Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 17 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

इंधन तुटवड्याच्या ‘त्या’ अफवांवर विश्वास ठेऊ नका, देशात पुरेशा प्रमाणात साठा; HPCL कडून स्पष्टीकरण

इंधनाच्या कमतरतेबद्दल सोशल मीडियावर फिरणारे दावे दिशाभूल करणारे आणि निराधार आहेत. देशात इंधन पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Mar 10, 2026 | 03:26 PM
इंधन तुटवड्याच्या 'त्या' अफवांवर विश्वास ठेऊ नका, देशात पुरेशा प्रमाणात साठा; HPCL कडून स्पष्टीकरण

इंधन तुटवड्याच्या 'त्या' अफवांवर विश्वास ठेऊ नका, देशात पुरेशा प्रमाणात साठा; HPCL कडून स्पष्टीकरण

Follow Us
Follow Us:

पुणे : अमेरिका-इस्त्रायलच्या इराणवरील हल्ल्यामुळे एक नवीन जागतिक संकट निर्माण झाले आहे. या संघर्षाचा परिणाम भारतावरही होत आहे. इंधनाचा पुरवठ्यावर याचा थेट परिणाम होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. असे असताना आता हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (HPCL) ने यावर महत्त्वाची माहिती दिली आहे.

एचपीसीएलकडून गॅस सिलेंडरधारकाच्या मोबाईलवर मेसेज पाठवून घाबरून न जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कंपनीने पाठवलेल्या मेसेजमध्ये म्हटले की, ‘इंधनाच्या कमतरतेबद्दल सोशल मीडियावर फिरणारे दावे दिशाभूल करणारे आणि निराधार आहेत. देशात इंधन पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहे. नागरिकांना खात्री दिली जात आहे की, काळजी करण्याची गरज नाही. इंधनाचा योग्य वापर करणे नेहमीच फायदेशीर असते’.

दुसरीकडे, चाकण परिसरात घरगुती तसेच व्यावसायिक गॅस सिलेंडरची टंचाई झाल्याचे चित्र आहे. या टंचाईमुळे नागरिक आणि व्यावसायिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. हिंदुस्थान पेट्रोलियमच्या अंड्रिन लोबो आशीर्वाद गॅस एजन्सीकडे दररोज सुमारे ८०० ते १००० घरगुती सिलेंडरची मागणी असताना कंपनीकडून केवळ ३२४ सिलेंडरचा पुरवठा होत असल्याने परिस्थिती गंभीर बनली आहे.

एजन्सीबाहेर एक ते दीड किलोमीटरपर्यंत रांगा

भारत पेट्रोलियम एजन्सी बाहेर सिलेंडर मिळवण्यासाठी नागरिकांनी एजन्सीबाहेर एक ते दीड किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या असल्याचे चित्र दिसत आहे. अनेक नागरिकांना तासनतास प्रतीक्षा करूनही सिलेंडर मिळत नसल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. व्यावसायिक गॅस सिलेंडरचा पुरवठा पूर्णतः बंद असल्याने हॉटेल, खानावळ तसेच इतर व्यावसायिक आस्थापनांना मोठा फटका बसला आहे. युद्धपरिस्थितीचा परिणाम गॅस पुरवठ्यावर होत असून, व्यवसाय चालवणे कठीण झाले आहे. सध्या सुरू असलेल्या इराणमधील युद्धपरिस्थितीचा परिणाम गॅस पुरवठ्यावर होत असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे गॅसचा पुरवठा विस्कळीत झाल्याचे सांगितले जात आहे.

घरगुती सिलेंडरच्या दरात 60 रुपयांची वाढ

घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमतीत ६० रुपयांनी वाढ झाली आहे. या वाढीनंतर, दिल्लीत १४.२ किलोच्या घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत वाढ झाली आहे. ७ मार्चपासून नवीन दर लागू झाला आहे. अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यांदरम्यान ही वाढ करण्यात आली आहे. एलपीजी उत्पादन वाढवण्याच्या सूचना मिळाल्या होत्या. सरकारने शुक्रवारी सार्वजनिक आणि खाजगी दोन्ही एलपीजी रिफायनरीजना उत्पादन वाढवण्याचे आदेश दिल्यानंतर घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमतीत वाढ झाल्याची माहिती समोर आली आहे.

काय म्हटलंय मेसेजमध्ये?

प्रिय ग्राहक,
सोशल मीडिया पर ईंधन की कमी को लेकर फैलाए जा रहे दावे भ्रामक और निराधार हैं।
देश में ईंधन की पर्याप्त उपलब्धता है। नागरिकों को आश्वस्त किया जाता है कि किसी भी प्रकार की चिंता करने की आवश्यकता नहीं है।
ईंधन का समझदारी से उपयोग करना हमेशा लाभदायक होता है।
-HPCL

हेदेखील वाचा : खळबळजनक! Epstein Files मधून ट्रम्प यांचे नाव जाणीवपूर्वक हटवलं? अमेरिकेच्या राजकारणात पुन्हा भूकंप

Web Title: Dont believe rumors of fuel shortage there is sufficient stock in country hpcl clarifies

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 10, 2026 | 03:26 PM

Topics:  

  • HPCL
  • LPG gas cylinder
  • LPG Subsidy

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.