Jawahar Navodaya Vidyalaya : नवोदय विद्यालयात पाण्याची तीव्र टंचाई; 500 विद्यार्थ्यांचे हाल, ऑक्टोबरपासूनच विहीर-बोअरवेलचे पाणी अपुरे

धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर येथील जवाहर नवोदय विद्यालयात पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. 550 विद्यार्थ्यांसह शिक्षक-कर्मचाऱ्यांचे हाल होत असून, रामदरा प्रकल्पांतर्गत पाणीपुरवठा योजना तातडीने सुरू करण्याची मागणी प्राचार्यांनी केली आहे.
Jawahar Navodaya Vidyalaya : नवोदय विद्यालयात पाण्याची तीव्र टंचाई; 500 विद्यार्थ्यांचे हाल, ऑक्टोबरपासूनच विहीर-बोअरवेलचे पाणी अपुरे
Jawahar Navodaya Vidyalaya : नवोदय विद्यालयात पाण्याची तीव्र टंचाई; 500 विद्यार्थ्यांचे हाल, ऑक्टोबरपासूनच विहीर-बोअरवेलचे पाणी अपुरेJawahar Navodaya Vidyalaya : नवोदय विद्यालयात पाण्याची तीव्र टंचाई; 500 विद्यार्थ्यांचे हाल, ऑक्टोबरपासूनच विहीर-बोअरवेलचे पाणी अपुरे
Published on: 
Updated on: 
  • रामदरा प्रकल्प पाणीपुरवठा योजना सुरू करण्याची मागणी

  • हस्तांतरणाची प्रक्रिया झाली असतानाही पुरवठा नाही

  • विहीर आणि बोअरवेलच्या माध्यमातून पाण्याची सोय

Jawahar Navodaya Vidyalaya : दुष्काळी परिस्थितीमुळे तुळजापूर येथील जवाहर नवोदय विद्यालयात पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. विद्यालयातील सुमारे 550 विद्यार्थ्यांसह शिक्षक व कर्मचाऱ्यांना पाण्याअभावी अडचणींचा सामना करावा लागत आहे.

पिण्याच्या पाण्याबरोबरच आंघोळ, प्रातर्विधी आणि कपडे धुण्यासाठीही मोठ्या प्रमाणात पाणी आवश्यक असल्याने विद्यार्थ्यांचे दैनंदिन जीवन विस्कळीत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

या संदर्भात विद्यालयाचे प्राचार्य ए. एस. कांबळे यांनी 25 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या धाराशिव विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना पत्र देऊन रामदरा प्रकल्पांतर्गत पाणीपुरवठा योजना तातडीने सुरू करण्याची मागणी केली आहे. पत्रानुसार, विद्यालयात सध्या 550 विद्यार्थी शिक्षण घेत असून 35 ते 55 कर्मचारी व त्यांचे कुटुंबीयही परिसरात वास्तव्यास आहेत. त्यामुळे विद्यालयाला दररोज मोठ्या प्रमाणात पाण्याची आवश्यकता भासत आहे.

विहीर आणि बोअरवेलच्या माध्यमातून पाण्याची सोय

सध्या सिंदफळ येथील विहीर आणि बोअरवेलच्या माध्यमातून विद्यालयाला पाणी मिळते. मात्र, ऑक्टोबर महिन्यापासून पुरेसे पाणी उपलब्ध होत नसल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे. 23 नोव्हेंबरपासून ठेकेदारामार्फत पाणीपुरवठा सुरू करण्यात आला असला, तरी तो अपुरा पडत असल्याचेही प्राचार्यांनी निदर्शनास आणून दिले आहे.

रामदरा प्रकल्पांतर्गत तुळजाभवानी सैनिक शाळा, तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालय आणि जवाहर नवोदय विद्यालय या तीन संस्थांसाठी पाणीपुरवठा योजनेची तरतूद आहे. या योजनेसंदर्भात 30 जून रोजी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या उपविभागीय अभियंत्यांसह संबंधित तीन संस्थांच्या प्राचार्यांनी हस्तांतरण टिपणीवर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. तसेच 30 ऑक्टोबर रोजी ठेकेदाराने हस्तांतरण टिपणी दिल्याचे पत्रात म्हटले आहे.

हस्तांतरणाची प्रक्रिया झाली असतानाही पुरवठा नाही

योजनेचे काम व हस्तांतरणाची प्रक्रिया झालेली असताना प्रत्यक्ष पाणीपुरवठा पुरेशा प्रमाणात सुरू झालेला नाही. त्यामुळे योजनेची सद्यस्थिती स्पष्ट करून पाणीपुरवठा लवकरात लवकर सुरू करावा, अशी मागणी प्राचार्य कांबळे यांनी केली आहे.

योजनेची कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण; प्रत्यक्ष पाणी कधी मिळणार? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. विद्यार्थ्यांच्या पिण्याच्या पाण्यासह स्वच्छता आणि आरोग्याचा प्रश्न लक्षात घेता महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने या मागणीची तातडीने दखल घेऊन कायमस्वरूपी पाणीपुरवठ्याची व्यवस्था करणे गरजेचे आहे.