Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

प्रसिद्ध सोने व्यापारी तथा ज्वेलर्स राजमल लखीचंद यांच्या कार्यालयासह पेढींवर छापेमारी, जाणून घ्या यातले शरद पवार कनेक्शन, पाहा सविस्तर रिपोर्ट

जळगावच्या सुवर्णनगरीत मोठी खळबळ उडाली आहे. ईडीच्या तब्बल 60 अधिकाऱ्यांनी मिळून राजमल लखीचंद यांच्या मोठ्या सराफा ज्वेलर्सवर धाडी टाकत चौकशी सुरू केली आहे. मुंबई, नाशिकसह अनेक अधिकाऱ्यांची टीम या धाडीत सामील आहेत. अचानक पडलेल्या धाडीने सराफा व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे. राजमल लखीचंद यांच्या मुंबई, नाशिक, जळगावसह अनेक ज्वेलर्स शॉपवर धाडी टाकण्यात आल्या आहेत. एकदम पडलेल्या धाडींमुळे आता याचे राजकीय कनेक्शन शोधण्यात येते आहे. पाहुया यावरील राजकीय किनार असलेला हा सविस्तर रिपोर्ट

  • By युवराज भगत
Updated On: Aug 18, 2023 | 04:12 PM
प्रसिद्ध सोने व्यापारी तथा ज्वेलर्स राजमल लखीचंद यांच्या कार्यालयासह पेढींवर छापेमारी, जाणून घ्या यातले शरद पवार कनेक्शन, पाहा सविस्तर रिपोर्ट
Follow Us
Close
Follow Us:

जळगाव : जळगावच्या राजमल लखीचंद ज्वलर्सवर ईडीने धाडी टाकल्यानंतर सोन्याच्या व्यापाऱ्यांमध्ये आणि सराफा व्यावसायिकांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे. ईडी आणि इन्कम टॅक्स विभागाने जळगावच्या प्रसिद्ध राजमल लखीचंद ज्वेलर्सवर कारवाई केली  आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे खजिनदार आणि माजी खासदार ईश्वर लाल जैन यांच्या सहा कंपन्यांवर मुंबई, नाशिकसह अनेक ठिकाणी छापेमारीची कारवाई केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली आहे. कोषाध्यक्ष असल्याने पार्टीला मिळालेली फंडिंग आणि कागदपत्रांसह अनेक कारणांमुळे चौकशी सुरु आहे. या कारवाईमुळे जळगावच्या सुवर्ण नगरीत खळबळ उडाली आहे.

जळगाव आणि नाशिकच्या एकूण सहा कंपन्यांवर छापेमारीची कारवाई करण्यात आली. गुरुवारी पहाटे चार वाजल्यापासून या सगळ्या ठिकाणी तपास सुरु होता. कुठल्या कारणामुळे चौकशी झाली ते समजू शकलेलं नाही. काही राजकीय कारणांमुळे ही चौकशी झाल्याच काही विश्वसनीय सूत्रांनी सांगितलं. 

मुंबई, नागपूर, औरंगाबादमध्ये सुद्धा ईडीने कारवाई केली आहे. गुरुवारी जळगावमध्ये एकाचवेळी दहा गाड्या दाखल झाल्या. माजी आमदार मनीष जैन आणि माजी खासदार ईश्वरलाल जैन यांच्या जळगाव-नाशिकमधील एकूण सहा कंपन्यांवर छापेमारीची कारवाई करण्यात आली. त्या ठिकाणची संपत्ती आणि कागदपत्रांची चौकशी करण्यात आली. मनीष जैनची सुद्धा अधिकाऱ्यांनी चौकशी केली. त्यांच्याकडून आवश्यक माहिती घेतली.

कारवाईसाठी ईडीची किती जणांची टीम आलेली?

ईडीच्या 60 सदस्यीय पथकाकडून ही चौकशी सुरु आहे. चौकशी सुरु असातना ग्राहकांना आत जाण्याची परवानगी नव्हती. त्याचवेळी आतमध्ये असलेल्या कर्मचाऱ्यांना बाहेर पाठवण्यात आलं. दोन्ही टीम्स कुठल्या कारणामुळे चौकशी करत होते, ते समजलेले नाही. मागच्यावर्षी डिसेंबर महिन्यात सीबीआयने राजमल लखीचंद ज्वेलर्सची चौकशी केली होती.

शरद पवारांचे कोणी समर्थन केलं?

राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर माजी खासदार ईश्वरलाल जैन यांनी शरद पवार यांचे समर्थन केले होते. ईश्वरलाल जैन बराचकाळ विधान परिषदेवर आमदार होते. मनीष जैन यांनी शरद पवार यांची साथ सोडली व अजित पवारांसोबत गेले. ईश्वरलाल जैन 10-15 वर्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे खजिनदार होते.

Web Title: Ed raids on famous gold trader and jewelers rajmal lakhichand office so know sharad pawar connection see detailed report nryb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 18, 2023 | 04:12 PM

Topics:  

  • NCP president Sharad Pawar

संबंधित बातम्या

Sharad Pawar : जगात क्रांती होत आहे, पण…; शरद पवारांनी व्यक्त केली खंत
1

Sharad Pawar : जगात क्रांती होत आहे, पण…; शरद पवारांनी व्यक्त केली खंत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.