दिशा सालियन प्रकरणात वकिलांचे उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; प्रकरणाला वेगळं वळण लागण्याची शक्यता
मुंबई : दिशा सालियनचा मृत्यू झाला त्यावेळी राज्यात महाविकास आघाडीचं सरकार होतं आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते. त्यांनी आदित्य ठाकरेंना वाचवण्यासाठी आपल्या पदाचा पुरेपुरे वापर केला, असा गंभीर आरोप दिशा सालियानचे वडील सतीश सालियन यांचे वकील निलेश ओझा यांनी केला आहे. त्यामुळे या प्रकरणाला वेगळं वळण लागण्याची शक्यता आहे. दिशा सालियन मृत्यू प्रकरणात तिच्या वडिलांनी हाय कोर्टात याचिका दाखल केलं असून आदित्य ठाकरे आणि इतर काहींवर आरोप केले आहेत. मात्र आदित्य ठाकरेंनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. याचं उत्तर कोर्टात देणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
आदित्य ठाकरे, दिनो मोरया, आदित्य पांचोली, सचिन वाझे, रिया चक्रवर्ती यांच्यावर याचिकेत आरोप करण्यात आले आहेत. परमबिंर सिंग यांनी एक पत्रकार परिषद घेऊन सांगितलं होतं. की सीसीटीव्हीत कोणताही राजकीय नेता घडनास्थळी आल्याचे पुरावे नसल्याचं म्हटलं होतं. त्याची ही माहिती खोटी आहे. आदित्य ठाकरेंचा अमली पदार्थ तस्करीत संबंध आहेत, नार्कोटेक्स ब्युरोच्या तपासात हे आढळून आलं आहे. आदित्य ठाकरे हे ड्रग्स बिझनेसमध्ये सहभागी आहेत. त्यासंदर्भाती इतंभू माहिती आम्ही या अर्जात दिली आहे. आदित्य ठाकरे, दिनो मोरिया यांच्या फोन कॉल्ससह समीर खान नावाच्या व्यक्तीची डीएफीपी नावाची कंपनी होती,जी ड्रग्सचे सिंडिकेट चालवत होती, असं त्यांनी म्हटलं आहे.
आदित्य ठाकरे यांचं नाव ड्रग्सच्या बिझनेसमध्ये आल्यानंतर समीर वानखेडे असो किंवा नार्कोटेक्स ब्युरोचे इतर अधिकारी असतील, त्यांना आदित्य ठाकरेंवर कारवाई करण्यासाठी कोणी थांबवलं, असा सवाल ओझा यांनी विचारला आहे. त्यामध्ये, किती कोटींची डील झाली असाही सवाल ओझा यांनी विचारला. पोलिस आयुक्तालयात आमची जॉईंट सेक्रेटरी यांच्यासोबत चर्चा झाली, त्यानंतर त्यांनी पोलीस आयुक्तांशी फोनवरुन चर्चा करुन संबंधित प्रकरणात ही तक्रार दाखल करुन घेत असल्याचे म्हटले. त्यानुसार, आता एफआयआर दाखल झाल्याचेही ओझा यांनी सांगितले. आमच्या तक्रारीत आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे दोघेही आरोपी आहेत, अशी माहिती निलेश ओझा यांनी दिली.
स्टीव्ह पिंटो नावाचा दिशाचा एक मित्र आहे, त्याने त्याच्या ट्विटर अकाऊंटवर एक पोस्ट लिहिली होती. त्यामध्ये, 7 जून 2020 रोजी एकता कपूरच्या घरी पार्टी झाली, त्यांसदर्भातील सर्व हिंट्स दिल्या होत्या. तसेच, त्या दिवसापासून स्टीव्ह पिंटो हा गायब आहे, अशी माहितीही नितीन ओझा यांनी दिली. तसेच, आमची तक्रार खोटी निघाल्यास आम्हाला फाशी द्या, असेही आम्ही तक्रारीत लिहिल्याचे ओझा यांनी म्हटले.
11 डिसेंबर 2023 साली सतिश सालियन यांचं स्टेटमेंट रेकॉर्ड करण्यात आलंय. त्यामध्ये, त्यांनी केस रिओपन करुन चालवण्याची मागणी केली आहे. याशिवाय आमच्याकडे आय विटनेसही आहेत. दिशाची हत्या झाली त्या दिवशी आदित्य ठाकरे तिथं होते की नाही? आणि दुसरं म्हणजे दिशाचा मृत्यू हा नैसर्गिक नाही. त्यामुळे, ही आरोपीची जबाबदारी आहे की, त्यांनी ते पटवून द्यावं हा मृत्यू नैसर्गिक नाही, असे नितीन ओझा यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटले.
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे यांना वाचवण्यासाठी पदाचा पुरेपुर वापर केला. त्यांच्या गॅंगचे सचिन वाझे होते, त्यामुळे या प्रकरणात उद्धव ठाकरेही आरोपी असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.