Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Baramati Assembly bypoll Elections 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पांचगणीत वसुंधरा दिनी ८००+ सिड बॉल्स निर्मिती व १३० किलो कचरा संकलन; नगरपरिषद–हिलदारीचा संयुक्त उपक्रम

पांचगणी नगरपरिषद आणि हिलदारी यांनी वसुंधरा दिनानिमित्त ८०० बीजगोळे तयार केले आणि स्वच्छता मोहीम राबवली. पर्यटनस्थळी कचरा व्यवस्थापनाबाबत जनजागृती करण्यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरला.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Apr 29, 2026 | 08:31 PM
पांचगणीत वसुंधरा दिनी ८००+ सिड बॉल्स निर्मिती व १३० किलो कचरा संकलन

पांचगणीत वसुंधरा दिनी ८००+ सिड बॉल्स निर्मिती व १३० किलो कचरा संकलन

Follow Us
Close
Follow Us:

 

  • पांचगणीत वसुंधरा दिनी ८००+ सिड बॉल्स निर्मिती व १३० किलो कचरा संकलन
  • नगरपरिषद–हिलदारीचा संयुक्त उपक्रम
वाई : जागतिक वसुंधरा दिनाच्या (Earth Day ) निमित्ताने पांचगणी गिरीस्थान नगरपरिषद व नेस्ले प्रणित हिलदारी यांच्या संयुक्त विद्यमाने व स्वच्छ सर्वेक्षण व माझी वसुंधरा अभियाना अंतर्गत शहरात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. पर्यटनस्थळ म्हणून ओळख असलेल्या पांचगणीमध्ये स्वच्छता व कचरा व्यवस्थापनाबाबत जनजागृती करण्यावर या उपक्रमांचा विशेष भर होता.

जनजागृती उपक्रम

या निमित्ताने Kids Nest Pre-Primary School यांच्या सहकार्याने समर कॅम्पमध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांसाठी कचरा वर्गीकरण व पर्यटन स्थळी स्वच्छतेचे महत्त्व यावर मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात आले. यासोबतच लहानग्यासोबत “Bin It to Win It”, “Ladder of Cleanliness” आणि “Pyramid of Segregation” या आकर्षक व मनोरंजक खेळांच्या माध्यमातून सहभागीांना प्रत्यक्ष अनुभवातून शिक्षण देण्यात आले. तसेच विजेत्यांना बक्षिसेही प्रदान करण्यात आली.

वाई तालुक्यातील ‘धरणाखालचा रस्ता’ अर्धवट; नागरिकांत तीव्र संताप, आंदोलनाचाही इशारा

सिड बॉल मेकिंग

तसेच नगरपालिका शाळा क्र. १ व २ यांच्या विद्यार्थ्यांच्या सहकार्याने बीजगोळे (Seed Balls) तयार करण्याचा उपक्रम राबविण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रारंभी डॉ. मुकेश कुलकर्णी यांनी वसुंधरा दिनाचे महत्त्व सविस्तरपणे विशद करत सध्याच्या बदलत्या हवामान परिस्थितीमुळे निर्माण होत असलेल्या पर्यावरणीय आव्हानांवर प्रकाश टाकत पर्यावरण संरक्षणाची तातडीची गरज अधोरेखित केली. यावेळी बीजगोळ्यांचे (Seed Balls) महत्त्व स्पष्ट करताना त्यांनी पर्जन्यमानाचे प्रमाण, मृदा धूप आणि हरित आच्छादनातील घट लक्षात घेता बीजगोळे हे वृक्षलागवडीसाठी प्रभावी व सुलभ माध्यम असल्याचे सांगितले. कमी संसाधनांमध्ये मोठ्या प्रमाणावर हरितीकरण साध्य करण्यासाठी बीजगोळे उपयुक्त ठरतात, असे त्यांनी नमूद केले. या उपक्रमात ३५ हून अधिक विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेत सुमारे ८०० पेक्षा अधिक बीजगोळे तयार केले. पर्यावरण संवर्धनासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरला. यासाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री. लक्ष्मण हिरवे, श्री. रोहन पवार तसेच इतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.

स्वच्छता मोहीम

या निमित्ताने नगरसेवक श्री आकाश बगाडे यांच्या पुढाकारातून व कृष्णाई क्रीडा मंडळ, भीम नगर यांच्या सहकार्यातून टेबल लँड रोड वर स्वच्छता अभियान देखील आयोजित करण्यात आले. सदर मोहिमेदरम्यान १३० किग्र पेक्षा जास्त कचरा गोळा करण्यात आला. या संपूर्ण उपक्रमासाठी पांचगणीचे नगराध्यक्ष मा. दिलीपभाऊ बागडे, मुख्याधिकारी मा. पंडित पाटील, उपाध्यक्ष मा. प्रकाश गोळे, आरोग्य सभापती मा. राजश्री सणस तसेच सर्व नगरसेवक यांचे मार्गदर्शन लाभले. याशिवाय आरोग्य विभाग प्रमुख स्वाती पाटील, सिटी कोऑर्डिनेटर श्री. ओंकार ढोले व नगरपरिषदेचे अधिकारी व कर्मचारी यांचे सहकार्य मिळाले. संपूर्ण उपक्रम यशस्वी करण्यासाठी हिलदारी टीम ने परिश्रम घेतले.

Wai News: पाचगणीत ‘सफाई मित्रांचा’ गौरव! नगरपरिषद आणि हिलदारीतर्फे उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सन्मान

Web Title: Earth day celebration panchgani municipal council hilldari seed balls cleanliness drive

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 29, 2026 | 08:31 PM

Topics:  

  • Wai News

संबंधित बातम्या

Satara News : वाईत भाजपची आक्रमक रणनीती; मकरंद पाटील यांना दिले थेट आव्हान
1

Satara News : वाईत भाजपची आक्रमक रणनीती; मकरंद पाटील यांना दिले थेट आव्हान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.