अकलूज Ashadhi Wari 2025: ‘अश्व धावे अश्वामागे | वैष्णव उभे रिंगणी || टाळ मृदंगा संगे गेले रिंगण रंगूनी’॥ या काव्य रचनेप्रमाणे वैष्णवांच्या दाटीत अश्वांच्या तीन नेत्रदीपक फेऱ्या दौडीला प्रारंभ झाला टाळ मृदंगाच्या गजरात माउली माउली नामाचा उद्घोष सुरू असतानाच लाखो वैष्णवांच्या डोळ्याचे पारणे फेडणाऱ्या व वारीच्या वाटचालीत नवचैतन्य निर्माण करणारा हा पहिला गोल रिंगणाचा सोहळा आज मोठ्या उत्साहात व भक्तीमय वातावरणात पुरंदावडे येथे पार पडला व दुपारची न्याहरी करून सायंकाळी माळशिरस ठिकाणी मुक्कामी विसावला.