लवकरच स्वयंचलित दरवाजांची लोकल,दरवाज्यातील जीवघेण्या प्रवासाला बसणार आळा
चेन्नई येथील इंटिग्रल कोच फैक्टरीमध्ये तयार करण्यात आलेली ही अत्याधुनिक पहिली नॉन-एसी (साधी) लोकल लवकरच मुंबईत दाखल होणार आहे. त्यानंतर मध्य आणि पश्चिम रेल्वेकडून विविध तांत्रिक तसेच सुरक्षा चाचण्या घेण्यात येतील. सर्व चाचण्या यशस्वी झाल्यानंतर ही लोकल नियमित प्रवासी सेवेत दाखल करण्यात येणार आहे.
लोकलमध्ये दरवाजात उभे राहणे, धावत्या गाडीत चढणे किंवा उतरणे यामुळे दरवर्षी अनेक अपघात होतात. अतिगर्दीमुळे अनेकांना दरवाजात उभे राहण्याशिवाय पर्याय राहत नाही. ही बाब लक्षात घेऊन नव्या लोकलमध्ये स्वयंचलित दरवाजे बसविण्यात आले आहेत. या यंत्रणेनुसार गाडी सुरू होण्यापूर्वी दरवाजे आपोआप बंद होतील आणि स्थानकावर पूर्ण थांबल्यानंतरच उघडतील. तसेच दरवाजे व्यवस्थित बंद नसतील तर गाडी सुरू होणार नाही. अशी अतिरिक्त सुरक्षा प्रणाली ही बसविण्यात आल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी ICF
दिली आहे.
स्वयंचलित उघड-बंद होणारे दरवाजे.
सुधारित व्हेंटिलेशन प्रणाली
डब्यांमधील अंतर्गत जोडणी (व्हेस्टिच्युल)
आधुनिक सुरक्षा यंत्रणा
आपत्कालीन सुविधा
अपघात टाळण्यासाठी विशेष रचना
नॉन-एसी लोकलमध्ये दरवाजे बंद ठेवल्यास गुदमरल्यासारखे होण्याची शक्यता लक्षात घेऊन रेल्वेने डब्यांच्या रचनेत विशेष बदल केले आहेत. सुधारित व्हेंटिलेशन प्रणाली, मोठ्या खिडक्या, उत्तावरील हवेचा प्रवाह वाढविणारी यंत्रणा तसेच नैसर्गिक हवा खेळती राहील अशी रचना करण्यात आली आहे.
या लोकलचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे डब्यांदरम्यान देण्यात आलेली कोस्टिब्युल कनेक्टिव्हिटी. त्यामुळे प्रवाशांना एका डब्यातून दुसन्य डब्यात सहजपणे जाता येणार आहे. गर्दीच्या वेळी यामुळे मोठा दिलासा मिळू शकतो. तसेच आपत्कालीन परिस्थितीतही ही सुविधा उपयोगी ठरणार आहे.
ही लोकल सुरुवातीला प्रायोगिक तत्वावर चालवली जाणार आहे. त्यानंतर तिच्या कामगिरीचा आढावा घेऊन अशाच प्रकारच्या आणखी लोकल मुंबई उपनगरीय सेवेत आणण्याचा रेल्वेचा मानस आहे. भविष्यात सर्व नवीन लोकल अधिक सुरक्षित, तांत्रिकदृष्ट्या सक्षम आणि प्रवासी-अनुकूल करण्याच्या दृष्टीने हा एक महत्वाचा टप्पा मानला जात असे.






