Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ladki Bahin Yojna News: 1500 रुपये नको, लाडक्या बहिणींचे रक्ताने पत्र…; देवेंद्र फडणवीस बहिणींची ‘ही’ इच्छा पूर्ण करणार का?

महिलांनी त्यांच्या पत्रात, सातारा जिल्ह्यात गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या बेकायदेशीर दगड फोडण्याच्या खाणींकडे लक्ष वेधले आहे. अवैध खाणींमुळे वाई तालुक्यातील हवेत वाढती धूळ आणि प्रदूषणाचा मुद्दा बहिणींनी उपस्थित क

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Aug 10, 2025 | 10:19 AM
Ladki Bahin Yojna News: 1500 रुपये नको, लाडक्या बहिणींचे रक्ताने पत्र…; देवेंद्र फडणवीस बहिणींची ‘ही’ इच्छा पूर्ण करणार का?
Follow Us
Close
Follow Us:

Ladki Bahin Yojna News:  रक्षाबंधनाच्या निमित्ताने ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण’ योजनेचा जुलै महिन्याचा हफ्ता लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा करण्यास सुरूवात झाली आहे. अनेक महिलांच्या खात्तात पैसेही जमा होऊ लागले आहेत. गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य सरकारने ही योजना महिलांसांठी सुरू केली होती. त्यानुसार राज्यातील महिलांना १५०० रुपये दिले जातात.

पण अशातच सातारा जिल्ह्यातील काही महिलांनी रक्षाबंधनाच्या निमित्ताने लाडक्या बहिणींचे १५०० रुपये देण्याऐवजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एक वेगळीच मागणी केली आहे. इतकेच नव्हे तर, त्यांनी त्यांच्या रक्ताने पत्र लिहीत त्यांची मागणी मुख्यमंत्र्यांकडेकेली आहे. महिलांना रक्ताने लिहिलेल्या पत्रात मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे वाई तालुक्यातील बेकायदेशीर खाणी बंद करण्याची मागणी केली आहे. वाईच्या लाडक्या बहिणींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना रक्ताने पत्र लिहिले आहे.

महिलांनी त्यांच्या पत्रात, सातारा जिल्ह्यात गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या बेकायदेशीर दगड फोडण्याच्या खाणींकडे लक्ष वेधले आहे. अवैध खाणींमुळे वाई तालुक्यातील हवेत वाढती धूळ आणि प्रदूषणाचा मुद्दा बहिणींनी उपस्थित केला आहे. खाणींमुळे प्रदूषित होणारी हवा स्थानिक लोकांच्या आरोग्याला हानी पोहोचवत आहे. लोकांमध्ये श्वसन, त्वचा आणि इतर आरोग्यविषयक विकार वाढत आहेत. खाणकामामुळे जवळच्या जलसाठ्यांमध्ये गाळ किंवा रासायनिक प्रदूषण होण्याची शक्यता आहे. स्थानिक लोकांनी याविरोधात निषेध नोंदवला आहे आणि क्रशर परवाना रद्द करण्याची मागणी केली आहे.

वारंवार आंदोलन करूनही ही समस्या सुटत नाही, दगड फोडणाऱ्या खाणी बंद करण्याची विनंती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना करावी अशी मागणी प्रिय भगिनींनी केली आहे. मुख्यमंत्र्यांना रक्ताने पत्र लिहिण्याव्यतिरिक्त, गेल्या २२ दिवसांपासून वाई ते मुंबई मंत्रालय असा लाँग मार्च काढला जात असल्याचे सांगण्यात येत आहे. वाई तालुक्यात बेकायदेशीरपणे चालणारे दगड खाण क्रशर बंद करण्याची मागणी करत हा लाँग मार्च काढण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर, लाडक्या बहिनींनीदेवेंद्र फडणवीस यांना रक्ताने पत्र लिहून रक्षाबंधनाला बेकायदेशीर क्रशर बंद करण्याची मागणी केली आहे. वाईच्या महिलांनी भावनिक आवाहन केले आहे आणि लिहिले आहे की रक्षाबंधनाच्या दिवशी आम्हाला १५०० रुपयांची भेट देऊ नका, तर क्रशर बंद करून आम्हाला न्याय द्या, असंही त्यांनी म्हटलं आहे.

 

Web Title: Dont want rs 1500 a letter in blood from beloved sisters will devendra fadnavis fulfill this wish of sisters

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 10, 2025 | 10:19 AM

Topics:  

  • Ladki Bahin Yojna

संबंधित बातम्या

Ladki Bahin Yojna Latest update: लाडक्या बहिणींना सरकारचा दणका; अपात्र महिलांचा लाभ बंद होणार
1

Ladki Bahin Yojna Latest update: लाडक्या बहिणींना सरकारचा दणका; अपात्र महिलांचा लाभ बंद होणार

Ladki Bahin Yojna News: लाडकी बहीण योजना थांबणार? राज्य सरकारचा नवा निर्णय, रक्षाबंधनापूर्वी महिलांना मोठा धक्का
2

Ladki Bahin Yojna News: लाडकी बहीण योजना थांबणार? राज्य सरकारचा नवा निर्णय, रक्षाबंधनापूर्वी महिलांना मोठा धक्का

Ladki Bahin Yojna News: लाडकी बहीण योजनेवरून राजकारण तापणार; आक्रमक महिलांचा थेट उच्च न्यायालयात जाण्याचा इशारा
3

Ladki Bahin Yojna News: लाडकी बहीण योजनेवरून राजकारण तापणार; आक्रमक महिलांचा थेट उच्च न्यायालयात जाण्याचा इशारा

Shaktieeth Expressway: ‘शक्तिपीठ’ महामार्गावरून राजकारण तापलं; फडणवीसांच्या प्रकल्पावरून कोल्हापुरात तणाव
4

Shaktieeth Expressway: ‘शक्तिपीठ’ महामार्गावरून राजकारण तापलं; फडणवीसांच्या प्रकल्पावरून कोल्हापुरात तणाव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.