मुंबई: एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आमदारांसह बंड पुकारल्यानंतर उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर १२ खासदारही शिंदे गटामध्ये सामील झाले आहेत. आता एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्यांच्या भेटी घ्यायला सुरुवात केली आहे. शिवसेनेत नेतेपद भूषवणारे लिलाधर डाके (Liladhar Dake) यांची आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट घेतली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे संध्याकाळी माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे नेते मनोहर जोशी (Manohar Joshi) यांची भेट घेणार आहेत.
[read_also content=”भारती सिंगचा मुलगा बनला जोकर, गोंडस बाळानं जिंकली लोकांची मनं https://www.navarashtra.com/movies/bharti-singhs-son-became-a-joker-the-cute-baby-won-peoples-hearts-309001.html”]
लिलाधर डाके यांच्या भेटीनंतर मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्यांची सदिच्छा भेट घेतली. लिलाधर ढाकेंचा प्रवास जवळून पाहिला आहे. बाळासाहेबांबरोबर तसेच आनंद दिघेंसोबतही ढाकेंचे जिव्हाळ्याचे संबंध होते. अनेक संकट येऊनही शिवसेना वाढवण्याचं काम लिलाधर ढाकेंनी केलं. त्यांनी स्वत:साठी काहीही केलं नाही जे केलं ते शिवसेनेकरता केलं. मी एक कार्यकर्ता म्हणून भेटलो. मनोहर जोशी यांची देखील भेट मी घेणार आहे. सगळ्या ज्येष्ठ नेत्यांचा मी आशिर्वाद घेणार आहे.
राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत ते म्हणाले की, मंत्रिमंडळ विस्तार लवकर होईल. पण मी आणि उमुख्यमंत्र्यांनी जनतेसाठी महत्वाचे निर्णय घेतले आहेत. राज्याच्या हिताचे पुढे नेण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. त्यांना नुकसान भरपाई दिली जाईल. त्यामुळं कुठंलही काम अडलेलं नाही, कुठेही बाधा येणार नाही, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.