Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Gudi Padwa |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune News : ‘प्रॉपर्टी टॅक्स’चे चेक न वटल्यास आता थेट कारवाई होणार; महापालिका प्रशासनाचा इशारा

महापालिकेकडून दरवर्षी मिळकतकर देयके वितरित केली जातात आणि ती निश्चित मुदतीत भरण्याची जबाबदारी संबंधित मिळकतधारकांची असते. अनेक नागरिक धनादेशाद्वारे कर भरतात.

  • By कृपादान आवळे
Updated On: Mar 21, 2026 | 11:49 AM
Pune News : 'प्रॉपर्टी टॅक्स'चे चेक न वटल्यास आता थेट कारवाई होणार; महापालिका प्रशासनाचा इशारा

Pune News : 'प्रॉपर्टी टॅक्स'चे चेक न वटल्यास आता थेट कारवाई होणार; महापालिका प्रशासनाचा इशारा

Follow Us
Close
Follow Us:

पुणे : पुणे महापालिकेकडून मिळकतकर भरण्यासाठी दिलेले धनादेश न वटल्यास संबंधित मिळकतधारकांवर कायदेशीर तसेच फौजदारी कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा कर आकारणी व संकलन विभागाने दिला आहे. अभय योजनेनंतर कर भरण्यासाठी मोठ्या प्रमाणावर धनादेश स्वीकारण्यात आले होते; मात्र, तब्बल ७ हजार ४७ धनादेश वटले नसल्याची माहिती समोर आली आहे.

महापालिकेकडून दरवर्षी मिळकतकर देयके वितरित केली जातात आणि ती निश्चित मुदतीत भरण्याची जबाबदारी संबंधित मिळकतधारकांची असते. अनेक नागरिक धनादेशाद्वारे कर भरतात. परंतु, अपुरी बँक माहिती, तांत्रिक अडचणी किंवा इतर कारणांमुळे काही धनादेश वटत नसल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. १ एप्रिल २०२४ पासून अशा अनेक घटना घडल्या असून, संबंधितांना ‘नेगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स अॅक्ट १८८१’च्या कलम १३८ अंतर्गत नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. तरीही अनेकांनी कराची रक्कम अद्याप जमा न केल्याने महापालिकेचे आर्थिक नुकसान होत असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.

यामुळे ज्या नागरिकांचे धनादेश वटलेले नाही, त्यांनी तातडीने कराची थकबाकी भरावी, असे आवाहन करण्यात आले आहे. अन्यथा नियमांनुसार संबंधितांवर फौजदारी कारवाई केली जाईल, असा इशारा उपआयुक्त तथा कर आकारणी व संकलन विभाग प्रमुख रवि पवार यांनी दिला आहे.

विविध प्रश्नांवरून पुणे महापालिकेत खडाजंगी

शहरातील वाहतूक कोंडी, रखडलेले डीपी रस्ते, टीडीआर प्रक्रियेतील विलंब आणि पीएमपीएलच्या कारभारावरून महापालिकेच्या बुधवारच्या सर्वसाधारण सभेत जोरदार खडाजंगी झाली. प्रशासनाने यावर्षी १२ मिसिंग लिंकचे काम पूर्ण केले जाईल, तसेच समाविष्ट गावांतील प्रत्येकी एक मुख्य रस्त्याचे काम प्राधान्याने पूर्ण केले जाईल असे आश्वासन सभागृहात झालेल्या जोरदार चर्चेनंतर दिले. सभेच्या सुरुवातीलाच पीएमपीएलच्या कथित भ्रष्ट कारभाराविरोधात काँग्रेस सदस्यांनी आंदोलन करत निषेध नोंदवला. यावर महापौर मंजुषा नागपुरे यांनी पीएमपीएल संदर्भात लवकरच विशेष सभा घेण्यात येईल, असे स्पष्ट केले.

हेदेखील वाचा : Mumbai Local :  लोकल प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! लवकरच स्वयंचलित दरवाजांची लोकल, दरवाज्यातील जीवघेण्या प्रवासाला बसणार आळा

Web Title: Direct action to follow if property tax cheques bounce pune municipal administration issues warning

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 21, 2026 | 11:49 AM

Topics:  

  • Property Tax
  • Pune Municipal Corporation

संबंधित बातम्या

Pune Politics: पुणे महापालिकेत महायुतीत बिघाडी? आठवले गटाची भाजपवर उघड नाराजी
1

Pune Politics: पुणे महापालिकेत महायुतीत बिघाडी? आठवले गटाची भाजपवर उघड नाराजी

Pune News : थकबाकीदारांसाठी अभय योजना ठरतेय फायद्याची; महापालिकेच्या तिजोरीत 954.78 कोटी जमा
2

Pune News : थकबाकीदारांसाठी अभय योजना ठरतेय फायद्याची; महापालिकेच्या तिजोरीत 954.78 कोटी जमा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.