Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पूजा खेडकरनंतर वडील दिलीप खेडकरांच्या अडचणी वाढणार; एसीबी करणार संपत्तीची चौकशी

पूजाचे वडील दिलीप खेडकर हे महाराष्ट्र शासनाचे निवृत्त प्रशासकीय अधिकारी असून त्यांच्या नावावर सुमारे ४० कोटी रुपयांची संपत्ती आहे. निवृत्तीनंतर त्यांनी राजकारणात नशीब आजमावण्याचा प्रयत्न केला.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Jul 17, 2024 | 11:53 AM
पूजा खेडकरनंतर वडील दिलीप खेडकरांच्या अडचणी वाढणार; एसीबी करणार संपत्तीची चौकशी
Follow Us
Close
Follow Us:

पुणे :  प्रशिक्षणार्थी आयएएस पूजा खेडकरच्या अडचणी दिवसेंदिवस वाढच चालल्या आहेत. पूजा खेडकर यांचे महाराष्ट्रात सुरू असलेले प्रशिक्षण रद्द करण्यात आले आहे. तसेच  मसुरी येथील लाल बहादूर शास्त्री नॅशनल ॲकॅडमी ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन (LBSNAA) मध्ये तातडीने उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

त्यानंतर त्यांचे वडीलही त्यांच्या संपत्तीमुळे अडचणीत आले आहेत.  लाचलुचपत विभागाने (एसीबी) दिलीप खेडकर यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला आहे. अहमदनगरच्या लाचलुचपत विभागाकडून दिलीप खेडकर यांच्या संपत्तीची चौकशी करण्यात येणार आहे. याचे कारण म्हणजे उत्पन्नापेक्षा त्यांची संपत्ती जास्त असल्याचे एका तपासात आढळून आल्यानंतर आता नगर लाचलुचपत विभाग त्यांच्या संपत्तीची चौकशी करणार आहे. या प्रकरणात ते दोषी आढळू आल्यास त्यांना अटक होण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे.  त्यासोबतच आयकर विभागानेही त्यांच्या संपत्तीची माहिती मागवली आहे.

एका वृत्तवाहिनीच्या रिपोर्टनुसार, पूजाचे वडील दिलीप खेडकर हे महाराष्ट्र शासनाचे निवृत्त प्रशासकीय अधिकारी असून त्यांच्या नावावर सुमारे ४० कोटी रुपयांची संपत्ती आहे. निवृत्तीनंतर त्यांनी राजकारणात नशीब आजमावण्याचा प्रयत्न केला.

2024 मध्ये त्यांनी अहमदनगर मतदारसंघातून बहुजन आघाडीच्या तिकिटावर लोकसभा निवडणुकही लढवली. पण यात त्यांचा पराभव झाला. निवडणुकीवेळी त्यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रातही  त्यांची संपत्ती तब्बल 40 कोटींची असल्याचे आणि शेतीतून 43 लाख वार्षिक उत्पन्न असल्याचे दाखवले आहे. त्यामुळे पूजा खेडकर यांच्या नॉन क्रीमिलेअर प्रमाणपत्रावर प्रश्नचिन्ह उपस्थित  केले जात आहे.

वर्षाला 8 लाखांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्यांनाच  नॉन क्रिमिलेअरचे प्रमाणपत्र दिले जाते.  त्यामुळे वडिलांची 40 कोटींचं उत्पन्न असताना पूजा खेडकर यांना नॉन क्रिमिलेयरअंतर्गत प्रमाणपत्र कसे मिळाले? असा सवाल उपस्थित केला जात आहे. दरम्यान, यासंदर्भात त्यांना विचारले असता, पूजा खेडकर यांनी नियमानुसारच दिव्यांग व क्रिमिलेअरचे प्रमाणपत्र घेतले असून यूपीएससीने त्याची तपासणी केल्याचे त्यांनी सांगितले होते. तसेच,  तुमच्याकडे कोट्यवधींची संपत्ती असतानाही तुम्हाला नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र कसे मिळाले, असा सवाल विचारला असता हे प्रमाणपत्र नियमानेच मिळाल्याचे दिलीप खेडकर यांनी सांगतिले.

Web Title: Dilip khedkars problems will increase after pooja khedkar acb will investigate the assets

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 17, 2024 | 11:39 AM

Topics:  

  • Dilip Khedkar
  • Latest Political News

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.