Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Eknath Shinde : देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत ही माझी…; एकनाथ शिंदेंनी पत्रकार परिषदेत सगळंच सांगून टाकलं

महायुतीने आज राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा केला असून त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदे यांनी आपली बाजू मांडली. त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना पाठिंबा दिला आहे.

  • By संदीप गावडे
Updated On: Dec 04, 2024 | 06:44 PM
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत ही माझी...; एकनाथ शिंदेंनी पत्रकार परिषदेत सगळंच सांगून टाकलं

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत ही माझी...; एकनाथ शिंदेंनी पत्रकार परिषदेत सगळंच सांगून टाकलं

Follow Us
Close
Follow Us:

महायुतीने आज राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा केला असून त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदे यांनी आपली बाजू मांडली. देवेंद्र फडणवीस यांनी अडीच वर्षांपूर्वी मी मुख्यमंत्री व्हावं म्हणून, शिफारस केली होती आणि आज देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत यासाठी शिवसेनेने त्यांना पाठिंबा दिला आहे. तसं पत्र त्यांना दिलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा आणि जे. पी. नड्डा जो निर्णय घेतील तो आपल्याला मान्य असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

काय म्हणाले एकनाथ शिंदे?

आतापर्यंत महाराष्ट्राच्या इतिहासात महायुतीला इतकं मोठं यश मिळालं नव्हतं.  महाराष्ट्रातील जनतेने लाडका भाऊ, लाडक्या बहिणी, लाडके शेतकरी आणि राज्याती प्रत्येक मतदारांनी आम्हाला भरभरून दिलं आहे. यामागे गेल्या अडीच वर्षात जे आम्ही काय तिन्ही पक्षांनी मिळून काम केलं. त्यात कोणी कमी जास्त असं नव्हतं. आमचा उद्देश एवढाच होता की मला काय मिळालं त्यापेक्षा महाराष्ट्रातील जनतेला काय देणार आहोत. हे म्हत्त्वाचं होतं. सर्वसामान्यांचं सरकार म्हणून आम्ही काम केलं.

राज्य चालवताता आम्ही अनेक निर्णय घेतले. जे प्रकल्प महाविकास आघाडी सरकारच्या काळात थांबवण्यात आले होते. या महाराष्ट्राला १०-२० वर्ष मागे नेणारा निर्णय घेण्यात आला होता. मात्र महायुतीचं सरकार आल्यानंतर तात्काळ त्या प्रकल्पांवरील बंदी उठवली आणि प्रकल्प मार्गी लावले. त्यांचं उदघाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलं.

सरकार हे सर्वसामान्यांसाठी असतं. त्यांच्या विकासासाठी असतं, त्याचं पालन आणि नियोजन करण्याचं काम आम्ही केलं आहे. याचं खूप समाधान आहे. विकास आणि कल्याणकारी योजनांची आम्ही सांगड घातली. सरकारच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या आयुष्यामध्ये आधार म्हणून सरकारची जबाबदारी असते ती आम्ही पार पाडली आहे. या कामा नरेंद्र मोदी, अमित शहा, जे. पी. नड्डा आणि केंद्रीय मंत्र्यांनी मदत केली आहे. त्याचा फायदा राज्यातील जनतेला झाला. महायुतीच्या कामांवर विश्वास ठेवून भरभरून यश दिलं. त्यामुळे खेळीमेळीच्या वातारणात सरकार स्थापन होणार आहे.

सकाळचा आणि सध्याकाळचा शपथविधी

यावेळी पत्रकारांनी त्यांना उद्या होणाऱ्या शपथविधी सोहळ्यात देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत तुम्ही आणि अजित पवार शपथ घेणार का असा प्रश्न विचारला त्यावर शिंदे म्हणाले,   थोडं थांबा, संध्याकाळपर्यंत तुम्हाला सगळी माहिती मिळेल. त्यावर अजित पवार म्हणाले, थोडी कळ काढा, त्यांचं संध्याकाळी समजेल, मी तर उद्याच शपथ घेणार आहे. मी थांबणार नाही. अजित पवारांच्या या वक्तव्यावर पत्रकार परिषदेत एकच हशा पिकला.  त्यावर शिंदे यांनी एक मिश्किल टिप्पणी केली. ते म्हणाले, अजित पवारांना अनुभव आहे. त्यांना संध्याकाळी शपथ घेण्याचा, त्याचबरोबर सकाळी शपथ घेण्याचा देखील अनुभव आहे. शिंदेंच्या या टिप्पणीवर अजित पवार कुरघोडी करत म्हणाले, मागच्या वेळी आम्ही दोघांनी (मी व देवेंद्र फडणवीस) सकाळी शपथ घेतली होती. परंतु, त्यावेळी सरकार चालवायचं राहिलं होतं. यावेळी पुढच्या पाच वर्षांसाठी सरकार चालवणार आहोत, असंही अजित पवार म्हणाले.

Web Title: Eknath shinde react on devendra fadnavis maharashtra cm candidate press conference after government forming claim

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 04, 2024 | 04:14 PM

Topics:  

  • Cm Eknath Shinde
  • maharashtra election 2024
  • Maharashtra Political

संबंधित बातम्या

“आ रे रे, उद्धव ठाकरे… काय तुमची दिल्लीत किंमत?” नरेश म्हस्के यांची उद्धव ठाकरेंवर घणाघाती टिका
1

“आ रे रे, उद्धव ठाकरे… काय तुमची दिल्लीत किंमत?” नरेश म्हस्के यांची उद्धव ठाकरेंवर घणाघाती टिका

Maharashtra Political : रायगड जिल्हा राष्ट्रवादीची धुरा सुधाकर घारेंच्या हाती, शिंदेंच्या विरोधात सुनील तटकरेंची मोठी खेळी
2

Maharashtra Political : रायगड जिल्हा राष्ट्रवादीची धुरा सुधाकर घारेंच्या हाती, शिंदेंच्या विरोधात सुनील तटकरेंची मोठी खेळी

Shiv Sena : निवडणूक पारदर्शक होण्यासाठी मतदार यादी आधार क्रमांकाशी जोडा, शिवसेना शिष्टमंडळाची केंद्रीय निवडणूक अधिकाऱ्यांकडे मागणी
3

Shiv Sena : निवडणूक पारदर्शक होण्यासाठी मतदार यादी आधार क्रमांकाशी जोडा, शिवसेना शिष्टमंडळाची केंद्रीय निवडणूक अधिकाऱ्यांकडे मागणी

Shrikant Shinde : कोल्हापूरमध्ये महायुतीचा भगवा नक्कीच फडकेल, श्रीकांत शिंदे यांचा विश्वास
4

Shrikant Shinde : कोल्हापूरमध्ये महायुतीचा भगवा नक्कीच फडकेल, श्रीकांत शिंदे यांचा विश्वास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.