Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मंत्रालयातील लाचप्रकरणानंतर मंत्री नरहरी झिरवाळ ‘अ‍ॅक्शन मोड’वर; घेतला ‘हा’ मोठा निर्णय

अन्न व औषध प्रशासन विभागात लिपिक म्हणून काम करणाऱ्या राजेंद्र ढेरंगे याला ३५ हजाराची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाने अटक केली होती. थेट मंत्रालयातील मंत्रिदालनातच हा प्रकार घडल्याने एकच खळबळ उडाली होती.

  • By कृपादान आवळे
Updated On: Feb 21, 2026 | 08:39 AM
मंत्री झिरवाळ यांच्या खासगी सचिवांवर मोठी कारवाई; थेट कार्यमुक्तीच दिली

मंत्री झिरवाळ यांच्या खासगी सचिवांवर मोठी कारवाई; थेट कार्यमुक्तीच दिली

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या मंत्रालयातील कार्यालयातच लिपिक राजेंद्र ढेरंगे याने ३५ हजारांची लाच स्वीकारली होती. या प्रकारामुळे राज्यात एकच खळबळ उडाली होती. नरहरी झिरवाळ यांनी आता त्यांचे खासगी सचिव (पीएस) डॉ. रामदास गाडे यांना पदावरून कार्यमुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांना त्यांच्या मूळ विभागात म्हणजे कृषि व पदुम विभाग, मंत्रालय येथे पाठवण्याचा निर्णय झिरवाळ यांनी घेतला आहे.

अन्न व औषध प्रशासन विभागात लिपिक म्हणून काम करणाऱ्या राजेंद्र ढेरंगे याला ३५ हजाराची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाने अटक केली होती. थेट मंत्रालयातील मंत्रिदालनातच हा प्रकार घडल्याने एकच खळबळ उडाली होती. यानंतर झिरवाळ चांगलेच अडचणीत आले. विरोधी पक्षांनी त्यांना लक्ष्य केले. पक्षाकडूनही त्यांना समज देण्यात आली. मात्र, नरहरी झिरवाळ यांनी आपला या प्रकरणाशी दूरान्वयेही संबंध नसल्याचे स्पष्ट केले होते. झिरवाळ यांनी स्वतः देखील या प्रकरणाची चौकशी सुरू केली होती. आता त्यांचे पीएस रामदास गाडे यांनाच झिरवाळ यांनी पदावरून दूर केले आहे.

दरम्यान, डॉ. गाडे हे सहाय्यक आयुक्त (पशुसंवर्धन), कृषि व पदुम विभाग, मंत्रालय, मुंबई येथे कार्यरत असून, ते प्रतिनियुक्तीवर खाजगी सचिव या पदावर काम पाहत होते. १६ फेब्रुवारी २०२६ (म.पु.) पासून त्यांची सेवा त्यांच्या मूळ विभागात कृषि व पदुम विभाग, मंत्रालय, मुंबई येथे प्रत्यावर्तित करण्यात आली आहे. या संदर्भातील आवश्यक आदेश तातडीने निर्गमित करावेत, असे निर्देश मंत्री नरहरी झिरवाळ यांनी सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय यांना पत्राद्वारे दिले आहेत.

हेदेखील वाचा : Maharashtra Politics : नरहरी झिरवळ यांचे मंत्रिपद धोक्यात? सुनेत्रा पवारांनी बोलावली राष्ट्रवादी पक्षाची तातडीची बैठक

नरहरी झिरवाळ वादाच्या भोवऱ्यात

नरहरी झिरवळ हे वादाच्या भोवऱ्यामध्ये अडकले आहेत. मंत्रिमंडळातील त्यांच्या दालनामध्ये लाचखोरीचे प्रकरणावरील कारवाईमुळे झिरवळ यांच्यावर टीका केली जात आहे. विरोधकांनी मंत्री नरहरी झिरवळ यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. सुनेत्रा पवार यांनी बोलावलेल्या बैठकीमध्ये नरहरी झिरवळ सहभागी झाले होते. त्यामुळे सुनेत्रा पवार या प्रकरणी त्यांची मतेही जाणून घेतल्याचे सांगण्यात आले आहे.

Web Title: Dr rajendra dharange are out from private secretary service

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 21, 2026 | 08:35 AM

Topics:  

  • Bribe Case
  • Narhari Zirval

संबंधित बातम्या

Maharashtra Politics : नरहरी झिरवळ यांचे मंत्रिपद धोक्यात? सुनेत्रा पवारांनी बोलावली राष्ट्रवादी पक्षाची तातडीची बैठक
1

Maharashtra Politics : नरहरी झिरवळ यांचे मंत्रिपद धोक्यात? सुनेत्रा पवारांनी बोलावली राष्ट्रवादी पक्षाची तातडीची बैठक

दीड हजारांची लाच स्वीकारणं सहाय्यक महसूल अधिकाऱ्याला भोवलं; ACB ने रंगेहात पकडलं
2

दीड हजारांची लाच स्वीकारणं सहाय्यक महसूल अधिकाऱ्याला भोवलं; ACB ने रंगेहात पकडलं

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.