Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ichalkaranji Accident: डंपरची मागून दुचाकीला धडक; दुचाकीस्वार जागीच ठार 

अपघात झाल्यानंतर नागरिकांचा आरडाओरडा ऐकून डंपर चालकाने थोड्या अंतरावर जात डंपर थांबवला व त्याने घटनास्थळावरुन पलायन केले.

  • By तेजस भागवत
Updated On: Jun 01, 2025 | 02:23 PM
Ichalkaranji Accident: डंपरची मागून दुचाकीला धडक; दुचाकीस्वार जागीच ठार 
Follow Us
Close
Follow Us:

इचलकरंजी:  इचलकरंजीमध्ये समोर निघालेल्या दुचाकीला डंपरने पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात डंपरच्या चाकाखाली सापडून दुचाकीस्वार जागीच ठार झाला. राजेंद्र शिवाजी चोपडे (वय  ५८ रा. तारदाळ रोड खोतवाडी) असे त्यांचे नांव आहे. सांगली रोडवरील पाटील मळा परिसरात ही घटना घडली. अपघातानंतर डंपर चालकाने पलायन केले. तर संतप्त जमावाने डंपरवर दगडफेक करुन त्याची तोडफोड केली. या प्रकरणी गावभाग पोलीस ठाण्यात दावलमलिक अल्लाबक्ष छपरबंद (वय ३१ रा. शामरावनगर जयसिंगपूर, मुळ रा. येनकैंची ता. सिंदगी जि. विजापूर) याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. या अपघाताची तक्रार प्रविण राजेंद्र चोपडे (वय ३३) याने दिली आहे.

खोतवाडी येथील राजेंद्र चोपडे हे शनिवारी सकाळी कामानिमित्त दुचाकी (क्र.एमएच ०९ डीएच ५२२०) वरुन इचलकरंजीत आले होते. काम आटोपल्यानंतर ते दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घरी परतत होते. सांगली रोडवरील पाटील मळा परिसरात त्यांच्या दुचाकीला पाठीमागून येत असलेल्या डंपर (क्र. एमएच २० एटी ८५९३) ने जोराची धडक दिली.

डंपरच्या धडकेने चोपडे हे दुचाकीसह रस्त्यावर पडले. त्याचवेळी डंपर त्यांच्या अंगावरुन गेल्याने चोपडे यांचा जागीच मृत्यू झाला. अपघात झाल्यानंतर नागरिकांचा आरडाओरडा ऐकून डंपर चालकाने थोड्या अंतरावर जात डंपर थांबवला व त्याने घटनास्थळावरुन पलायन केले. अपघाताची माहिती समजल्यानंतर अपघातस्थळी चोपडे यांचे नातेवाईक आणि मित्र परिवार जमले होते.

Pune Accident: दारू पिऊन १२ जणांना उडवले; पुण्यातील घटनेबाबत CM फडणवीसांचे ‘हे’ महत्वाचे निर्देश

या अपघातामुळे संतप्त जमावाने डंपरवर दगडफेक करुन त्याची तोडफोड केली. अपघाताची माहिती समजताच गावभागचे पोलीस निरीक्षक महेश चव्हाण यांच्यासह पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करुन विच्छेदनासाठी मृतदेह इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात पाठवला. पोलिसांनी दोन्ही अपघातग्रस्त वाहने ताब्यात घेतली असून याप्रकरणी गावभाग पोलीस ठाण्यात डंपर चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

पुण्यात भीषण अपघात

काल पुण्यात संध्याकाळच्या सुमारास सदाशिव पेठेत एक भीषण अपघात घडला. एक मद्यधुंद कार चालकाने १२ विद्यार्थ्यांना गाडीने उडवल्याची दुर्दैवी घटना घडली. पुण्याच्या मध्यवर्ती भागात ही घटना घडली आहे. सदाशिव पेठ हा कायमच वर्दळ असणारा भाग आहे. या ठिकाणचे रस्ते अरुंद आहेत. दरम्यान या प्रकरणातील आरोपीला अटक करण्यात आली आहे. जखमीनवर उपचार सुरू आहेत.

पुणे शहरातील सदाशिव पेठेत असणाऱ्या भावे हायस्कूल जवळ एका कार चालकाने चहा पित असणाऱ्या १२ विद्यार्थ्यांना धडक दिली. यात 2 जण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. दोन जणांची प्रकृती गंभीर असल्याचे समोर आले आहे. य घटनेचे सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आले आहे.

 

Web Title: Dumper hits bike from behind bike rider dies on the spot ichalkaranji accident marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 01, 2025 | 02:21 PM

Topics:  

  • Accident
  • Accident Death
  • Ichalkaranji

संबंधित बातम्या

Gautami Patil : रिक्षाचालक अपघात प्रकरणी गौतमी पाटीलला होणार अटक? रक्ताचे नमुने फॉरेन्सिकला पाठवले, CCTV फुटेजमध्ये काय?
1

Gautami Patil : रिक्षाचालक अपघात प्रकरणी गौतमी पाटीलला होणार अटक? रक्ताचे नमुने फॉरेन्सिकला पाठवले, CCTV फुटेजमध्ये काय?

Sindhudurga Breaking: मोठी बातमी! शिरोडा-वेळागर समुद्रात 8 पर्यटक बुडाले, 3 जणांचा मृत्यू
2

Sindhudurga Breaking: मोठी बातमी! शिरोडा-वेळागर समुद्रात 8 पर्यटक बुडाले, 3 जणांचा मृत्यू

मोठी बातमी! दुर्गा विसर्जनादरम्यान ट्रॅक्टर ट्रॉली नदीत कोसळली, ११ जणांचा मृत्यू, 3 जण बेपत्ता
3

मोठी बातमी! दुर्गा विसर्जनादरम्यान ट्रॅक्टर ट्रॉली नदीत कोसळली, ११ जणांचा मृत्यू, 3 जण बेपत्ता

अस्थी विसर्जन करायला गेले अन् रस्त्यातच यमाने गाठलं, कार अपघातात कुटुंबातील 6 जणांचा मृत्यू; घटनेचा थरारक Video Viral
4

अस्थी विसर्जन करायला गेले अन् रस्त्यातच यमाने गाठलं, कार अपघातात कुटुंबातील 6 जणांचा मृत्यू; घटनेचा थरारक Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.