Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कार्तिकी यात्रेमुळे पुणे -नाशिक महामार्ग दिंडीमय; मार्गावर ठिकठिकाणी दिंड्यांचे उत्स्फूर्त स्वागत

आळंदी येथे रविवारी ( दि. २०) कार्तिक यात्रा असल्याने नाशिक, कल्याण, संगमनेर इत्यादी भागातील पायी दिंड्या आळंदीकडे मार्गस्थ होऊ लागल्या आहेत. त्यामुळे पुणे - नाशिक महामार्ग दिंडीमय झाला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Nov 18, 2022 | 01:31 PM
कार्तिकी यात्रेमुळे पुणे -नाशिक महामार्ग दिंडीमय; मार्गावर ठिकठिकाणी दिंड्यांचे उत्स्फूर्त स्वागत
Follow Us
Close
Follow Us:

पुणे : आळंदी येथे रविवारी ( दि. २०) कार्तिक यात्रा असल्याने नाशिक, कल्याण, संगमनेर इत्यादी भागातील पायी दिंड्या आळंदीकडे मार्गस्थ होऊ लागल्या आहेत. त्यामुळे पुणे – नाशिक महामार्ग दिंडीमय झाला आहे.

कार्तिक महिन्यातील आळंदीची श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या ७२६ व्या जयंतीनिमित्त आळंदी या ठिकाणी मोठा उत्सव होणार आहे. आळंदी एकादशीनिमित्त नाशिक ते पुणे जाणाऱ्या दिंड्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर असल्याचे दिसून येत आहे. वारकरी संप्रदायातील भाविक भक्त दिंडीमध्ये सहभागी झाल्याने जुना पुणे -नाशिक महामार्ग दिंडीमय झाल्याचे दिसून येत आहे.

ग्रामस्थांकडून वारकऱ्यांना अन्नदान

‘साधूसंत येती घरा, तोची दिवाळी दसरा’, या उक्तीप्रमाणे कळंब आणि कळंब पंचक्रोशीतील ग्रामस्थ दिंडीत सहभागी झालेल्या भाविकांचे जागोजागी स्वागत करून त्यांच्या चहापाण्याची नाश्त्याची व जेवणाची व्यवस्था करताना दिसत आहेत. कळंब या ठिकाणी उद्योजक रमेश कानडे, युवराज कानडे, उद्योजक नितीन भालेराव, माजी उपसरपंच गंगाराम भालेराव, सेवानिवृत्त प्राचार्य नंदाराम भालेराव, सुनील भालेराव ,हेमंत चिखले, मोहन भालेराव, महेश भालेराव, निवृत्ती गुरव, माधव भालेराव यांच्यासह परिसरातील अनेक भाविक भक्त व दानशूर मंडळी दिंडीतील वारकऱ्यांना पूर्वीपासूनच अन्नदान करीत आहेत.

एकलहरेला प्रति आळंदीचे स्वरूप

एकलहरे गावांमध्ये पंधरा ते वीस दिड्यांचा मुक्काम असल्यामुळे प्रति आळंदीचे स्वरूप एकलहरे गावांमध्ये आले होते. एकलहरे येथील साईराज मंगल कार्यालय येथे रामदास डोके यांच्या साईराज मंगल कार्यालयामध्ये अनेक दिंड्यांचा मुक्काम होता. तेथे समाज प्रबोधनकार निवृत्ती महाराज इंदोरीकर यांचे कीर्तन झाले. तसेच माजी सरपंच संतोष डोके, उद्योजक रामदास डोके, संदीप डोके, प्रवीण खरपुडे, संतोष महाराज डोके, बळीराम डोके,पोलीस पाटील सुमन बोंबे, राहुल डोके, माजी सरपंच ज्ञानेश्वर डोके, किसन महाराज डोके, दिलीप वऱ्हाडी, नवनाथ डोके, राजेंद्र गुळवे, संतोष बाणखेले यांच्यासह गावातील अनेक दानशूर व्यक्तिंच्या निवासी मुक्कामी दिंड्या आल्या असून अन्नदानाची उत्तम व्यवस्था करण्यात आली .

Web Title: Due to kartiki yatra pune nashik highway dindimay spontaneous welcome from dindas at various places on the route nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 18, 2022 | 01:31 PM

Topics:  

  • Kartiki Yatra
  • Pune

संबंधित बातम्या

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक, 40 उमेदवारांवर अपात्रतेची कारवाई
1

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक, 40 उमेदवारांवर अपात्रतेची कारवाई

Vijay Wadettiwar: नोटांच्या माळा अन् जल्लोष…, पुणे पोर्श केसवर विजय वडेट्टीवारांची तीव्र प्रतिक्रिया; “कायदा फक्त शब्दात!”
2

Vijay Wadettiwar: नोटांच्या माळा अन् जल्लोष…, पुणे पोर्श केसवर विजय वडेट्टीवारांची तीव्र प्रतिक्रिया; “कायदा फक्त शब्दात!”

Indapur Politics: ‘धरणाला भोक पाडणारेच आता निस्ताराचे बोल करतायत’; गारटकर-माने यांचा आजी-माजी मंत्र्यांवर घणाघात
3

Indapur Politics: ‘धरणाला भोक पाडणारेच आता निस्ताराचे बोल करतायत’; गारटकर-माने यांचा आजी-माजी मंत्र्यांवर घणाघात

Pune Crime: कोरेगाव पार्कमध्ये पोलिसांची रेड; विदेशी महिलांसह सेक्स रॅकेटचा भांडाफोड
4

Pune Crime: कोरेगाव पार्कमध्ये पोलिसांची रेड; विदेशी महिलांसह सेक्स रॅकेटचा भांडाफोड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.