Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

तुळजापूरमध्ये ‘पिंटू गंगणे’ यांचे वर्चस्व कायम? १५ वर्षांच्या विकासावर भाजपला पुन्हा विजयाची अपेक्षा!

Tuljapur Municipality Election: तुळजापूर नगरपरिषद निवडणुकीत नगराध्यक्षपदाची लढत दुरंगी असली तरी, भाजपचे उमेदवार विनोद उर्फ पिंटू गंगणे यांनी केलेल्या १५ वर्षांच्या विकास कामांमुळे त्यांचे वर्चस्व कायम आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Nov 27, 2025 | 08:43 PM
तुळजापूरमध्ये 'पिंटू गंगणे' यांचे वर्चस्व कायम? (Photo Credit- X)

तुळजापूरमध्ये 'पिंटू गंगणे' यांचे वर्चस्व कायम? (Photo Credit- X)

Follow Us
Close
Follow Us:
  • विकासाच्या १५ वर्षांच्या ‘कामांचा’ आधार!
  • तुळजापूर नगराध्यक्षपदाच्या लढतीत भाजपचे पिंटू गंगणे यांचे वर्चस्व
  • ‘विकासाचे चाक थांबू देणार नाही’ चा नारा
तुळजापूर | प्रतिनिधी: तुळजापूर नगरपरिषद निवडणुकीची रणधुमाळी शिगेला पोहोचली असून नगराध्यक्षपदाची लढत दुरंगी स्वरूपात तापली आहे. तथापि, गेल्या १५ वर्षांत तुळजापूर शहरात विकासाची भक्कम छाप उमटवणारे भाजपचे उमेदवार विनोद उर्फ पिंटू गंगणे यांचे वर्चस्व पुन्हा एकदा जाणवत असल्याचे चित्र आहे.

विकासाच्या कामांमुळे जनाधार

गंगणे यांच्या नगराध्यक्षपदाच्या काळातील जलपुरवठा सुधारणा, रस्ते दुरुस्ती, स्वच्छता उपक्रम, शहरातील सुविधा उभारणी ही कामे सामान्य नागरिकांच्या मनात ठसा उमटवून गेली आहेत. परिपूर्ण कारभाराची सलगता जनतेला हवी असून “विकासाचे चाक थांबू देणार नाही” अशा भावनेने गंगणे समर्थकांनी प्रचारयंत्रणा आक्रमक केली आहे.

हे देखील वाचा: Tuljapur: प्रचाराला वेळ द्यावा की यंत्रणेकडे पाहावे? ईव्हीएम बंद पडल्याने गोंधळ; निवडणूक आयोगाच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह

राणा पाटलांची ठाम साथ

भाजपचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची गंगणे यांना मिळालेली ठाम साथ हा गंगणे यांच्यासाठी महत्त्वाचा बळकटीबिंदू मानला जात आहे. शहरातील गल्लीबोळात तरुणांपासून महिलांपर्यंत सर्वच स्तरांमधील सकारात्मक प्रतिसादामुळे गंगणे यांच्या विजयाची शक्यता अधिक बळावली असल्याचे निरीक्षकांचे म्हणणे आहे.

गंगणे यांनी व्यक्त केला विश्वास

“१५ वर्षांच्या कारभारात तुळजापूरला विकासाचा नवा चेहरा दिला. भावी पिढीसाठी अजून मोठ्या योजना राबवायच्या आहेत. जनता पुन्हा विश्वास दाखवेल,” असा विश्वास गंगणे यांनी व्यक्त केला आहे.

महाविकास आघाडीचे उमेदवार अमर मगर यांनी लढत चुरशीची केली असली, तरी गंगणे यांचा अनुभव, जनाधार आणि ठोस कामगिरी पाहता त्यांच्या विजयाला बळ मिळत असून ३ नोव्हेंबरला विकासाचा झेंडा पुन्हा फडकताना दिसू शकेल, अशी जनतेतील चर्चा सध्या रंगत आहे.

हे देखील वाचा: उच्च न्यायालयातील लढ्याला मोठे यश! आमदार राणा पाटलांमुळे शेतकऱ्यांना मिळणार ₹२२० कोटींचा पीकविमा; ऐन निवडणुकीत मोठा दिलासा

Web Title: Pintu ganganes dominance continues in tuljapur bjp expects victory again on 15 years of development

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 27, 2025 | 08:43 PM

Topics:  

  • Dharashiv
  • Maharashtra Local Body Election
  • tuljapur news

संबंधित बातम्या

Tuljapur: प्रचाराला वेळ द्यावा की यंत्रणेकडे पाहावे? ईव्हीएम बंद पडल्याने गोंधळ; निवडणूक आयोगाच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह
1

Tuljapur: प्रचाराला वेळ द्यावा की यंत्रणेकडे पाहावे? ईव्हीएम बंद पडल्याने गोंधळ; निवडणूक आयोगाच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह

Ladki Bahin Yojana: श्रीकांत शिंदेंचे मोठे विधान; म्हणाले, “लाडक्या बहिणींनी विरोधकांचे…”
2

Ladki Bahin Yojana: श्रीकांत शिंदेंचे मोठे विधान; म्हणाले, “लाडक्या बहिणींनी विरोधकांचे…”

केंद्राध्यक्षासह सहाय्यक कर्मचाऱ्यांचे दुसरे प्रशिक्षण; निवडणूकीसाठी नियुक्त कर्मचाऱ्यांची तयारी पूर्ण
3

केंद्राध्यक्षासह सहाय्यक कर्मचाऱ्यांचे दुसरे प्रशिक्षण; निवडणूकीसाठी नियुक्त कर्मचाऱ्यांची तयारी पूर्ण

वसमतची ‘विकास’ फसवणूक; कोट्यवधी खर्च, ठेकेदारांचे वैभव वाढले, शहर मात्र खड्ड्यात
4

वसमतची ‘विकास’ फसवणूक; कोट्यवधी खर्च, ठेकेदारांचे वैभव वाढले, शहर मात्र खड्ड्यात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.