Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Baramati Assembly bypoll Elections 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Politics: महायुतीत मिठाचा खडा? “आरोप सिद्ध करा, नाहीतर…”; भेगडेंचा शेळकेंना इशारा

मावळ तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने १५ पैकी १५ जागांवर विजय मिळवत भारतीय जनता पक्षाचा सुपडा साफ केला, त्यानंतर येथील राजकारण तापले आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Feb 17, 2026 | 05:39 PM
Maharashtra Politics: महायुतीत मिठाचा खडा? "आरोप सिद्ध करा, नाहीतर..."; भेगडेंचा शेळकेंना इशारा

Maharashtra Politics: महायुतीत मिठाचा खडा? "आरोप सिद्ध करा, नाहीतर..."; भेगडेंचा शेळकेंना इशारा

Follow Us
Close
Follow Us:

वडगाव मावळमध्ये भाजपचा सुपडा साफ
आमदार सुनील शेळकेंचा नाव न घेता गंभीर आरोप
माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी दिले चोख प्रत्युत्तर

वडगाव मावळ: मावळ तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने १५ पैकी १५ जागांवर विजय मिळवत भारतीय जनता पक्षाचा (BJP) सुपडा साफ केला. मात्र या विजयानंतर तालुक्यात आरोप-प्रत्यारोपांचे राजकारण रंगताना दिसत आहे. १५ जागांवरील विजयाच्या पार्श्वभूमीवर वडगाव मावळ येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) वतीने कृतज्ञता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात बोलताना आमदार सुनील शेळके यांनी भाजपच्या स्थानिक नेत्यांवर नाव न घेता गंभीर आरोप केल्याची चर्चा झाली. या आरोपांना प्रत्युत्तर देताना माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी आक्रमक भूमिका घेत पुरावे सादर करण्याचे आव्हान दिले आहे.

वडगाव मावळ येथील भाजप कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना भेगडे म्हणाले, “२०१९ च्या निवडणुकीत आम्हाला पराभव स्वीकारावा लागला. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीतही आम्ही पराभूत झालो. मात्र निकालापूर्वी आमदार सुनील शेळके यांनी ९५ हजारांच्या फरकाने निवडून येणार असल्याचे जाहीरपणे सांगितले होते.”

Maval Politics: ‘ईव्हीएम हॅकिंगच्या नावाखाली २५-३५ लाखांची वसुली’; सुनील शेळकेंचा भाजपवर गंभीर आरोप.

ते पुढे म्हणाले की, निकालाच्या दोन दिवस आधी पराभव मान्य केल्यासारखी भूमिका घेणाऱ्या आमदारांनी अचानक एक लाख मतांच्या फरकाने विजय मिळेल असे वक्तव्य केले आणि प्रत्यक्षात ते त्या फरकानेच विजयी झाले. भेगडे यांनी सांगितले की निवडणुकीदरम्यान काही कार्यकर्ते व नागरिकांकडून ईव्हीएम संदर्भात शंका व्यक्त करण्यात आली होती. “ईव्हीएममध्ये गडबड आहे का? मतांची चोरी होते का? अशा चर्चा झाल्या. मात्र आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना स्पष्ट सांगितले की ईव्हीएममध्ये कोणतीही छेडछाड होत नाही आणि अफवा पसरवणे चुकीचे आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.

तसेच, “ते निवडून आल्यानंतर आम्ही कधीही त्यांच्यावर आरोप केले नाहीत. पत्रकार परिषद घेतली नाही, ना जाहीर सभेत ईव्हीएममध्ये गडबड करून ते निवडून आले असे म्हटले नाही. आजपर्यंत आमच्याकडून असा एकही आरोप झालेला नाही — याचा पुरावा त्यांनी दाखवावा,” असेही भेगडे म्हणाले.

Political News : “आज अजितदादा असते तर विजयोत्सव…” मावळातील निकालानंतर आमदार सुनील शेळके झाले भावूक

सोमवारी झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात भारतीय जनता पक्षाला तालुक्यात बदनाम करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. शेवटी त्यांनी इशारा देत म्हटले, “सदर आरोप त्यांनी सिद्ध करावेत; अन्यथा आठ दिवसांच्या आत आम्ही अब्रूनुकसानीचा दावा दाखल करू.”

Web Title: After zp and panchayat samiti elections sunil shelke vs bala bhegde ncp bjp vadgaon maval maharashtra politics

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 17, 2026 | 05:39 PM

Topics:  

  • BJP
  • Maharashtra Politics
  • Sunil Shelke
  • Wadgaon Maval

संबंधित बातम्या

Vidhanparishad Election 2026: मोठी बातमी! विधानपरिषदेसाठी भाजपचे ‘हे’ पाच शिलेदार रिंगणात, अनेक नव्या चेहऱ्यांना संधी
1

Vidhanparishad Election 2026: मोठी बातमी! विधानपरिषदेसाठी भाजपचे ‘हे’ पाच शिलेदार रिंगणात, अनेक नव्या चेहऱ्यांना संधी

मावळात एमडी पावडरचा वाढता विळखा, अमली पदार्थ येतात तरी कुठून? आमदार सुनील शेळकेंचा संताप
2

मावळात एमडी पावडरचा वाढता विळखा, अमली पदार्थ येतात तरी कुठून? आमदार सुनील शेळकेंचा संताप

मोठी बातमी! ‘शिवाजी कोण होता?’ पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबींना पोलिसांनी केले स्थानबद्ध, संजय गायकवाडांविरोधात आंदोलनस्थळी गोंधळ
3

मोठी बातमी! ‘शिवाजी कोण होता?’ पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबींना पोलिसांनी केले स्थानबद्ध, संजय गायकवाडांविरोधात आंदोलनस्थळी गोंधळ

Baramati Politics: मोठी बातमी! शरद पवारांनी बोलवली पवार कुटुंबाची तातडीची बैठक
4

Baramati Politics: मोठी बातमी! शरद पवारांनी बोलवली पवार कुटुंबाची तातडीची बैठक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.