पुणे : गणेशोत्सवाच्या (Ganeshotsav 2022 ) काळात शहरातील शांतता आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी प्रशासन सरसावले असून एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. पुण्यात गणेशोत्सवा निमित्त 31 ऑगस्ट आणि 9 सप्टेंबर रोजी पूर्ण दिवस जिल्ह्यातील दारू दुकाने बंद (Liquor Ban In Pune) ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
[read_also content=”https://www.navarashtra.com/maharashtra/trial-of-metro-3-today-first-phase-likely-to-start-by-2023-nrps-320718.html आज मेट्रो 3 ची ट्रायल, 2023 पर्यंत पहिला टप्पा सुरू होण्याची शक्यता”]
राज्यात गणेशोत्सवाची सगळीकडे धामधूम सुरू आहे. गणरायाच्या आगमनाला अवघे काही तास उरले आहेत. अशातच पुण्यात गणशोत्सव काळात 31 ऑगस्ट आणि 9 सप्टेंबर ला पूर्ण दिवस जिल्ह्यातील दारू दुकाने बंद राहणार आहेत. तर, 10 तारखेला विसर्जन मिरवणुका संपेपर्यंत महापालिका क्षेत्रातील दारू दुकाने बंद ठेवण्यात येणार आहे. तसेच, ज्या भागात गणशोत्सवाच्या पाचव्या आणि सातव्या दिवशी गणेश विसर्जन करण्यात येतं त्या भागातील दारू दुकाने बंद राहणार आहेत. तसेच या दरम्यानन कुठेही गैरप्रकार आढळल्यास किंवा आदेशाचे पालन न झाल्यास कठोर कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे.
[read_also content=”जळगाव जिल्ह्यात भीषण अपघात; वैजापूरचे तीन तरुण ठार, सहा जखमी https://www.navarashtra.com/maharashtra/fatal-accident-in-jalgaon-district-three-youths-of-vaijapur-killed-six-injurednrrd-320719.html”]