Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘संविधानामुळे सामान्य जनेतचं आयुष्य बदललं’, महापरिनिर्वाण दिनी राज्यपालांनी बाबसाहेबांना केलं अभिवादन

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Dec 06, 2022 | 12:02 PM
‘संविधानामुळे सामान्य जनेतचं आयुष्य बदललं’, महापरिनिर्वाण दिनी राज्यपालांनी बाबसाहेबांना केलं अभिवादन
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : आज डॉ. बाबासाहेबांच्या 66 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त (Mahaparinirvan din) चैत्यभूमीवर राज्यभरातून मोठ्या संख्येनं आंबेडकरांचे अनुयायी दाखल झाले आहेत. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही चैत्यभूमीला भेट देत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलं.  ‘बाबासाहेबांकडून जगण्याची प्रेरणा मिळते, तसेच संविधानामुळे सामान्य जनेतचं आयुष्य बदललं’ असं राज्यपाल कोश्यारी म्हणाले.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांसह चैत्यभूमी येथे डॉ आंबेडकर यांच्या अर्धाकृती पुतळ्याला पुष्पचक्र वाहून अभिवादन केले.यावेळी राज्य मंत्रिमंडळातील मंत्री मंगल प्रभात लोढा, दिपक केसरकर व संजय राठोड तसेच प्रकाश आंबेडकर, आनंदराज आंबेडकर, लोकप्रतिनिधी, भन्ते राहुल बोधी, डॉ बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण समन्वय समितीचे महासचिव नागसेन कांबळे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

[read_also content=”कोलंबियात भूस्खलन; आठ मुलांसह ३४ ठार, बस चिखलाखाली दबली https://www.navarashtra.com/world/landslides-in-colombia-34-killed-including-eight-children-bus-buried-under-mud-nrgm-351358.html”]

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजातील गरीब, उपेक्षित व वंचित देशबांधवांमध्ये स्वाभिमान जागविला. त्यांचे समता – समानतेचे स्वप्न आज साकार होताना दिसत आहे. त्यामुळे देशातील प्रत्येक नागरिक आपण भारतीय असल्याचा सार्थ अभिमान बाळगत आहे, असे राज्यपाल कोश्यारी यांनी यावेळी झालेल्या सभेत सांगितले. अनेक देशातील राजदूत आपणांस ज्यावेळी भेटतात त्यावेळी ते भारत लवकरच जगातील पहिल्या क्रमांकाचे राष्ट्र होईल असा विश्वास व्यक्त करतात, असे त्यांनी सांगितले. डॉ आंबेडकर यांनी अनेक क्षेत्रांमध्ये अद्भुत असे योगदान दिले आहे, परंतु जनसामान्यांना आत्मभान देणे हे त्यांचे सर्वात मोठे कार्य असल्याचे राज्यपालांनी सांगितले.

 

‘संविधानामुळे सामान्य जनेतचं आयुष्य बदललं’ – राज्यपाल

डॉ. बाबासाहेबांचं कार्य मोठं आहे. बाबासाहेबांकडून जगण्याची प्रेरणा मिळते, तसेच संविधानामुळे सामान्य जनेतचं आयुष्य बदललं असं सांगत महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी चैत्यभूमीवरून जनतेला संबोधित केले, डॉ. बाबासाहेबांनी दाखवलेल्या समता, बंधुता आणि न्यायाच्या मार्गावर आजवर आपण चालत आलोय आणि चालत राहू असं राज्यपालांनी जनतेला संबोधित करताना म्हटलंय.

‘बाबासाहेब आंबेडकरांमुळे देशाला सर्वोत्तम संविधान प्राप्त’ – देवेंद्र फडणवीस

बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे देशाला सर्वोत्तम संविधान प्राप्त झालं. डॉ. आंबेडकर यांचा संदेश देशाच्या हिताचा आहे. बाबासाहेबांच्या मार्गावर चालण्याचा संकल्प करुया, असं राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.

Web Title: Due to the constitution the life of the common man has changed the governor greeted babasaheb nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 06, 2022 | 12:02 PM

Topics:  

  • babasaheb ambedkar
  • Bhagat Singh Koshyari

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.