Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 26 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dharashiv News: धाराशिव उद्योग-गुंतवणुकीसाठी सज्ज; ७,५३४ कोटींच्या गुंतवणुकीतून ७,५०० रोजगारांची अपेक्षा

Dharashiv News: धाराशिव जिल्ह्यात औद्योगिक विकासाला गती देण्यासाठी ७,५३४ कोटी रुपयांच्या गुंतवणुकीतून सुमारे ७,५०० रोजगार निर्माण होण्याची अपेक्षा आहे. केवळ सामंजस्य करारांपुरते मर्यादित न राहता ‘MoU ते प्रत्यक्ष गुंतवणूक, उद्योग आणि रोजगार’ हा विकासाचा मार्ग असावा, असे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केले.

  • By श्वेता झगडे
Updated On: Aug 26, 2026 | 06:23 PM
धाराशिव उद्योग-गुंतवणुकीसाठी सज्ज; ७,५३४ कोटींच्या गुंतवणुकीतून ७,५०० रोजगारांची अपेक्षा

धाराशिव उद्योग-गुंतवणुकीसाठी सज्ज; ७,५३४ कोटींच्या गुंतवणुकीतून ७,५०० रोजगारांची अपेक्षा

Follow Us
Follow Us:
  • धाराशिव उद्योग-गुंतवणुकीसाठी सज्ज
  • ७,५३४ कोटींच्या गुंतवणुकीतून ७,५०० रोजगारांची अपेक्षा
  • MoU ते प्रत्यक्ष गुंतवणूक
धाराशिव : जिल्ह्यात उद्योग उभारणीसाठी मोठ्या संधी असून धाराशिव उद्योग, गुंतवणूक आणि रोजगारनिर्मितीसाठी सज्ज आहे. स्थानिक साधनसंपत्तीचा योग्य वापर करून उद्योग उभारावेत, स्थानिक तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात आणि धाराशिवला राज्याच्या औद्योगिक नकाशावर महत्त्वाचे केंद्र म्हणून विकसित करावे, असे आवाहन पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी केले.

‘जिल्हा गुंतवणूक परिषद–धाराशिव २०२६’चे पालकमंत्री सरनाईक यांनी ऑनलाइन उद्घाटन केले. यावेळी ते मार्गदर्शन करत होते. परिषदेत ३७ उद्योगांसोबत तब्बल ७ हजार ५३४ कोटी ८५ लाख रुपयांचे सामंजस्य करार करण्यात येणार असून, त्यातून सुमारे ७ हजार ५०० रोजगारनिर्मिती अपेक्षित असल्याचे त्यांनी सांगितले.

“ही केवळ आकडेवारी नसून धाराशिवच्या हजारो कुटुंबांच्या आशा आणि तरुणांच्या रोजगाराच्या संधी आहेत. केवळ MoU होणे हे आपले ध्येय नसावे. MoU ते प्रत्यक्ष गुंतवणूक, गुंतवणुकीतून उद्योग आणि उद्योगातून रोजगार, हा आपला विकासाचा मार्ग असला पाहिजे,” असे सरनाईक यांनी स्पष्ट केले.

Dharashiv News: वीजचोरी ते फिडर ट्रिपिंग; महावितरणचा अधिकाऱ्याला दणका! अधीक्षक अभियंता संजय आडे यांच्यावर निलंबनाची कारवाई

कृषी, कृषीपूरक उद्योग, अन्नप्रक्रिया, अक्षय ऊर्जा, पर्यटन तसेच सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांच्या माध्यमातून जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला मोठी चालना मिळू शकते. कृषी व अन्नप्रक्रिया उद्योगांना स्थानिक उत्पादनांची बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासोबतच वारा व सौरऊर्जा क्षेत्रातही मोठ्या संधी आहेत. ऐतिहासिक, धार्मिक आणि नैसर्गिक पर्यटनाला उद्योगाची जोड दिल्यास रोजगारनिर्मितीला मोठी चालना मिळेल, असे त्यांनी सांगितले.

उद्योगांसाठी जमीन आणि भांडवलासोबतच पायाभूत सुविधा, प्रशिक्षित मनुष्यबळ, वाहतूक व लॉजिस्टिक व्यवस्था आणि सकारात्मक प्रशासकीय दृष्टिकोन आवश्यक आहे. Ease of Doing Business, MAITRI 2.0, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम (CMEGP), PSI यांसह विविध योजनांचा उद्योजकांनी लाभ घ्यावा, असे आवाहनही सरनाईक यांनी केले.

‘एक खिडकी’ पद्धतीने उद्योगांना आवश्यक परवानग्या व सुविधा सुलभपणे उपलब्ध करून देण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. एमआयडीसी क्षेत्राचा विस्तार, लॉजिस्टिक सुविधा आणि औद्योगिक पायाभूत सुविधांच्या विकासावर भर देण्यात येणार आहे. उद्योग वाढला पाहिजे; मात्र त्यासोबत स्थानिक युवक, महिला, शेतकरी आणि छोट्या व्यावसायिकांना त्याचा मोठा लाभ झाला पाहिजे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

आज झालेल्या सामंजस्य करारांचे प्रत्यक्ष उद्योगांमध्ये रूपांतर करण्यासाठी जिल्हा प्रशासन, उद्योग विभाग आणि संबंधित यंत्रणांनी प्रभावी समन्वय साधावा, अशी सूचनाही पालकमंत्र्यांनी केली. उद्योगमंत्री उदय सामंत यांचे विशेष आभार मानत त्यांनी गुंतवणूक परिषदेच्या यशस्वी आयोजनाबद्दल जिल्हा प्रशासन, उद्योग विभाग, एमएआयटीआरआय आणि संबंधित यंत्रणांचे अभिनंदन केले.

उद्योगांच्या समस्यांचा दरमहा आढावा

जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षीच्या गुंतवणूक परिषदेत मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होत असून, त्यातून रोजगारनिर्मितीला चालना मिळणार असल्याचे सांगितले. उद्योगांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी तसेच ना-देय प्रमाणपत्रांची कामे विनाविलंब मार्गी लावण्यासाठी दरमहा उद्योजकांच्या प्रश्नांचा प्रशासकीय पातळीवर आढावा घेतला जातो, अशी माहिती त्यांनी दिली. उद्योगवाढीसाठी सर्व घटकांना प्रोत्साहन, सुविधा आणि आवश्यक वातावरण उपलब्ध करून देणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे, असेही पुजार यांनी सांगितले.

‘मैत्री’ पोर्टलवर परवानग्यांची सुविधा

छत्रपती संभाजीनगर विभागाचे उद्योग विभागाचे सहायक आयुक्त संजय भुरेवाल यांनी उद्योजकांना उद्योग उभारणीसाठी आवश्यक असलेल्या विविध परवानग्या ‘मैत्री’ पोर्टलवर उपलब्ध असल्याची माहिती दिली. उद्योग पोर्टलवर ६० हजार उद्योग नोंदणीकृत असल्याचेही त्यांनी सांगितले. जिल्हा उद्योग विभागाचे सहायक आयुक्त अमोल बळे यांनी प्रास्ताविकात गुंतवणूक परिषदेमागील पार्श्वभूमी, कार्यक्रमाची रूपरेषा आणि जिल्ह्यातील उद्योग व रोजगाराच्या संधींची माहिती दिली.

उद्योगासाठी ‘४ डी’ आवश्यक

धाराशिव सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अमर पाटील यांनी नवीन उद्योजकांना उद्योग केंद्राच्या माध्यमातून कर्ज व मार्गदर्शन उपलब्ध होत असल्याचे सांगितले. गरज ओळखून उद्योग उभारल्यास तो यशस्वी होण्यास मदत होते, असे त्यांनी नमूद केले. उद्योग क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी ‘४ डी’ आवश्यक असून, त्यामध्ये Desire, Determination, Dedication आणि Discipline या चार बाबींचा समावेश होतो, असे पाटील यांनी सांगितले.

यावेळी धनश्री जाधव (समन्वय अधिकारी, मैत्री कक्ष, मुंबई तथा उपनिबंधक, भागीदारी संस्था, विधी व न्याय विभाग), संजय भुरेवाल, अमर पाटील, बाळासाहेब गीते, सुयोग अमृतराव, शिवराम तोतेवाड, देवा सुरवसे, मनोज घायाळ आणि राजाभाऊ कोंढारे यांच्यासह उद्योग क्षेत्रातील अधिकारी व प्रतिनिधी उपस्थित होते.

तामलवाडी टोलनाक्यावर स्थानिकांच्या रोजगाराचा मुद्दा ऐरणीवर; व्यावसायिकांना हटविण्याच्या कारवाईविरोधात काँग्रेसचे आंदोलन

Web Title: Dharashiv ready for industrial investment rs 7534 crore investment to create 7500 jobs

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 26, 2026 | 06:23 PM

Topics:  

  • Dharashiv
  • investment

संबंधित बातम्या

Dharashiv Farmers :  21 हजार शेतकऱ्यांसाठी खूशखबर! खात्यात कर्जमाफीचे 183.85 कोटी जमा
1

Dharashiv Farmers :  21 हजार शेतकऱ्यांसाठी खूशखबर! खात्यात कर्जमाफीचे 183.85 कोटी जमा

Dharashiv News: वीजचोरी ते फिडर ट्रिपिंग; महावितरणचा अधिकाऱ्याला दणका! अधीक्षक अभियंता संजय आडे यांच्यावर निलंबनाची कारवाई
2

Dharashiv News: वीजचोरी ते फिडर ट्रिपिंग; महावितरणचा अधिकाऱ्याला दणका! अधीक्षक अभियंता संजय आडे यांच्यावर निलंबनाची कारवाई

Foreign Direct Investment : सरकारचा मास्टस्ट्रोक! भारतात 4895 कोटींची परदेशी गुंतवणूक;  FDI नियमांमधील बदलामुळे फायदा?
3

Foreign Direct Investment : सरकारचा मास्टस्ट्रोक! भारतात 4895 कोटींची परदेशी गुंतवणूक; FDI नियमांमधील बदलामुळे फायदा?

तामलवाडी टोलनाक्यावर स्थानिकांच्या रोजगाराचा मुद्दा ऐरणीवर; व्यावसायिकांना हटविण्याच्या कारवाईविरोधात काँग्रेसचे आंदोलन
4

तामलवाडी टोलनाक्यावर स्थानिकांच्या रोजगाराचा मुद्दा ऐरणीवर; व्यावसायिकांना हटविण्याच्या कारवाईविरोधात काँग्रेसचे आंदोलन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.