
Elections announced for 11 Municipal Councils and 1 Nagar Panchayat in Solapur Local Body Elections 2022
Local Body Elections 2025: सोलापूर : शेखर गोतसुर्वे : राज्यातील बहुप्रतिक्षित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे (Maharashtra Local body Election) अखेर आज (4 नोव्हेंबर) बिगुल वाजले आहे. नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणूक 2 डिसेंबर 2025ला होणार तर 3 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली. तसेच या पत्रकार परिषदेमध्ये केवळ नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुका जाहीर करण्यात आले. निवडणुकीस पात्र असलेल्या 246 नगरपरिषदा आणि एकूण 42 नगरपंचायतीच्या निवडणुका घेण्यात येणार आहेत, अशी माहिती देण्यात आली. सोलापूरमध्येही निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे.
सोलापूर जिल्ह्यातील ११ नगरपरिषदा आणि १ नगरपंचायात निवडणूका जाहीर झाल्या आहेत. इच्छूक उमेदवारांची तोबा गर्दी पक्षश्रेष्ठीकडे होत आहे. पक्षाकडून तिकीट मिळविण्यासाठी इच्छुक उमेदवारांने प्रतिष्ठा पणाला लावली आहे . जिल्ह्यातील १७ नगरपरिषदा पैकी अनगर, अक्कलकोट, दुधनी, मैंदर्गी, मोहोळ, बार्शी, पंढरपूर, अकलूज, सांगोला, मंगळवेढा, कुर्डुवाडी, करमाळा या बारा नगरपालिका व नगर पंचायत निवडणूकीत सहभागी असणार आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
बार्शी ४२,पंढरपूर ३६, अकलकोट २५, अकलुज २६, मैंदर्गी २०,मंगळवेढा २०, सांगोला २३,करमाळा २०, मोहोळ २०,अनगर १७,दुधनी २०, कुर्डवाडी २० अशी नगरसेवकांची संख्याबळ असणार आहे. चुरशीच्या लढतीत अनेक इच्छुक उमेदवार नशीब आजमिवणार आहेत. मंगळवारी राज्याचे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी स्थानिकस्वराज्य संस्थेच्या पहील्या टप्प्याची निवडणूक जाहीर केली .१० नोव्हेंबर पासून अर्ज भरता येणार,, १७ नोव्हेंबर अर्ज माघार घेण्याची तारीख, २ डिसेंबरला मतदान, ३ डिसेंबरला मतमोजणी पार पडणार आहे .
इच्छुक नगराध्यक्षांचे सोशल मीडियावर धूम
निवडणूक कार्यक्रम जाहीरात होताचं इच्छूक नगराध्यक्षांचे फोटोज आणि व्हीडीओ व्हायरल करण्यात येत आहेत. तर नगरसेवकासाठी इच्छूक उमेदवारांनी ही सोशल मिडीयाचा आधार घेतला आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
दुबार मतदारांची वेगळी नोंद असणार
मतदार याद्यांमध्ये घोळ समोर आल्यामुळे ठाकरे बंधू आणि महाविकास आघाडीने निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी केली होती. पण, निवडणूक आयोगाने मतदार याद्यांसाठी ७ नोव्हेंबरपासूनच्या याद्या वापरणार आहे. निवडणूक ही EVM मशीन द्वारेच होणार आहे. नगरपरिषदेसाठी एका मतदाराला २ ते ३ मतदान करता येईल तर नगरपंचायतीसाठी २ मतदान करता येईल. दुबार मतदारांची वेगळी नोंद केलेली असणार आहे. त्यामुळे दुबार मतदारांना त्यांच्या मतदार संघात मतदान करता येणार आहे असे राज्य निवडूक आयोगाने म्हटले आहे. दुबार मतदारासमोर डबल स्टार आलं आणि त्याने रिस्पॉन्स दिला नाही तर त्या मतदाराकडून एक डिक्लेरेशन घेतलं जाईल. कुठल्याही मतदान केंद्रावर मतदान केलं नाही असं लिहून घेतलं जाईल. या मतदान केंद्रानंतर दुसरीकडे मतदान करणार नाही असं त्याच्याकडून लिहून घेतलं जाईल असे राज्य निवडणूक आयोगने सांगितले.