आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा ! पैशांचे आमिष, आचारसंहिता उल्लंघनाच्या आरोपांची निवडणुकीत चर्चा
पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांत रोजगार, स्पर्धा परीक्षार्थीच्या समस्या, उच्चशिक्षित तरुणांच्या रोजगाराच्या संधी, शिक्षकांचे प्रलंचित प्रश्न आणि शिक्षण क्षेत्रातील अडचणी हे मुद्दे केंद्रस्थानी होते. पुणे हे राज्यातील प्रमुख शैक्षणिक केंद्र असल्याने या निवडणुकीकडे विशेष लक्ष लागले होते.
या निवडणुकीसाठी पुणे विभागातील पाच जिल्ह्यांत दोन्ही मतदारसंघांसाठी एकूण १ हजार ५१ मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली होती. एकूण ४ लाख ४९ हजार ९५९ मतदार मतदानासाठी पात्र होते.
राज्यातील विधानपरिषदेच्या निवडणुकीत भाजपच्या दोन्ही उमेदवारांचा मोठ्या फरकाने विजय होईल, असा विश्वास उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला. माध्यमांशी बोलताना पाटील म्हणाले, कोल्हापूरचा आढावा घेऊन पुण्यात आलो आहे. एका मतदान केंद्राला भेट देऊन मतदारांशी संवाद साधला.
दिवसभरात मतदारांचा सहभाग, प्रमुख नेत्यांच्या प्रतिक्रिया, उमेदवारांचे विजयाचे दावे आणि आचारसंहितेच्या कथित उल्लंघनावरून झालेली टीका यामुळे पुणे विभागातील दोन्ही मतदारसंघांच्या निवडणुकीला राजकीय रंग चढला. एका बाजूला रोजगार आणि शिक्षण क्षेत्रातील प्रश्न सोडविणाऱ्या प्रतिनिधीची अपेक्षा मतदारांनी व्यक्त केली, तर दुसरीकडे निवडणूक प्रक्रिया निष्पक्ष आणि पारदर्शक राहण्याची मागणी पुढे आली. त्यामुळे मतदानानंतर आता दोन्ही मतदारसंघांतील निकालाकडे राजकीय वर्तुळासह मतदारांचे लक्ष लागले आहे.
पुणे विभाग पदवीधर मतदारसंघाच्या मतदानादरम्यान सोशल मीडियावर एका चिठ्ठीची जोरदार चर्चा रंगली. मतदान यादीतील भाजपच्या उमेदवाराच्या नावावर ‘सुशिक्षित आहोत, अशिक्षित नाही असा संदेश लिहिलेली विडी चिकटवण्यात आल्याचे छायाचित्र व्हायरल झाले. त्यानंतर ‘पैसे आले भाजपाचे, मत मात्र हर्षदा ताईंना!’ या उपरोधिक संदेशातून सोशल मीडियावर राजकीय टोलेबाजी सुरू झाली.
मतदानाच्या दिवशी या छायाचित्रामुळे राजकीय वर्तुळात आणि सोशल मीडियावर चर्चला उधाण आले. मात्र, या संदेशामागील व्यक्ती कोण आणि त्याची नेमकी पार्श्वभूमी काय, याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
Ans: पुणे विभागातील ५ जिल्ह्यांमध्ये एकूण १,०५१ मतदान केंद्रे उभारण्यात आली होती आणि ४ लाख ४९ हजार ९५९ मतदार मतदानासाठी पात्र होते.
Ans: चंद्रकांत पाटील यांनी दावा केला की भाजपचे दोन्ही उमेदवार ५० टक्क्यांपेक्षा जास्त मते मिळवून एकतर्फी विजय मिळवतील.
Ans: सोमवारी, २७ ऑक्टोबर २०२६ रोजी पुण्यातील बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात मतमोजणी होऊन निकाल घोषित केला जाईल.






