Divisional engineers were held for three hours. Instructions to complete the work of National Highway at a fast pace Anil Bonde
अमरावती : मागील एका वर्षापासून जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गाचे (national highways) काम प्रशासनाची उदासीनता (indifference of the administration) तसेच, संबंधित विभागात असलेल्या संवादाच्या अभावामुळे रखडले होते. यामुळे जिल्ह्यातील नागरिकांना अतोनात त्रास सहन करावा लागत आहे. हे लक्षात घेत खासदार डॉ. अनिल बोंडे (MP Dr. Anil Bonde) यांनी राष्ट्रीय महामार्गाच्या विभागीय अभियंता (Divisional Engineer) कार्यालयात बैठक घेतली.
तर, खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी अधिकाऱ्यांची चक्क तीन तास बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी अधिकाऱ्यांना तब्बल तीन तास धारेवर धरुन धरले. त्यांना खडे बोल सुनावले तसेच तत्काळ प्रलंबित कामे मार्गी लावण्याच्या सूचना राष्ट्रीय महामार्गाचे विभागीय अभियंता भूपेश कथलकर (Divisional Engineer Bhupesh Kathalkar) यांना दिल्या. तसेच, या कामाबद्दल त्यांना वेळेचा अल्टिमेटम देता. त्यांनी ही सर्व कामे आठ दिवसात मार्गी लावण्याच्या सूचना यावेळी खा. डॉ. बोंडे यांनी दिल्या.