Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dharashiv News: १५ व्या वित्त आयोगाच्या ४.२० लाखांच्या निधीचा गैरवापर, सरपंच व ग्रामसेवकावर गुन्हा दाखल

१५ व्या वित्त आयोगाच्या ४.२० लाखांच्या निधीचा गैरवापर झाल्याची माहिती समोर आली. याप्रकरणी आता करजखेडा ग्रामपंचायत निधी अपहार प्रकरणी सरपंच व ग्रामसेवकावर गुन्हा दाखल करण्यात आला. 

  • By श्वेता झगडे
Updated On: Feb 27, 2026 | 06:43 PM
१५ व्या वित्त आयोगाच्या ४.२० लाखांच्या निधीचा गैरवापर, सरपंच व ग्रामसेवकावर गुन्हा दाखल

१५ व्या वित्त आयोगाच्या ४.२० लाखांच्या निधीचा गैरवापर, सरपंच व ग्रामसेवकावर गुन्हा दाखल

Follow Us
Follow Us:
  • १५ व्या वित्त आयोगाच्या ४.२० लाखांच्या निधीचा गैरवापर
  • सरपंच व ग्रामसेवकावर गुन्हा दाखल
  • फसवणुकीचा गुन्हा नोंदविण्यात आल्याने खळबळ उडाली
Dharashiv News Marathi: धाराशिव तालुक्यातील करजखेडा ग्रामपंचायतीतील १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतील ४ लाख २० हजार रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी तत्कालीन सरपंच व ग्रामसेवकाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंदविण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणातील आरोपी तत्कालीन सरपंच सुभाष महादेव कळसुले (रा. करजखेडा, ता. जि. धाराशिव) आणि ग्रामसेवक सावंत एम.आर. (रा. टाकळी बे., ता. जि. धाराशिव) यांच्याविरुद्ध बेंबळी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

१ जून २०२२ ते १६ नोव्हेंबर २०२२ या कालावधीत ग्रामपंचायत करजखेडा येथे १५ व्या वित्त आयोगातून विविध विकासकामांसाठी ४,२०,००० रुपये प्राप्त झाले होते. या निधीचा विनियोग ग्रामविकास, पायाभूत सुविधा, स्वच्छता, पाणीपुरवठा आदी कामांसाठी होणे अपेक्षित होते. मात्र, संबंधित निधीचा अपहार करून शासनाची फसवणूक केल्याचा आरोप आहे. लेखापरीक्षण व प्राथमिक चौकशीदरम्यान आर्थिक अनियमितता आढळून आल्याने हे प्रकरण उघडकीस आल्याची माहिती सूत्रांकडून मिळते.

मुंबईतील ‘या’ शाळेला बॉम्बने उडवण्याची धमकी, मुलांच्या सुरक्षिततेसाठी शाळेकडून सुट्टी जाहीर

या प्रकरणी फिर्यादी संजय संतराव ढाकणे (वय ५५), विस्तार अधिकारी, पंचायत समिती धाराशिव, रा. दैत्यकृपा कॉलनी, शाहूनगर, धाराशिव यांनी २५ फेब्रुवारी २०२६ रोजी प्रथम खबर दिली. त्याअनुषंगाने आरोपींविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम ४०९ (विश्वासघाताने अपहार), ४२० (फसवणूक) व ३४ (सामूहिक हेतू) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. कलम ४०९ अंतर्गत सार्वजनिक सेवकाकडून विश्वासघाताने निधीचा अपहार केल्यास कठोर शिक्षेची तरतूद आहे, तर कलम ४२० अंतर्गत फसवणुकीसाठी दंड व कारावासाची शिक्षा होऊ शकते.

पोलिसांकडून संबंधित कागदपत्रे, बँक व्यवहार, मंजूर कामे व प्रत्यक्षात झालेली कामे यांची पडताळणी करण्यात येत असून ग्रामपंचायतीच्या इतर व्यवहारांचीही चौकशी होण्याची शक्यता आहे. दरम्यान, या घटनेमुळे ग्रामपंचायत स्तरावरील निधीच्या पारदर्शकतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, जिल्हा प्रशासनाने या प्रकरणात सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

राज्यात ‘Love jihad’ विरोधात कडक कायदा येणार!रश्मी शुक्ला समितीचा अहवाल अंतिम टप्प्यात

Web Title: Case registered against sarpanch and gramsevak for misappropriation of karjakheda gram panchayat funds

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 27, 2026 | 06:43 PM

Topics:  

  • Dharashiv
  • gram panchayat
  • maharashtra

संबंधित बातम्या

Mumbai News: गोवंडी-मानखुर्दला ‘विषारी हवे ‘पासून मिळणार दिलासा! बेकायदेशीर आरएमसी काँक्रिट प्लाण्ट होणार बंद
1

Mumbai News: गोवंडी-मानखुर्दला ‘विषारी हवे ‘पासून मिळणार दिलासा! बेकायदेशीर आरएमसी काँक्रिट प्लाण्ट होणार बंद

Gondiya News: जादूटोण्याच्या संशयातून वृद्धाची हत्या; मुंडीपारच्या खुनाचा उलगडा! दोघांसह २ विधिसंघर्षग्रस्त ताब्यात
2

Gondiya News: जादूटोण्याच्या संशयातून वृद्धाची हत्या; मुंडीपारच्या खुनाचा उलगडा! दोघांसह २ विधिसंघर्षग्रस्त ताब्यात

Pratap Sarnaik: शेतकऱ्यांना लवकरच मिळणार मदत; जीआर काढण्याची प्रक्रिया सुरू – प्रताप सरनाईक
3

Pratap Sarnaik: शेतकऱ्यांना लवकरच मिळणार मदत; जीआर काढण्याची प्रक्रिया सुरू – प्रताप सरनाईक

Bhiwandi Gang Rape: सामूहिक अत्याचार प्रकरण! नरेंद्र पवार यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी; निकाल 28 सप्टेंबरपर्यंत राखीव
4

Bhiwandi Gang Rape: सामूहिक अत्याचार प्रकरण! नरेंद्र पवार यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी; निकाल 28 सप्टेंबरपर्यंत राखीव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.