले.
इतकेच नव्हे तर, आपण दिलेले पुरावे अजित पवार यांनी बारकाईने तपासले असून ते अत्यंत गंभीर स्वरूपाचे आहेत. त्यामुळे धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला जाईल, असा विश्वास दमानियांनी व्यक्त केला. तसेच, आज दुपारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले होते. त्यानंतर कॅबिनेट बैठकीनंतर मंत्री धनंजय मुंडे यांनीच मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन चर्चा केली. या भेटीबाबत माध्यमांशी बोलताना अंजली दमानिया यांच्या राजीनाम्याच्या मागणीबाबत विचारले असता, धनंजय मुंडेंनी आपण उत्तर देणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
अजंली दमानिया यांच्या राजीनाम्याचा मागणीबाबत विचारले असता त्यावर प्रतिक्रीया देण्यास नकार देत धनंजय मुंडे म्हणाले की, “अंजली दमानिया आणि अजित पवार यांची भेट झाल्याने याबाबतचे उत्तर देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हेच देतील, अशी माझी अपेक्षा आहे. राखेसंदर्भात थर्मस पॉवर स्टेशनचा तो कचरा आहे, तो कचरा साफ करायचं काम संबंधित स्टेशनचं आहे, असे सर्वोच्च न्यायालयाने 2006 च्या निर्णयात म्हटलं आहे. त्यामुळे, त्याठिकाणी प्रॉफिट ऑफ बेनिफिटचा प्रश्नच निर्माण होत नाही.
भारत-चीन संबंध सकारात्मकतेच्या दिशने; कैलास मानसरोवर यात्रा पुन्हा सुरु होणार, विमानसेवाही
गेल्या काही दिवसांपासून अंजली दमानिया वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडेंच्या जवळकीसंदर्भात गंभीर आरोप करत आहेत. वाल्मिक कराड आणि बीडमधील त्याच्या दहशतीचे आणि दोघांच्या संबंधांचे पुरावेही दिले आहेत. त्यानंतर अजित पवार धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतील, असी विश्वासही त्यांनी व्यक्त केला होता. पण अजित पवार यांनी धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला नाही तर मी सरन्यायाधीशांना पत्र लिहून यासंदर्भात हस्तक्षेप करण्याची विनंतरी करणार आहे, असंही दमानिया यांनी यावेळी सांगितलं.