Vidhanbhavan news: महाराष्ट्र विधानभवन परिसरात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या समर्थकांमध्ये झालेल्या झटापटीनंतर, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले की, ‘यापुढे विधिमंडळ अधिवेशनाच्या कालावधीत विधानभवनात अभ्यागतांना प्रवेश नाकारण्यात येणार आहे. अधिवेशन चालू असताना केवळ मंत्री, आमदार, त्यांचे अधिकृतरित्या नियुक्त वैयक्तिक सहाय्यक आणि अधिकृत शासकीय अधिकारी यांनाच विधानभवनात प्रवेश दिला जाईल. हा निर्णय विधिमंडळ परिसरातील शिस्त आणि सुरक्षितता राखण्यासाठी घेण्यात आल्याचे अध्यक्षांनी स्पष्ट केले.
सदस्यांना अपात्र ठरवण्याची क्षमता असलेली नीतिमत्ता समिती एका आठवड्यात स्थापन केली जाईल. ही घटना गुरुवारी सायंकाळी ५.४५ वाजता विधानभवनाच्या तळमजल्यावर घडली होती. याप्रकरणी विधानभवनाच्या मुख्य सुरक्षा अधिकाऱ्यांकडून अहवाल मागवण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केलं.
यासोबतच अधिवेशनादरम्यान विधानभवनात अभ्यागतांना प्रवेश दिला जाणार नाही, असा मोठा निर्णयही घेण्यात आला आहे. नार्वेकर म्हणाले की, अधिवेशन सुरू असताना केवळ मंत्री, आमदार, त्यांच्या अधिकृत खाजगी सचिव आणि सरकारी अधिकारी यांनाच प्रवेश दिला जाईल. हा निर्णय विधिमंडळाच्या सुरक्षा आणि कार्यपद्धतीची शिस्त अबाधित राहावी यासाठी घेण्यात आला आहे.
विधानभवन परिसरात निर्माण झालेल्या गोंधळानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आणखी काही कठोर निर्बंध जाहीर केले आहेत. त्यांनी स्पष्ट केले की, अधिवेशनादरम्यान मंत्र्यांना विधानभवनाच्या आवारात अधिकृत बैठका घेता येणार नाहीत तसेच अभ्यागतांना भेटण्यासही मनाई असेल.
IND Vs ENG : ड्यूक बॉलवरील टीका जिव्हारी! कंपनीने उचललं मोठं पाऊल; वाचा सविस्तर
राहुल नार्वेकर म्हणाले की, मंत्र्यांनी आपली अधिकृत ब्रीफिंग्स व बैठका फक्त राज्य सचिवालयातच घेण्याचे निर्देश आहेत. याशिवाय, आमदारांसोबत येणाऱ्या व्यक्तींच्या वर्तनाची जबाबदारी संबंधित आमदारांवरच राहणार आहे.या निर्णयांमागे विधानभवनातील शिस्त व सुरक्षितता अबाधित राखण्याचा उद्देश असल्याचे अध्यक्षांनी स्पष्ट केले आहे. यामुळे अधिवेशनाच्या कालावधीत अधिक नियंत्रीत व शांत वातावरण निर्माण होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
आमदार जितेंद्र आव्हाड आणि भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या समर्थकांमध्ये झालेल्या हाणामारीनंतर दोन्ही आमदारांनी सभागृहात खेद व्यक्त केला आहे. मात्र या प्रकारावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी कठोर भूमिका घेतली आहे. अध्यक्ष नार्वेकर यांनी सांगितले की, या घटनेत सहभागी असलेले नितीन देशमुख (आव्हाड यांचे समर्थक) आणि सर्जेराव टकले (पडळकर यांचे चुलत बंधू) यांच्यावर सभागृहाच्या विशेषाधिकार भंगाचा आरोप लावण्यात येणार आहे. दोघांनाही राज्य विधिमंडळाच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी ताब्यात घेतले असून, अधिकृत पासशिवाय विधानभवनात प्रवेश केल्याचे उघड झाले आहे.