क्लीनरच्या अपहरण प्रकरणात दिलीप व मनोरमा खेडकर आरोपी आहेत. दिलीप खेडकरला जमीन न देण्याचा युक्तिवाद पोलिसांनी केला आहे. आरोपी फरार असून चौकशीस सहकार्य करत नाहीत असे ही कोर्टात पोलिसांनी सांगितले…
वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर यांच्याविरोधात पुणे पोलिसांत कामात अडथळा आणल्याप्रकरणी तक्रार दाखल झाली आहे. या तक्रारीमुळे दिलीप खेडकर हे पुन्हा अडचणीत येणार असल्याचे दिसत आहे.
पूजाचे वडील दिलीप खेडकर हे महाराष्ट्र शासनाचे निवृत्त प्रशासकीय अधिकारी असून त्यांच्या नावावर सुमारे ४० कोटी रुपयांची संपत्ती आहे. निवृत्तीनंतर त्यांनी राजकारणात नशीब आजमावण्याचा प्रयत्न केला.