
Prithviraj Chavan, Election Commissioner appointment changes,
पृथ्वीराज चव्हाण यांनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेत राज्यातील निवडणुका, मतदार याद्यांमधील घोळ आणि त्यांच्या मतदारसंघातील निवडणुकीवर भाष्य केलं. यावेळी त्यांनी आपल्याला मागील निवडणुकीपेक्षा जास्त मतं मिळूनही आपला पराभव झाल्याचे सांगितले. पण त्याचवेळी त्यांनी मतदार याद्यांमधील गोंधळामुळे आपला पराभव झाल्याचेही स्पष्ट केलं. चव्हाण म्हणाले, ‘माझ्या मतदारसंघात १२ हजार मतदारांची नावे ४८ हजार ठिकाणी आहेत. एकूण ३ लाख मतदारांपैकी. जर शेजारचे पाच मतदारसंघ धरले तर त्यातील प्रत्येक मतदारसंघातील पाच ते सात हजार मतदारांची नावे कॉमन आहेत. एकूण पाहिली तर ६० ते ७० हजार डुप्लिकेट नावे आहेत. ही सर्व नावे आपण दाखवली आहेत. ते कुणीही तपासायला हरकत नाही. ही यादी मी ओपन ठेवली आहे. पण ही निवडणूक आयोगाची जबाबदार आहे की मतदार यादी स्वच्छ असली पाहिजे. एका मतदाराचे नाव एकाच ठिकाणी असायला हवे, त्याने एकदाच मतदान केले पाहिजे. शाईला काही अर्थ नाही. ती लगेच पुसूनही टाकता येते.
Chhatrapati Sambhajinagar Municipal Election: महापालिका निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज!
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, ‘ माझ्या मतदारसंघात मल्टिपल वोटिंग मोठ्या प्रमाणात झाले आहे. पण याचा पुरावा एका विशिष्ट मर्यादेपलिकडे देता येणार नाही. पण महत्त्वाची बाब म्हणजे गेल्या निवडणुकीपेक्षा यावेळी मला जास्त मते मिळूनही माझा पराभव झाला आहे. कारण विरोधी पक्षनेत्याला जास्त मते मिळाली. ती कुठून वाढली, कशी वाढली. यावरून हेच दिसून येते की ड्युप्लिकेट मतांचा विषय खूप गंभीर आहे आणि आता नगरपालिकेच्या निवडणुकीला आपण सामोरे जात आहोत. एका वॉर्डमध्ये साधी १५-२० मतेही बोगस निघाली तरी त्याचा निकास सहजपणे बदलू शकतो. आमचा निवडणूक आयोगावर आक्षेप आहे. तुम्हाला हे सर्व लगेच थांबवता येऊ शकते. पण सत्ताधारी पक्षाला लाभ मिळावा म्हणून तुम्ही ते मुद्दामहून करत नाही. ” ही लढाई आता राष्ट्रीय पातळीवर लढत आहे आम्ही लोकल पातळीवर लढत आहोत. पण ५ महिन्यात एवढा मोठा फरक झाला. लोक म्हणतात लाडकी बहीण योजनेमुळे फरक पडला पण एवढा फरक पडला असे आम्हाला वाटत नाही. असही चव्हाण यांनी नमुद केलं.
चव्हाण म्हणाले, “महाराष्ट्राची विधानसभा निवडणुकीचा मुद्दा घेऊन राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांनी बरेच पुरावे सादर केले. खूप गदारोळ झाला. पण महाराष्ट्र आणि हरियाणाची निवडणूक वेगवेगळ्या घेतल्याने माझ्या मनात शंका निर्माण झाली. निवडणूक आयोग कुणासाठी काम करते. जनतेसाठी, सरकारसाठी की कोणा एका पक्षासाठी काम करत आहे, असा प्रश्न मनात निर्माण झाला. ज्यावेळी टी.एन. शेषण निवडणूक आयुक्त होते त्यावेळी ते म्हणायचे मी देशाचा निवडणूक आयुक्त आहे. पण आज निवडणूक आयोग भारत सरकारचे झाले आहे. यात मोठा फरक आहे. कारण मोदी सरकारने निवडणूक आयुक्त नेमणुकीची प्रक्रियाच बदलून टाकली आहे. केंद्र सरकार निवडेल तोच निवडणूक आयुक्त असे झाले आहे. (Election Commission of India)
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, “यापूर्वी निवडणूक आयुक्तांच्या निवडीसाठी पंतप्रधान, विरोधी पक्षनेता आणि सरन्यायाधीश असे सुत्र होते. पण ते भाजप सरकारला मान्य नव्हते. त्यामुळे त्यांनी ती प्रक्रियाच बदलली. केंद्र सरकारने निवडणूक आयु्क्तांच्या निवड प्रक्रियेत बदल करण्यासाठी नवे सुत्र मांडले, आता निवडणूक आयुक्तांची निवड केंद्र सरकारमार्फत केली जाते. त्यामुळे निवडणूक आयोगाची विश्वासार्हता कमी झाली आहे. त्याचे पहिले उदाहरण म्हणजे अचानक महाराष्ट्र आणि हरियाणाच्या निवडणुका वेगवेगळ्या घेण्यात आल्या. पूर्वीपासून महाराष्ट्र आणि हरियाणाची निवडणूक एकत्र घेतली जात होती. पण कुठेतरी भाजपला राजकीय लाभ मिळवून देण्यासाठी दोन्ही राज्यांच्या निवडणुका वेगवेगळ्या घेतल्या गेल्या. राहुल गांधी यांचा मोठा मुद्दा समोर आणला. मतदार याद्यांमधील घोळ त्यांनी पुढे आणला. निवडणूक झाली, निकाल लागले. विश्लेषणे झाली. लाडकी बहीण योजनेचा किती फरक पडला. सरकारी पैशातून पैसे वाटले गेले. थेट पैशाचा मोठ्या प्रमाणात वापर झाला. या सगळ्या गोष्टी झाल्या.
माझ्या मतदार संघाची माहिती गोळा केली. यात आम्ही काही महत्त्वाच्या गोष्टीं निदर्शनास आल्या. माझ्या मतदार संघापुरते बोलायचे झाले तर, माझ्या मतदारसंघात फार मोठ्या प्रमाणात बोगस मतदारांची नोंदणी करण्यात आली. उमेदवारांना जी यादी दिली गेली. ती पीडीएफ स्वरूपात असते. या मतदार याद्यांमधील डुप्लिकेट नावे शोधणे फार कठीण असते. ते आम्ही सर्व केलं. काँग्रेसने राज्यातील सर्व २८८ मतदारसंघात ही माहिती गोळा केली आहे. यात प्रक्रियेत तामिळनाडूचे खासदार शशिकांत सेंन्थिल यांनी हे काम केलं. मुख्य मुद्दा असा की, निवडणूक आयोगाने ड्युप्लिकेट नावे काढली पाहिजेत, त्यासाठी आपल्याकडे तसे सॉफ्टवेअर देखील आहेत.